अमृता फडणवीसांचे ‘अॅनिव्हर्सरी स्पेशल’ नवे गीत, ‘मन ही मन तुझे चाहा…’

अमृता फडणवीस यांनी आज ट्वीट करत आपलं नवं गीत चाहत्यांसाठी प्रसिद्ध केलं आहे. 'मन ही मन तुझे चाहा...' अशी या गाण्याची सुरुवात होते. तर इंटरनेट सेन्सेशन ठरलेल्या 'मनिके मागे हिते' या गीतावर आधारीत असल्याचं अमृता फडणवीस यांनी सांगितलं आहे.

अमृता फडणवीसांचे 'अॅनिव्हर्सरी स्पेशल' नवे गीत, 'मन ही मन तुझे चाहा...'
अमृता फडणवीस


मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गीत आज प्रदर्शित झालं आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचं नवं गीत येणार असल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी आज ट्वीट करत आपलं नवं गीत चाहत्यांसाठी प्रसिद्ध केलं आहे. ‘मन ही मन तुझे चाहा…’ अशी या गाण्याची सुरुवात होते. तर इंटरनेट सेन्सेशन ठरलेल्या ‘मनिके मागे हिते’ या गीतावर आधारीत असल्याचं अमृता फडणवीस यांनी सांगितलं आहे. (New song of Amrita Fadnavis screened, based on Manike Maage Hite song)

आओ कुछ तुफानी करते है…

कधी गाणं, तर कधी सोशल मीडियावरील त्यांचे ट्विट्स यामुळे अमृता फडणवीस या नेहमी चर्चेत असतात. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी नुकतेच एक ट्वीट करत एक घोषणा केली आहे. मात्र, या ट्वीटवरून त्या नेमकं काय करणार आहेत, हे स्पष्ट होत नाहीये.

‘आओ कुछ तूफ़ानी करते है, कल शाम…. मी पुन्हा येत आहे !!!’, असं त्यांनी ट्वीट केलं आहे. आता मिसेस फडणवीस राजकीय बोलणार की, नव्या गाण्याचा आगामी अल्बमची घोषणा करणार, याबद्दल कयास बांधले जात आहेत.

आधीही अनेक गाणी चाहत्यांच्या भेटीला

अमृता फडणवीस या एक गायिका देखील आहेत. त्यांच्या आवाजातील अनेक गाणी चाहत्यांच्या भेटीस आली होती. अमृता फडणवीस यांचे गायनकौशल्य संपूर्ण राज्याला परिचित आहे. यापूर्वीही त्यांची अनेक गाणी सोशल मीडियावर हिट ठरली आहेत. अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेनिमित्त एक गाणे रिलीज केले होते. ‘तिला जगू द्या’ या गाण्याचा एक व्हिडीओ अमृता यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन पोस्ट केला होता. या व्हिडीओला दोन दिवसांमध्ये दहा लाख व्ह्यूज मिळाले होते. त्यांनी याआधी देखील अनेक गाणी गायली आहेत. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा एक अल्बम देखील रिलिज झालेला आहे. यानंतर, त्यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या (Valentine’s day) मुहूर्तावर सोशल मीडियावर एक गाणे शेअर केले होते. ‘ये नयन डरे डरे’ असे या गाण्याचे शब्द आहेत. गणेशोत्सवादरम्यान त्यांनी गणेश वंदना देखील गायली होती. त्यामुळे जर त्यांच्या या ट्वीटचा अर्थ त्यांचे नवे गाणे असेल तर ही त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

इतर बातम्या : 

Farm Laws Withdrawn : केंद्र सरकारवर नाराज कंगना रनौत, पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्यांनाही दिले समर्थन!

Farm Laws | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा, प्रतिक्रिया देताना तापसी पन्नू म्हणते…

New song of Amrita Fadnavis screened, based on Manike Maage Hite song

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI