Video | भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी-संजय राठोड समर्थक राजूदास जाधव यांच्यात शाब्दिक खडाजंगी, पाहा व्हिडीओ

संजय राठोड समर्थक राजूदास जाधव आणि भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्यात 'टीव्ही 9 मराठी'वर आयोजित चर्चेत बोलताना शाब्दिक खडाजंगी झाली. (Rajudas Jadhav Shivray Kulkarni Pooja Chavan suicide case)

Video | भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी-संजय राठोड समर्थक राजूदास जाधव यांच्यात शाब्दिक खडाजंगी, पाहा व्हिडीओ
राजूदास जाधव आणि शिवराय कुलकर्णी
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 5:42 PM

मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांचे नाव समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर आता राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. राजकीय दबाव वाढल्यामुळे राठोड यांनी आपला राजीनाम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवल्याची माहिती सूत्राकंडून मिळालेली आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्याचे वृत्त खोटे असून जर त्यांनी राजीनामा दिला असेल तर त्यासंबंधी उद्धव ठाकरे माहिती देतील, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. या सर्व प्रकारानंतर संजय राठोड समर्थक राजूदास जाधव (Rajudas Jadhav) आणि भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी (Shivaray Kulkarni) यांच्यात ‘टीव्ही 9 मराठी’वर आयोजित चर्चेत बोलताना शाब्दिक खडाजंगी झाली. (clash between Rajudas Jadhav and Shivray Kulkarni on the Pooja Chavan suicide case)

यावेळी बोलताना, “भाजप अजूनही संयम ठेवून आहे. पूजा चव्हाण हे प्रकरण गंभीर नाही का?, या प्रकरणावर गृहमंत्र्यांनी वक्तव्य करायला नको होतं का?, एक वक्तव्य यायला तुम्हाला तीन दिवस लागतात. राज्यात बलात्कारांची मालिका सुरु आहे. राज्यात भयंकर प्रकरणं उघडकीस येत आहेत. आज एक राज्याचा मंत्री या प्रकरणात आहे. मुलीच्या मृत्यूबाबत तिच्या कुटुंबीयांची काय स्थिती असेल? या प्रकरणावर तीन दिवसांनी सरकारची प्रतिक्रिया येते,” अशा कठोर टीका भाजप नेते शिवराय कुलकर्णी यांनी महाविकास आघाडीवर केली.

राजूदास जाधव आणि शिवराय कुलकर्णी यांच्यात शाब्दिक खडाजंगी झालेला व्हिडीओ :

कुलकर्णी यांच्या या टीकेला प्रत्युत्तर म्हणून संजय राठोड समर्थक राजूदास जाधव यांनी शिवराय कुलकर्ण यांचे सर्व मुद्दे खोडून काढले. “या प्रकरणाची चौकशी व्ही अशी सर्वांची इच्छा आहे. या प्रकरणी भापजला घाई का आहे?, यावर विचार करणे गरजेचे आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले. तसेच संजय राठोड यांना बदनाम करायचंय की पूजाला न्याय द्यायचा?, असा सवालही त्यांनी केला.

राजूदास जाधव यांच्या या वक्तव्यानंतर शिवराय कुलकर्णी आणि राजूदास जाधव यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. दरम्यान संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आलेले असले तरी त्यात तथ्य नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर बातम्या :

या लोकांना अत्याचार करायला लायसन्स दिलंय काय? – नारायण राणे

Pooja Chavan case | संजय राठोड यांच्या समर्थनार्थ रॅली, समाजाची बदनामी होत असल्याचा आरोप

राजकारणात आज मित्र असाल, उद्या नसाल, सुप्रीम कोर्टाचा भाजपला दणका, बीएमसी विरोधीपक्ष नेतेपद नाहीच

(clash between Rajudas Jadhav and Shivray Kulkarni on the Pooja Chavan suicide case)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.