Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: पुण्यात कोरोनाचा कहर सुरूच, आजही वाढले आव्वाच्या सव्वा रुग्ण

| Updated on: Jan 22, 2022 | 10:59 PM

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर (Corona Outbreak) सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE:  पुण्यात कोरोनाचा कहर सुरूच, आजही वाढले आव्वाच्या सव्वा रुग्ण
Covid testing

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर  सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात आढळून येणाऱ्या कोरोनाचा रुग्णांची संख्या पुन्हा 40 हजारांच्या वर गेली आहे. शुक्रवारी राज्यात 48 हजार 270 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 52 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 42 हजार 391 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 70 लाख 09 हजार 823 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, राज्यात शुक्रवारी ओमिक्रॉनच्या 144 रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण पुण्यातील आहेत. पुण्यात 124 रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 2343 वर पोहोचली आहे. तर, 1171 जण ओमिक्रॉन संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Jan 2022 09:06 PM (IST)

    मुंबईला दिलासा कायम

    मुंबईमध्ये 24 तासात 3 हजार 568 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

  • 22 Jan 2022 09:04 PM (IST)

    हिंगोली कोरोना अपडेट

    हिंगोली जिल्ह्यात आज नव्याने कोरोनाचे 147 रुग्ण

  • 22 Jan 2022 09:04 PM (IST)

    जालना कोरोना अपडेट

    जिल्ह्यात आज कोरोनाचे 363 नवीन रुग्ण आढळले

    जालना शहरात 257 रुग्ण

    जालना जिल्ह्यात 1546 सक्रिय रुग्ण

    कोरोनामुळे एकाही रुग्णाचा आज मृत्यु नाही

  • 22 Jan 2022 09:03 PM (IST)

    पुणे जिल्ह्यात आज सर्वाधिक रुग्णसंख्या

    तब्बल 16 हजारावर रुग्णसंख्या पोहोचली,

    24 तासात रुग्णसंख्या 16 हजार 362 वर,

    दिवसभरात 15 जणांचा झाला मृत्यू

    पुण्यात मृत्युचं घटलेलं प्रमाण वाढलं,

  • 22 Jan 2022 07:32 PM (IST)

    छगन भुजबळ काय म्हणाले?

    कोरोना मृतांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी 12 हजार 978 अर्ज प्राप्त - 8 हजार अर्ज मंजूर - 2 हजार 115 होल्डवर आहेत, त्याबाबत शंका आहे - शाळा सुरू करण्याबाबत सर्व ठिकाणाहून मागणी - हा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यायचा आहे - जिथं जास्त रुग्ण आढळले तिथल्या शाळा बंद करू - पालकांची सहमती घेऊन पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू होणार

  • 22 Jan 2022 07:29 PM (IST)

    पुण्यात कोरोनाचा कहर सुरूच

    पुणे शहरात दिवसभरात 8 हजार 248 रुग्णांची वाढ दिवसभरात रुग्णांना 7 हजार 368 डिस्चार्ज. पुणे शहरात करोनाबाधीत 09 रुग्णांचा मृत्यू

  • 22 Jan 2022 05:45 PM (IST)

    नांदेडमध्येही कोरोना रुग्ण वाढले

    नांदेड: जिल्ह्यात आज आढळले नव्याने 857 बाधित, एकट्या नांदेड शहरात आढळले 480 रुग्ण, 4050 ऍक्टिव्ह रुग्णांवर सुरू आहेत उपचार, आज 619 रुग्णांना उपचाराअंती सोडले घरी.

  • 22 Jan 2022 05:43 PM (IST)

    चंद्रपूर : कोरोना अपडेट 22-1-2022

    आजचे कोरोनाबाधित -790

    कालचे कोरोनाबाधित - 607

    आजचे कोरोनामुक्त - 341

  • 22 Jan 2022 05:13 PM (IST)

    वाशिम कोरोन अलर्ट

    जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच...

    आज एकाच दिवशी आढळले कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमधील सर्वाधिक 192 नवे रुग्ण...

    तर 69 रुग्णांना देण्यात आला डिस्चार्ज..

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - 42892...

    सद्यस्थितीत अॅक्टिव्ह - 789..

    डिस्चार्ज - 41463....

    मृत्यू - 639.....

  • 22 Jan 2022 05:12 PM (IST)

    यवतमाळ जिल्ह्यातील शाळा होणार 27 जानेवारी पासून सुरू

    यवतमाळ जिल्ह्यातील शाळा होणार 27 जानेवारी पासून सुरू

    9 वी ते 12 पर्यंतचे सर्व वर्ग होणार सुरू

    जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आदेश

    शाळा दररोज असणार 3 ते 4 तास

    9 वी ते 12 च्या सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण कॅम्प शाळेत सुरू करण्याच्याही केल्या सूचना

  • 22 Jan 2022 05:11 PM (IST)

    यवतमाळ- कोरोना अपडेट

    आज यवतमाळ मध्ये 309 जण नव्याने पॉझिटिव्ह ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1544 एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 75258 एकूण बरे झालेल्याची संख्या 71925एकूण मृत्यू 1789

    जिल्याचा पॉझिटिव्ह रेट 9.30

    मृत्यू दर 2.38 टक्के आहे

  • 22 Jan 2022 02:50 PM (IST)

    नितीन राऊत काय म्हणाले?

    26 जानेवारीपर्यंत नागपूर जिल्ह्यातील शाळा सुरु होणार नाही,

    - 26 जानेवारी नंतर परिस्थिती पाहून निर्णय घेऊ

    - नागपूरात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहेत,

    - सध्या निर्बंध लावणार नाही, भविष्यात परिस्थिती पाहून निर्णय घेऊ

    - सोमवारपासून व्यापारी आणि विविध संघटनांशी चर्चा करणार

  • 22 Jan 2022 11:49 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीला सुरुवात

    - उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीला सुरुवात,

    - आजच्या बैठकीत शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता,

    - शिवाय रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर नवीन निर्बंध लावण्याची शक्यता,

    - बैठकीला भाजप आमदार चंद्रकांत पाटील अनुउपस्थित

    - बैठकीनंतर अजितदादा मीडियाशी संवाद साधणार

  • 22 Jan 2022 10:09 AM (IST)

    ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले कोरोना पॉझिटिव्ह

    सोलापूर

    बार्शी येथील ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले कोरोना पॉझिटिव्ह

    सौम्य लक्षणे असल्याने तपासणी केली असता आला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

    डिसले यांच्यावर घरीच उपचार सुरु, ते दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

  • 22 Jan 2022 08:27 AM (IST)

    नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम,मात्र रुग्णलयात भरती होण्याचं प्रमाण कमी

    नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम,मात्र रुग्णलयात भरती होण्याचं प्रमाण कमी

    10 हजार रुग्णानपैकी फक्त 390 रुग्णांनावर उपचार सुरू

    20 रुग्ण व्हेंटिलेटरवर...

    मात्र सर्वानी नियंमांच काटेकोरपणे पालन करण्याचं आरोग्य विभागाच आवाहन

  • 22 Jan 2022 07:42 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील शाळा आणि निर्बंधाबाबत आज निर्णय होण्याची शक्यता

    - पुणे जिल्ह्यातील शाळा आणि निर्बंधाबाबत आज निर्णय होण्याची शक्यता,

    - उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या कोरोना आढावा बैठकीत निर्णयाची शक्यता,

    - शहरासह जिल्ह्यत कोरोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन

    - बैठकीला दोन्ही महापालिका आयुक्त, महापौर उपस्थित राहणार

  • 22 Jan 2022 06:13 AM (IST)

    राज्यात 48 हजार 270 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    शुक्रवारी राज्यात 48 हजार 270 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 52 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 42 हजार 391 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 70 लाख 09 हजार 823 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, राज्यात शुक्रवारी ओमिक्रॉनच्या 144 रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण पुण्यातील आहेत.

Published On - Jan 22,2022 6:10 AM

Follow us
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.