Breaking News : मुंबईच्या समुद्रात ओएनजीसीच्या प्लांटजवळ हेलिकॉप्टर क्रॅश, चौघांना वाचवण्यात यश

ONGC : मुंबईच्या समुद्रात ओएनजीसीच्या प्लांटजवळ हेलिकॉप्टर क्रॅश

Breaking News : मुंबईच्या समुद्रात ओएनजीसीच्या प्लांटजवळ हेलिकॉप्टर क्रॅश, चौघांना वाचवण्यात यश
आयेशा सय्यद

|

Jun 28, 2022 | 1:54 PM

मुंबई : मुंबईतील समुद्रात ओएनजीसीचं (ONGC Plant) हेलिकॉप्टर क्रॅश (Helicopter Crashe) झालंय. यानंतर कोस्टगार्डकडून जहाज बचावकार्यासाठी पाठवण्यात आलं आहे. सकाळी 11.30 वाजता ही दुर्घटना घडली आहे. एकूण 9 जण हेलिकॉप्टरमध्ये होती. एकूण 4 जणांना वाचवण्यात यश आलंय. एकूण सात प्रवासी आणि दोन क्रू मेम्बर हेलिकॉप्टरमध्ये होते. सध्या बचावकार्य केलं जातंय. बॉयलरी जाण्यासाठी हे हेलिकॉप्टर निघाल्याची माहिती मिळतेय. आता कोस्ट गार्ड (Coast Guard) या दुर्घटनेनंतर बचावकार्यासाठी तैनात करण्यात आलं आहे. जे लोक अडकले आहेत, त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कोस्टगार्डकडून मुंबईतील शिपला हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या ठिकाणी तातडीनं तैनात करण्यात आलं आहे. 50 नॉर्टिकल माईल्सवर ही दुर्घटना घडली, असं सांगितलं जातंय.

मुंबईच्या समुद्रात हेलिकॉप्टर दुर्घटना

मुंबईतील समुद्रात ओएनजीसीचं हेलिकॉप्टर क्रॅश झालंय. यानंतर कोस्टगार्डकडून जहाज बचावकार्यासाठी पाठवण्यात आलं आहे. सकाळी 11.30 वाजता ही दुर्घटना घडली आहे. एकूण 9 जण हेलिकॉप्टरमध्ये होती. एकूण 4 जणांना वाचवण्यात यश आलंय. एकूण सात प्रवासी आणि दोन क्रू मेम्बर हेलिकॉप्टरमध्ये होते. सध्या बचावकार्य केलं जातंय. बॉयलरी जाण्यासाठी हे हेलिकॉप्टर निघाल्याची माहिती मिळतेय.

कोस्टगार्डकडून बचाव कार्य

कोस्ट गार्ड या दुर्घटनेनंतर बचावकार्यासाठी तैनात करण्यात आलं आहे. जे लोक अडकले आहेत, त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कोस्टगार्डकडून मुंबईतील शिपला हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या ठिकाणी तातडीनं तैनात करण्यात आलं आहे. 50 नॉर्टिकल माईल्सवर ही दुर्घटना घडली, असं सांगितलं जातंय.

ओएनजीसीने ट्विट करत या घटनेची माहिती दिली आहे. पवनहंसचं हे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळलं. या दुर्घटनेनंतर बचाव कार्यासाठी सागरी आणि हवाई दल सक्षमपणे काम करत आहे. आतापर्यंत चौघांना वाचवण्यात यश आल्याचं ओएनजीसीच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें