महाराष्ट्राच्या राज्यपालपदी महाराष्ट्राची लेक?

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने घवघवीत यश मिळवलं. त्यानंतर 30 मे रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची, तर त्यांच्या 57 सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नव्या सरकारकडून विविध राज्यांमधील राज्यपालही बदलण्याची किंवा नवे राज्यपाल नियुक्त करण्याची शक्यता आहे. यातच महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. […]

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी महाराष्ट्राची लेक?
sumitra mahajan demise fake news
Follow us
| Updated on: Jun 01, 2019 | 1:17 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने घवघवीत यश मिळवलं. त्यानंतर 30 मे रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची, तर त्यांच्या 57 सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नव्या सरकारकडून विविध राज्यांमधील राज्यपालही बदलण्याची किंवा नवे राज्यपाल नियुक्त करण्याची शक्यता आहे. यातच महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुमित्रा महाजन यांना महाराष्ट्राचं राज्यपाल करावं, अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा आहे. सुमित्रा महाजन यांना इंदूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे इंदूरमधून भाजपने उमेदवार जाहीर करण्यास दिरंगाई केल्यानं, स्वत: सुमित्रा महाजन यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि निवडणूक लढवणार नसल्याचेही जाहीर केले होते.

आता सुमित्रा महाजन यांचे नाव महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी चर्चेत आल्याने महाराष्ट्रातही आनंदाचं वातावरण दिसून येत आहे. महाजन यांची राजकीय कारकीर्द मध्य प्रदेशात गेली असली, तरी त्या मराठी आहेत. महाराष्ट्राशी त्यांच जवळचं आणि रक्ताचं नातं आहे. त्यामुळे मराठी व्यक्तीच महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विराजमान झाल्यास आपल्याला आनंद होईल, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

कोण आहेत सुमित्रा महाजन?

12 एप्रिल 1943 रोजी जन्म झालेल्या सुमित्रा महाजन भाजपच्या वरिष्ठ नेत्या आहेत. त्या सध्या लोकसभेच्या अध्यक्षा आहेत. 6 जून 2014 रोजी त्यांची 16 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली होती. महाजन 1989 पासून इंदूर लोकसभा मतदारसंघातून सलग 8 वेळा लोकसभा सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. एवढा मोठाकाळ खासदार म्हणून निवडून येणाऱ्या 3 खासदारांपैकी त्या एक आहेत. तसेच सद्यस्थितीत त्या सर्वाधिक काळ खासदार राहिलेल्या महिला सदस्य आहेत.

सुमित्रा महाजन यांनी भूषवलेली पदे :

  • जून 2002: केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री
  • जुलै 2002 – मे 2003: तंत्रान, माहिती आणि दुरसंचार राज्यमंत्री
  • 24 मे 2003 – मे 2004: पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस राज्यमंत्री
  • 2014 ते 2019 – लोकसभेच्या अध्यक्षा

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.