काँग्रेसचे ‘सोशल मीडिया वॉरियर्स’ भाजपचा अपप्रचार रोखणार?; 428 पदाधिकाऱ्यांची मेगा कार्यकारिणी जाहीर

अभिजीत सपकाळ यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाची 428 पदाधिका-यांचा समावेश असलेली मेगा कार्यकारिणी जाहीर केली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:59 PM, 13 Jan 2021
Congress Social Media Warriors

मुंबईः भाजपतर्फे सोशल मीडियावर सुरू असलेला अपप्रचार, खोट्या बातम्या तसेच जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी काँग्रेसनं जोरदार कंबर कसलीय.  आता भाजपचा अपप्रचार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ‘सोशल मीडिया वॉरियर्स’ हाणून पाडणार आहेत, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष अभिजीत सपकाळ यांनी व्यक्त केला. (Congress ‘Social Media Warriors’ Will Stop BJP Propaganda)

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने अभिजीत सपकाळ यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाची 428 पदाधिका-यांचा समावेश असलेली मेगा कार्यकारिणी जाहीर केली. नव्या कार्यकारिणीत 48 जिल्हाध्यक्ष, 252 विधानसभा अध्यक्ष, 118 प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि 10 कोअर कमिटी सदस्य आहेत.

2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच लॉकडाऊनच्या काळात पक्षाची भूमिका जनतेतील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम सोशल मीडिया विभागाने अतिशय प्रभावीपणे केले. आगामी काळात पक्षाची ध्येयधोरणे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मेगा कार्यकारिणी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. पुढे म्हणाले की, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असलेली सक्रियता, संघटन कौशल्य, तंत्रज्ञानाचा जबाबदारीपूर्वक वापर, अशा विविध गोष्टींचा सारासार विचार करून मोठ्या छाननी प्रक्रियेतून या 428 पदाधिका-यांची निवड केली.

महिला काँग्रेस अध्यक्षपदी संध्या सव्वालाखे यांची नियुक्ती, सोनिया गांधींकडून प्रसिद्धीपत्रक जारी

महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेस पक्षाने निवडणुकांसाठी कंबर कसलीय. यासाठी काँग्रेसने महिला काँग्रेस अध्यक्षपदी संध्या सव्वालाखे यांची नियुक्ती केलीय. सोनिया गांधी यांच्या आदेशने ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. काँग्रेसकडून यासाठी एक प्रसिद्धिपत्रकही जारी करण्यात आलंय.

संबंधित बातम्या

महिला काँग्रेस पदी संध्या सव्वालाखे यांची नियुक्ती, सोनिया गांधींकडून प्रसिद्ध पत्रक जारी

हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर भाजपचे नेतेही टेन्शनमध्ये येतील: सचिन सावंत

Congress ‘Social Media Warriors’ Will Stop BJP Propaganda