अल कायदा, लष्करसारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी दाऊद गँगचा संबंध, मुंबई बॉलिवूडमधून दाऊद जमा करतो टेरर फंडिंग, दोन हस्तकांना अटक

अल कायदा, लष्करसारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी दाऊद गँगचा संबंध, मुंबई बॉलिवूडमधून दाऊद जमा करतो टेरर फंडिंग, दोन हस्तकांना अटक
Dawood terror funding
Image Credit source: social media

दाऊद आणि त्याच्याशी संबंधितांचा लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि अल कायदासहित आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी सक्रिय संबंध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यूएपीएच्या कायद्यांर्गत अटक करण्यात आलेल्या दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्या चौकशीत त्याने ही धक्कादायक माहिती दिली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: संदिप साखरे

May 13, 2022 | 3:17 PM

मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्या गँगविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)फास आवळताना दिसते आहे. गुरुवारी रात्री उशिरा पश्चिम उपनगरांत छापेमारी करुन दाऊद गँगमधील दोन हस्तकांना एनआयएने अटक केली आहे. हे दोघेही दाऊद गँगसाठी पैसे जमा करण्याचे काम करीत होते. शुक्रवारी त्यांना स्पेशल एनआयए कोर्टात हजर केले जाणार आहे. अबूबकर शेख आणि शब्बीर शेख अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत. दहशतवादासाठी फंडिंग जमा करण्यासाठी बॉलिवूडमधील (Bollywood)अनेकांना धमक्या देत होते. हे दोघेही दाऊदचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या छोट्या शकीलशी थेट संपर्कात असल्याचे ठस पुरावेही एनआयएला मिळाले आहेत. छोटा शकीलच्या विरोधात यापूर्वीच इंटरपोलमे रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सध्या या दोघांनाही अज्ञात स्थळी हलविण्यात आल्याची माहिती आहे.

एनआयएची २९ ठिकाणांवर छापेमारी

मुंबईच्या बाहेर राहून छोटा शकील सातत्याने मुंबईत खंडणी, ड्रग्ज आणि दहशतवाद पसरवण्याचे काम करीत असल्याची एनआयएच्या सूत्रांची माहिती आहे. दिल्ली, मुंबईसह देशाच्या वेगवेगळअया शहरांत हिंसा भडकवण्यासाठी या टेरर फंडगिंचा वापर करण्यात येतो. या प्रकरणी एनआयए तपास करीत आहे.

२२ जणांची चौकशी सुरु

याच प्रकरणात मुंबई २४ ठिकाणी तर मिरा भाईंदरमध्ये ५ ठिकाणी ९ मे रोजी छापे टाकण्यात आलेत. या प्रकरणात दाऊदची बहीण हसीना पारकर हिचा मुलगा आणि छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फअरू या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यांच्यासह अन्य २० जणांची या प्रकरणात एनआयएकडून चौकशी सुरु आहे.

अनेक दहशतवादी संघटनांशी दाऊदचे संबंध

दाऊद आणि त्याच्याशी संबंधितांचा लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि अल कायदासहित आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी सक्रिय संबंध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यूएपीएच्या कायद्यांर्गत अटक करण्यात आलेल्या दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्या चौकशीत त्याने ही धक्कादायक माहिती दिली आहे.

दाऊद मुंबईतून फंड जमा करण्याचे करतोय काम

मुंबईतून सातत्याने दहशतवादासाठी फंडिंग उभारण्याचे काम दाऊदकडून सुरु असल्याची एनआयएची माहिती आहे. डी कंपनीच्या आंतरराष्ट्रीय दहशतवागी नेटवर्कमध्ये दाऊद, त्याचे सहकारी हाजी अनीस, छोटा शकील, जावेद पटेल, टायगर मेनन याच्यासह अनेक दहशतवाद्यांचा समावेश आहे. हत्यारांची तस्करी, नार्को दहशतवाद, मनी लाँड्रिंग, बनावट नोटा, दहशतवादासाठी फंड उभारणे, प्रमुख मालमत्तांवर अनधिकृत कब्जे यासह आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी सक्रिय सहयोग या सर्व प्रकरणात डी गँगची एनआयएकडून चौकशी सुरु आहे.

संदिग्ध कागदपत्रे आणि उपकरणे एनआयएच्या हाती

९ मे रोजी केलेल्या छापेमारीत अनेक इलेक्र्टॉनिक उपकरणे, मालमत्तांमध्ये गुंतवणुकीचे दस्तावेज, रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची एनआयएची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

मान्यवरांच्या हत्येचाही होता कट

डी कंपनी स्फोटकांचा आणि हत्यारांचा वापर करुन राजकीय नेते, व्यापारी आणि इतर मान्यवरांच्या हत्येचा कट डी गँगकडून रचण्यात येत होता, यासाठी स्पेशल सेल तयार करण्यात आल्याचे एनआयेने कोर्टात सांगितले आहे. इक्बाल कासकरची कोठड मिळावी, यासाठी करण्यात आलेल्या युक्तिवादात ही माहिती देण्यात आली. या निमित्ताने समाजात हिंसाचार घडवण्याचा कट असल्याची माहितीही देण्यात आली आहे. देशाची राजधानी दिल्लीसह देशातील विवध भागांत हिंसा घडवण्याचा डी गँगचा कट असल्याची माहिती एनआयएने दिली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें