डोंगरी इमारत दुर्घटना : 18 तास उलटूनही बचाव कार्य सुरू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

डोंगरी इमारत दुर्घटना : 18 तास उलटूनही बचाव कार्य सुरू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

मुंबईतील डोंगरी परिसरात काल (16 जुलै) चार मजली इमारत कोसळून भीषण दुर्घटना घडली. यात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Namrata Patil

|

Jul 17, 2019 | 8:54 AM

मुंबई : मुंबईतील डोंगरी परिसरात काल (16 जुलै) चार मजली इमारत कोसळून भीषण दुर्घटना घडली. यात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान एनडीआरएफच्या जवानांकडून इमारत कोसळलेल्या परिसरात अद्याप बचाव कार्य सुरु आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

एनडीआरएफने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 23 जणांना बाहेर करण्यात आलं आहे. यात 9 महिला, 9 पुरुष आणि 5 लहान मुलांचा समावेश आहे. त्यातील जवळपास 23 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 7 पुरुष, 7 महिला, 3 लहान मुलांचा समावेश आहे.

दरम्यान ही दुर्घटना घडून 18 तास उलटले आहेत. तरी अद्याप बचाव कार्य सुरु आहे. काल रात्री उशीरापर्यंत मृतांचा आकडा 10 होता. त्यानंतर सकाळी बचावकार्यादरम्यान आणखी दोघांना बाहेर काढण्यात आले. त्यानतर नुकतंच या बचावकार्यादरम्यान आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले.

नेमकं काय घडलं?

मंगळवारी (16 जुलै) मुंबईतील डोंगरी परिसरात तुरळक पाऊस सुरु होता. त्या ठिकाणी जोरात वारा वाहू लागला. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात सकाळी 11.40 च्या सुमारास डोंगरीतील तांडेल रोडवरील अब्दुल हमिद दर्गा परिसरातील केसरबाई इमारत कोसळली. इमारत कोसळल्यानंतर फार मोठा आवाज झाला. यामुळे स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

त्यानंतर स्थानिकांनी तातडीने पोलिसांना कळवण्यात आले. तातडीने एनडीआरएफच्या टीम, अग्निशामक दलाला बचाव कार्यासाठी पाठवण्यात आले.

बचावकार्यात अडथळा

डोंगरी भाग अत्यंत दाटीवाटीचा असल्याने त्याठिकाणी रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पालिकेची बचाव यंत्रणा बचावकार्य करण्यास अडथळा निर्माण होत आहे. तसेच एनडीआरएफच्या जवानांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. घटना घडल्यानंतर तब्बल दीड तासाने एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एनडीआरएफच्या जवानांनी तातडीने बचाव कार्य हाती घेतले.

म्हाडाची इमारत

दरम्यान डोंगरी परिसरातील इमारत म्हाडाची होती. या इमारतीत जवळपास 15 कुटुंब राहात होते, अशी माहिती मिळत आहे. सुदैवाने मुंबईत आज पाऊस पडत नाही, त्यामुळे बचावकार्य वेगाने सुरु आहे. बचावकार्यादरम्यान अनेकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून तातडीने जवळच्या नायर आणि हबीब रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

16 जुलै – रात्री 8 पर्यंत मृतांचा आकडा

डोंगरी परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मंगळवारी 16 जुलैच्या रात्री 8 पर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला होता. यात 5 पुरुष, 5 महिला आणि एका दीड वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश आहे.

17 जुलै – सकाळी 8 पर्यंत मृतांचा आकडा

काल डोंगरी परिसारत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आज सकाळपर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 6 पुरुष, 4 महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे.

बचाव कार्यासाठी आणखी 5 तास लागणार

दरम्यान ही दुर्घटना घडून अद्याप 18 तास उलटले आहेत. तरीही एनडीआरएफचे जवान शर्थीचे प्रयत्न करुन ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढत आहे. मात्र हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहे. तसेच हे बचाव कार्य पूर्ण होण्यासाठी जवळपास 5 ते 6 तास लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित बातम्या : 

डोंगरीत 4 मजली इमारत कोसळली, मृतांचा आकडा वाढताच

VIDEO : चार मजली इमारतीच्या ढिगाऱ्याखालून चिमुकल्याला अलगद बाहेर काढले

फोटो : मुंबईतील डोंगरीत 4 मजली म्हाडाची इमारत कोसळली

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें