चंद्रकांत पाटील, दानवे शिवसेनेत येण्याची शक्यता, त्यामुळेच मुख्यमंत्री बोलले; जयंत पाटलांचं मोठं विधान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना भावी सहकारी संबोधून धुरळा उडवून दिला आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मोठं विधान करून खळबळ उडवून दिली आहे. (Jayant Patil)

चंद्रकांत पाटील, दानवे शिवसेनेत येण्याची शक्यता, त्यामुळेच मुख्यमंत्री बोलले; जयंत पाटलांचं मोठं विधान
jayant patil

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना भावी सहकारी संबोधून धुरळा उडवून दिला आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मोठं विधान करून खळबळ उडवून दिली आहे. चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे शिवसेनेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी सूचक विधान केलं असावं, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. (Chandrakant Patil and Raosaheb Danve are likely to join Shiv Sena, says jayant pati)

जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे भाजप सोडून शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेते काही लोक येण्याची शक्यता आहे. तशी गडबड मला दोन दिवसात दिसतेय. त्यामुळे हे दोन नेते शिवसेनेत येत असावेत. शिवसेनेत आल्याशिवाय त्यांना आजी होता येणार नाही, असा चिमटा पाटील यांनी काढला.

सरकार स्थिर

महाविकास आघाडीत काहीही मतभेद नाहीत. हे सरकार स्थिर आहे. दोन वर्ष भाजपचे नेते असंच बोलत आहेत. त्याकडे काही लक्ष देण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले.

फडणवीस-पाटील एकत्र

दरम्यान, काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील एकाच मंचावर होते. विशेष म्हणजे दोघेही नेते एकाच गाडीतून कार्यक्रम स्थळी गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी.के आण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री के सी पाडवी, माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल उपस्थित आहेत. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील हे या कार्यक्रमासाठी एकाच गाडीतून आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु होती.

लगेच अंदाज बांधू नका

मी आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आलो किंवा एका गाडीत दिसलो त्याचा वेगळा अर्थ घेऊ नये. राजकारण हा फार सीरीयस बिझनेस आहे. कुणी काय बोलले यावर लगेच अंदाज बांधू नये’, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते धुळ्यात बोलत होते.

अन् इच्छा पूर्ण केली

जयंत पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी ते बावची रस्ता, आष्टा- दुधगाव रस्ता, बागणी – ढवळी – बहादूरवाडी रस्ता, ढवळी ते कोरेगांव दरम्यान दोन लहान पुल, नागाव – भडखंबे – बहादूरवाडी फाटा रस्ता या विविध कामांचे शुभारंभ करण्यात आले. वाळवा तालुक्यातील भडखंबे येथे कार्यक्रम सुरू असताना 6 वर्षीय संचित गावडेही त्यावेळी तिथे उपस्थित होता. आपल्या गावातील मोठी मंडळी नारळ फोडतानाचे चित्र पाहून लहानग्या संचितलाही याचे मोठे कुतूहल वाटले. मोठी हिम्मत करुन करून संचितने नारळ फोडण्याची इच्छा मंत्री जयंतरावांकडे व्यक्त केली. जयंत पाटील यांनी या लहानग्याची इच्छा पूर्ण केली. बर्‍याचदा आपल्या कृतींच्या माध्यमातून राजकीय नेते लोकांची मने जिंकत असतात. आज राज्याचे पाटील यांनीही आपल्या अशाच एका कृतीच्या माध्यमातून वाळवाकरांची मने जिंकली. (Chandrakant Patil and Raosaheb Danve are likely to join Shiv Sena, says jayant pati)

 

संबंधित बातम्या:

सायेब… मी पण फोडू का नारळ?… जयंत पाटलांनी केली पूर्ण 6 वर्षीय लहानग्याची इच्छा

देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील एकाच गाडीत, व्यासपीठावरही गुजगोष्टी! फडणवीस काय म्हणाले?

‘पवारांना ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार नाही, त्यांच्यावर जनताच नाराज’, मुनगंटीवारांचा जोरदार टोला

(Chandrakant Patil and Raosaheb Danve are likely to join Shiv Sena, says jayant pati)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI