महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण होणार, कसा असेल पुतळा?

महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण होणार, कसा असेल पुतळा?
cm uddhav thackeray

महाराणा प्रताप (Maharana Pratap) यांचा अश्वारुढ भव्य पुतळा माझगाव येथील महाराणा प्रताप चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्या सायंकाळी सात वाजता होणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 22, 2022 | 6:02 PM

मुंबई : तेजाभिमानी राजा म्हणून इतिहासात अजरामर नोंद झालेले महाराणा प्रताप (Maharana Pratap) यांचा अश्वारुढ भव्य पुतळा माझगाव येथील महाराणा प्रताप चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्या सायंकाळी सात वाजता होणार आहे. कोविड विषाणू संसर्ग परिस्थिती लक्षात घेता, आवश्यक त्या सर्व निर्देशांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडणार आहे. प्रत्येक भारतीय योद्ध्यासाठी प्रेरणेचा मानबिंदू असणाऱ्या महाराणा प्रताप यांचा दक्षिण मुंबईत पुतळा उभारला गेला आहे. दक्षिण मुंबईतील माझगाव परिसरात प्रभाग क्रमांक 209 मध्ये महाराणा प्रताप चौकात महाराणा प्रताप यांचा हा भव्य आणि अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे या प्रभागाचे नगरसेवक आहेत.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या दालनात दिनांक 23 एप्रिल 218 रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार महाराणा प्रताप चौकाचे सुशोभिकरण व महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याचे निश्चित करण्यात आले. हा चौक नेस्बिट मार्ग आणि शिवदास चापसी मार्ग जंक्शनवर स्थित आहे, जे मुळात वाहतूक बेट आहे व इतर पाच वाहतूक बेटाने वेढलेले आहे. चौकाचे सुशोभिकरण आणि महाराणा प्रताप यांचा पुतळा स्थापित करण्याच्या प्रस्तावाला दिनांक 5 मार्च 2019 रोजी मंजुरी मिळाली. धुळे येथील शिल्पकार सरमद शरद पाटील यांनी महाराणा प्रताप यांचा हा पुतळा साकारला आहे.

20 फूट उंचीच्या चौथऱ्यावर, 16 फूट उंचीचा हा भव्य पुतळा स्थापित करण्यात आला आहे. साडेचार टन वजनी आणि कांस्याने बनविलेला हा पुतळा भालाधारी व अश्वारूढ आहे. पुतळा उभारताना संपूर्ण चौकाचे नावीन्यपूर्ण पद्धतीने सुशोभीकरण देखील करण्यात आले आहे. या ठिकाणी चौकाला शोभेल अशी आकर्षक विद्युत रोशणाई देखील करण्यात आली आहे. वाहतूक बेटाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असताना बेस्ट बसस्थानकाजवळील एका बेटावर जुने कारंजे आढळून आले. त्याचा जीर्णोद्धार करून सुशोभीकरण करण्यात आले आहे. महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधारित विविध भित्तिशिल्प आजूबाजूच्या त्रिकोणी बेटांवर लावण्यात आले आहेत. तसेच चौक परिसरातील रस्ते सुधारणा देखील करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे विविध खाते, ई विभाग कार्यालय, बेस्ट प्राधिकरण आदींच्या समन्वयासह आणि शासनाच्या पुतळा समितीची विहित परवानगी प्राप्त करून हे काम पूर्ण करण्यात आले आहे.

Jitendra Awhad : ’10 बाय 10च्या घरात राहलोय, सार्वजनिक संडास मी पण वापरलाय’ असं जितेंद्र आव्हाड कुणाला म्हणाले?

Mumbai Fire: आग कशी विझवायची? मुंबई महापालिका देणार धडे; बीएमसीचे वरातीमागून घोडे

Mumbai Fire : कमला इमारतीच्या आगीत 6 जणांचा मृत्यू, 23 जखमी, संपूर्ण यादी एका क्लिकवर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें