बीएमसीने बजेटमधील 37 टक्केच रक्कम वापरली!

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचा बजेट हा एखाद्या छोट्या राज्याच्या बजेट एवढा आहे. गेल्यावर्षी 27 हजार कोटी रुपये एवढा बजेट मुंबई शहरातील महापालिकेला मंजूर झाला होता. मात्र यातील फक्त 37 टक्के बजेटची रक्कम ही वापरली गेली असल्याचे समोर आले आहे. आता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 2019 आणि 2020 पर्यंतचा बजेट मांडला जाणार […]

बीएमसीने बजेटमधील 37 टक्केच रक्कम वापरली!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचा बजेट हा एखाद्या छोट्या राज्याच्या बजेट एवढा आहे. गेल्यावर्षी 27 हजार कोटी रुपये एवढा बजेट मुंबई शहरातील महापालिकेला मंजूर झाला होता. मात्र यातील फक्त 37 टक्के बजेटची रक्कम ही वापरली गेली असल्याचे समोर आले आहे. आता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 2019 आणि 2020 पर्यंतचा बजेट मांडला जाणार आहे.

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातील निधी खर्चच केला जात नसल्याची टिका दरवर्षी नगरसेवकांकडून केली जात होती. त्यावर यावर्षी अर्थसंकल्पातील सर्व निधी खर्च केला जाईल अशी घोषणा पालिका आयुक्तांनी केली होती. मात्र 37 टक्केच रक्कम खर्च करण्यास पालिका प्रशासनाला यश आलं आहे.  मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 37 हजार कोटी रुपयांपर्यंत गेला होता. त्यावेळी एकूण अर्थसंकल्पापैकी 20 ते 25 टक्के इतकीच रक्कम खर्च करण्यास प्रशासनाला यश येत होते. याकारणाने अर्थसंकल्प फुगवला असल्याचे कारण देत पालिका आयुक्तांनी वास्तविक आकडेवारीवर आधारित 2017 – 18 वर्षासाठी 25 हजार 141 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात भांडवली खर्चासाठी 8 हजार 121 कोटी रुपयांची तरतुद केली होती. त्यापैकी 2 हजार 518 कोटी रुपये म्हणजेच 31 टक्के खर्च करण्यास प्रशासनाला शक्य झाले होते.

मागील वर्षांपेक्षा यावर्षी 8 टक्क्यांची वाढ करत 2018 – 19 वर्षासाठी 27 हजार 258 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. त्यात सार्वजनिक कामे आणि भांडवली खर्चासाठी 9 हजार 543 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी 3 हजार 508 कोटी रुपये इतका खर्च करण्यास प्रशासनाला यश आले आहे. ही आकडेवारी पाहता प्रशासनाला अद्याप 36.74 टक्के खर्च करण्यात यश आले आहे. पालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पातील जास्तीत जास्त निधी खर्च करणार असल्याचे सांगूनही हा निधी खर्च होत नसल्याने नगरसेवकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

गेली 25 वर्षापेक्षा जास्त काळ शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेवर आहे. पण दरवर्षी मुंबईकरांना सर्व काही सुविधा देणार असं सांगून बजेट आकार वाढवला जातो, पण तो संपत मात्र नाहीच. यंदा सुद्धा पालिकेचा बजेट हा फक्त 37 टक्केच वापरला गेला आहे. यावर सत्ताधारी शिवसेनेला विचारला असता नवीन बजेट समोर आल्यावर नेमका किती वापरला किती बाकी आहे कळेल असं उत्तर देण्यात आलं.

गेल्यावर्षी अर्थ संकल्प हा 27 हजार कोटींचा मांडण्यात आला होता. यातील बजेट हा फक्त 37 टक्के संपला आहे , म्हणजे यंदाचा बजेट वाढीव असणार हे नक्की, कारण गेल्या वर्षी अनेक मोठया मोठ्या प्रकल्पाची घोषणा ही करण्यात आली. मात्र त्याचा निधी वापरला गेला नाही. त्यामुळे यंदाच्या बजेट मध्ये मात्र या सर्व प्रकल्पाच्या तरतुदी पुन्हा कराव्या लागणार आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा प्रभाव पालिकेच्या 2019-2020 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पावर असणार आहे. त्यामुळे कोणतीही नवीन करवाढ न लादता महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर भर देणारा हा अर्थसंकल्प असेल.  महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाबरोबरच विकास आराखड्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीवर भर, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, सांडपाणी पुनप्रक्रिया केंद्र या प्रकल्पांसाठी अधिक तरतूद असणार आहे.

2015 ते 2019 पर्यंत लागू केलेला बजेट

वर्ष – 2015 ते 2016

बजेट – 33,514 कोटी

———————–

वर्ष – 2016 आणि 2017

बजेट – 37052 कोटी

———————–

वर्ष – 2017 आणि 2018

बजेट – 25141 कोटी

———————–

वर्ष 2018 आणि 2019

बजेट – 27258 कोटी

प्रत्येक विभागासाठी खर्च करण्यात आलेली रक्कम

रस्ते विभाग

2017- 2018 – 62.5 %

2018- 2019 – 51.4 %

———————–

मलनिस्सारण

2017- 2018 – 70.9%

2018- 2019 – 89.4%

———————–

पुल विभाग

2017- 2018 – 57.2%

2018- 2019 – 39.8%

———————–

घनकचरा विभाग

2017- 2018 – 19.1%

2018- 2019 – 22.8 %

———————–

आरोग्य विभाग

2017- 2018 – 41.64 %

2018- 2019 – 34.65 %

———————–

गार्डन विभाग

2017- 2018 – 37.54%

2018- 2019 –  16.81 %

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.