महापौरांना काही बोलायची भीती वाटते, त्या आमचा बाप काढतील; शौचालयाच्या राजकारणावरुन आशिष शेलारांचा टोला

मुंबईच्या महालक्ष्मी येथील धोबीघाट भागातील शौचालयाच्या मालकी हक्कावरून शिवसेना, मनसे आणि भाजप या तीन पक्षांमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे

  • Updated On - 11:26 pm, Mon, 14 June 21 Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
महापौरांना काही बोलायची भीती वाटते, त्या आमचा बाप काढतील; शौचालयाच्या राजकारणावरुन आशिष शेलारांचा टोला
Ashish Shelar

मुंबई : महालक्ष्मी येथील धोबीघाट भागातील शौचालयाच्या मालकी हक्कावरून शिवसेना, मनसे आणि भाजप या तीन पक्षांमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे. मनसे आणि भाजप एकत्र असून त्यांनी महापौर किशोरी पेडणेकर तसेच शिवसेनेवर गौरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहेत. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी तसेच भाजप नेते आशिष शेलार यांनी आज या शौचालयाची पाहणी केली. (Ashish Shelar slams Mayor Kishori Pednekar over Dhobi Ghat Toilet Politics)

या शौचालयाचं उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर आणि खासदार अरविंद सावंत यांनी 12 जून रोजी केलं आहे आणि शौचालय चालवायची जबाबदारी धोबी कल्याण वेल्फेयर सोसायटीला देण्यात आली आहे. स्थानिक धोब्यांची मागणी आहे की सदर शौचालय हे आधीपासून धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास को-ऑप. सोसायटी लिमिटेड या नोंदणीकृत संस्थेकडे होते. यातून मिळणारं उत्पन्न स्थानिक धोबी समाजाच्या कल्याणासाठी वापरले जात होते. त्यासाठी याची जबाबदारी आधीच्या सोसायटीकडेच देण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांची आहे. तसेच सदर शौचालय मोडकळीस आले होते तेव्हा महापालिकेकडे दुरुस्तीची विनंती करण्यात आली होती. शौचालय दुरुस्त करण्यात आले, मात्र त्याचे हक्क नव्या संस्थेला देण्यात आले आहेत.

दरम्यान, महापालिकेच्या या कारभाराविरोधात स्थानिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या जन आंदोलनाला भाजपचा पाठींबा राहील, अशी माहिती भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी दिली आहे. शेलार म्हणाले की, धोबी घाटातील सार्वजनिक शौचालय धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास को-ऑप. सोसायटी लिमिटेड या नोंदणीकृत संस्था चालवत होती. पण नुतनीकरणाच्या नावावर या संस्थेकडून काढून घेण्यात आले. ही संस्था अल्पदरात ही सुविधा उपलब्ध करून देत असताना महपौरांनी आपल्या एका कार्यकर्त्याच्या संस्थेला हे काम देण्याचा घाट घाटला आहे. याबाबत स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

दरम्यान, आज भाजप नेते आशिष शेलार यांनी धोबी घाट येथे जाऊन सदर शौचालयाची पाहणी केली व स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी आपले म्हणणे स्थानिकांनी मांडले. ज्या संस्थेला देण्यात आले आहे ती संस्था दरही वाढविणार आहे. तसेच शौचालयाचे काम पूर्ण झाले. पर्यावरण मंत्री व स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सदर शौचालयाचा लोकार्पण कार्यक्रम झाला पण शौचालय खुले केलेले नाही. दर काय असतील हे सांगितले जात नाही. त्यामुळे स्थानिक आंदोलन करणार असल्याचे यावेळी स्थानिकांनी अॅड आशिष शेलार यांना सांगितले.

दरम्यान याबाबत आशिष शेलार यांनी. सांगितले की, याबाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशी आपण चर्चा केली असून पुन्हा याबाबत चर्चा करु. स्थानिकांची संस्था हे शौचालय चालवण्याचे काम गेली अनेक वर्षे करीत असून त्यांच्या कडून एकाकी काम काढून घेणे अन्यायकारक आहे. ते काम काढून घेतले ते कधी सुरू होणार? दर किती असणार? महापौरांनी या सगळ्याची उत्तरे देणे आवश्यक आहे. स्थानिकांचा विरोध असून त्या विरोधात ते जन आंदोलन करणार आहेत. भाजपाचा या आंदोलनाला पाठींबा असेल, असेही आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले.

…तर महापौर आमचा बाप काढतील : शेलार

शेलार म्हणाले की, पक्ष अभिनिवेश आणि अहंकारीपणा या दोन दुर्गुनांनी सध्या शिवसेना भरली आहे. लोकांची स्वच्छ्ता करणाऱ्या या लोकांचे काम काढून आपल्या लल्लूपंजूना दिले आहे. दिले तर दिले पण हे शौचालय अजून बंद आहे. शिवाय आता दरदेखील वाढवले आहेत. शौचालय उघडायचे नाही, स्थानिकांना डावलायचे आणि आता राजकारण करायचे हे जनता पाहत आहे. दुसऱ्या बाजूला महापौरांना काही बोलायची भीती वाटते, नाहीतर त्या आमचा बाप काढतील.

इतर बातम्या

शिवसेनेला चार कारकुन सांभाळणार असतील तर मला कधीही मान्य होणार नाही; राज ठाकरेंचे शब्दच ‘सेनावापसी’ रोखणार?

जब तक तोडेंगे नही, तब तक छोडेंगे नही, धारावी सातव्यांदा शून्यावर, महापालिकेने करुन दाखवलं!

(Ashish Shelar slams Mayor Kishori Pednekar over Dhobi Ghat Toilet Politics)