खड्डेमुक्त रस्ते, मालमत्ता करमाफीसाठी भाजप आक्रमक, शेलारांच्या नेतृत्वात पालिकेवर धडक

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली आज महापालिका विभागीय कार्यलयावर मोर्चा काढण्यात आला.

खड्डेमुक्त रस्ते, मालमत्ता करमाफीसाठी भाजप आक्रमक, शेलारांच्या नेतृत्वात पालिकेवर धडक

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली आज महापालिका विभागीय कार्यलयावर मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेने खड्डेमुक्त रस्ते, 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करणे अशा घोषणा केल्या होत्या. त्या अद्याप पूर्ण झाल्या नाहीत, त्याविरोधात भाजपने आंदोलन केले असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. (BJP’s morcha at Municipal Corporation office led by Ashish Shelar)

मुंबईतले रस्ते अद्यापही खड्डेमुक्त झालेले नाहीत, मालमत्ता कर आणि अशाच अनेक मुद्द्यांवर भाजपच्या वतीने महापालिकेच्या विभागीय कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. आशिष शेलार यांनी शिवसेना तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील घणाघाती टीका केली. शेलार म्हणाले की, हे आंदोलन मुंबईकरांसाठी आहे, निवडणुकी साठी नाही. हे आंदोलन तर फक्त एक ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे, असे म्हणत त्यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.

याबाबत शेलार यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, भाजपच्या वतीने मुंबई महापालिकेच्या एच पश्चिम प्रभाग समिती कार्यालयावर आम्ही मोर्चा काढला. शिवसेनेने मुंबईकरानां दिलेल्या 500 चौ. फुटांच्या घरांना सवलतीची अंमलबजावणी केलेली नाही. तसेच करोनाच्या या आपत्तीमध्ये मुंबईकरांना दिलासा देणे आवश्यक आहे आणि त्यामुळे सर्व करात 50% सवलत मिळाली पाहिजे अशा मागण्यांचे आज महापालिकेला निवेदन दिले!

इतर बातम्या

Aurangabad Weather : औरंगाबादेत पावसाचा जोर ओसरला, ऊन-सावलीचा खेळ, 6 सप्टेंबरनंतर दणक्यात बरसणार

मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजी छत्रपती गुरुवारी राष्ट्रपतींना भेटणार; शिष्टमंडळात सर्वपक्षीय खासदारही

लोकांच्या जीवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नका; दिलीप-वळसे पाटलांचा राज ठाकरेंना टोला

(BJP’s morcha at Municipal Corporation office led by Ashish Shelar)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI