मुकेश अंबानींच्या घराजवळ आढळली स्फोटकांनी भरलेली कार; विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी

स्थानिक गुन्हे शाखेकडे याचा तपास देण्यात आलाय. बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल असून, परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:58 PM, 25 Feb 2021
मुकेश अंबानींच्या घराजवळ आढळली स्फोटकांनी भरलेली कार; विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी
Vishwas Nangre Patil At The Spot

मुंबईः देशातील दिग्गज आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीच्या अँटेलिया बंगल्याजवळ संशयित स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली असून, घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे तपास यंत्रणेसह पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल असून, परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात तपासणी केली जातेय. (Car Full Of Explosives Found Near Mukesh Ambani house; Vishwas Nangre Patil At The Spot)

मुंबई सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलही घटनास्थळी

विशेष म्हणजे मुंबई सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलही घटनास्थळी दाखल झालेत. मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे. नरिमन पाईंटमधला हा रोड आहे. तो व्हीआयपी रोड म्हणून ओळखला जातो. त्या रस्त्यावर नेहमीच मोठा पोलीस बंदोबस्त असतो. या परिसरात ही गाडी सापडल्यानं पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केलाय. स्थानिक गुन्हे शाखेकडे याचा तपास देण्यात आलाय.

गाडीमध्ये जिलेटिन भरलेली स्फोटकं

संबंधित स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटिनने भरलेली स्फोटकं असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधिकृत माहिती दिलीय. पोलिसांचा सध्या तपास सुरु आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल आहे. अंबानींच्या बंगल्याजवळ संबंधित स्कॉर्पिओ गाडी बराच वेळ थांबली होती. पोलिसांनी पार्किंगच्या अनुषंगाने कारवाई केली, त्यावेळी हा सगळा प्रकार उघड झाला. आता सगळ्या तपास यंत्रणा परिसरात पोहोचल्या आहेत. संबंधित परिसर हा व्हीआयपी आहे. या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त असतो.

मुकेश अंबानी यांना धमकीचे पत्र

मुकेश अंबानी यांना याआधी धमकीचे पत्र आले होते, अशी माहिती समोर येत आहे. त्यांच्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयात त्यांना धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. त्यांच्या बंगल्यापर्यंत ही सुरक्षा व्यवस्था आहे. सरकारकडून गेल्या सात ते आठ वर्षांपासून त्यांना सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

VIDEO : मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं भरलेली कार, घातपाताच्या उद्देशाचा संशय

Car Full Of Explosives Found Near Mukesh Ambani house; Vishwas Nangre Patil At The Spot