हे मंत्रिमंडळ गद्दारांचं,कलंकितांचं; अब्दुल सत्तारांवर आरोप नव्हे, पुरावे आहेत; अंबादास दानवेंनी बंडखोरांची कुंडलीच मांडली

संतोष बांगर यांना उद्देश्यून ते म्हणाले की, गद्दार माणूस नाक वर करून, तोंड वर करून चालू शकत नाही नुसताच घोषणा करतो. गद्दार म्हणतोय बंडगर म्हणतोय काय करणार संतोष बांगर बघू असं त्यांनी आमदार बांगरांना यावेळी जाहीर आव्हानही दिले आहे.

हे मंत्रिमंडळ गद्दारांचं,कलंकितांचं; अब्दुल सत्तारांवर आरोप नव्हे, पुरावे आहेत; अंबादास दानवेंनी बंडखोरांची कुंडलीच मांडली
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 10:24 PM

मुंबईः महाविकास आघाडीच्या सरकारला  एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे पायउतार व्हावं लागल्यानंतर नव्या शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis Government) सरकारचे वेध राज्याला लागले होते. त्यानंतर बंडखोरीनाट्यनंतर न्यायालयीन तिढा अजून सुटलेला नसतानाच जवळ जवळ चाळीस दिवसानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यानंतर शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने जोरदार हल्ला चढविला. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिंदे-फडणवीस आणि बंडखोरी केलेल्या आमदारांवर जोरदार टीका केली. अंबादास दानवे (Shivsena MLA Ambadas Danave) यांनी टीका करताना ते म्हणाले की, हे मंत्रिमंडळ गद्दारांच आहे, कलंकित असलेल्या लोकांचं मंत्रिमंडळ स्थापन झाल्याचा घणाघात शिंदे गटावर करण्यात आला.

शिंदे-फडणवीस गटावर टीका करताना आणि मंत्रिमंडळाचा विस्तार करताना त्यांनी शिंदे गट आणि भाजपला यांना महिला ,माता भगिनी यांच्याविषयी काय घेणं देणं नाही, त्यामुळेच त्यांच्या मंत्रिमंडळात एकही महिलेला स्थान मिळालं नाही, हे मोठं दुर्दैव असल्याचे त्यांनी सांगितले.

शिंदे-फडणवीसांच्या नाकीनऊ

राज्यात जे आज सरकार स्थापन झाले आहे त्याविषयी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, शिंदे-फडणवीस यांनी इतक्या लोकांना आश्वासन दिलेले आहे की ते आता आश्वासन पूर्ण करताना त्यांच्या नाकी नऊ आलेले आहेत त्यामुळे त्यांच्याकडे अशा अपेक्षा ठेवणंसुद्धा चुकीचं असल्याचा टोमणा त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.

आरोप नव्हे तर आपल्याकडे पुरावे

शिक्षक पात्रचा चाचणी परीक्षेतील घोटाळ्यावर बोलताना आणि त्यासंदर्भात बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांचे नाव आले असल्यामुळे त्यांना आवाहन देत ते म्हणाले की, अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप नव्हे तर आपल्याकडे पुरावे आहेत.

बोगस सर्टिफिकेटवर नोकरी

अब्दुल सत्तार यांच्या संस्थेमध्ये त्यांच्या मुलीच नव्हे तर अनेक नातेवाईकांनी बोगस सर्टिफिकेट देऊन त्यांनी त्या ठिकाणी नोकरी दिल्याचा आरोप करुन ते आम्ही लवकरच सिद्ध करू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

काय करणार संतोष बांगर

गद्दार शब्दावरुन रणकंदन माजले असतानाच शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी जो कोणी आम्हाला गद्दार म्हणेल त्याच्या कानशिलात लगावणार असं जाहीररित्या सांगण्यात आले होत, त्यानंतर आता संतोष बांगर यांना उद्देश्यून ते म्हणाले की, गद्दार माणूस नाक वर करून, तोंड वर करून चालू शकत नाही नुसताच घोषणा करतो. गद्दार म्हणतोय बंडगर म्हणतोय काय करणार संतोष बांगर बघू असं त्यांनी आमदार बांगरांना यावेळी जाहीर आव्हानही दिले आहे.

Non Stop LIVE Update
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.