Mumbai Local Train Latest Update: लोकल सुरू करण्याचा निर्णय ‘या’ आठवड्यात होणार; विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल ट्रेन (Mumbai Local Train) सामान्य प्रवाशांसाठी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

  • हेमंत बिर्जे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 18:36 PM, 13 Jan 2021
Local Start Next Month

मुंबईः ”लोकल सुरू करण्यासाठी आम्ही सर्व तयारी केली आहे. या आठवड्यात मुंबई लोकल सुरू करण्यावर निर्णय होईल”, असं विधान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय. त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे केंद्र सरकारही मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्यासंदर्भात गांभीर्याने विचार करत आहे. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल ट्रेन (Mumbai Local Train) सामान्य प्रवाशांसाठी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. (Decision To Start The Local Next Month; Says Vijay Vadettiwar)

गेल्या नऊ महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली मुंबईकरांची लाईफलाईन 15 डिसेंबर आणि त्यानंतर 1 जानेवारीपासून पूर्ववत सुरू होईल, अशी चर्चा होती. मात्र अद्याप याबाबत कोणतीही हालचाल होताना दिसत नाहीये. दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा या राज्यांत कोरोनाची दुसरी लाट आली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी खबरदारी घेतलीय. त्यामुळे लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची शक्यता धूसर मानली जातेय. कोरोनाचा धोका पाहता नव्या वर्षातील कोरोनाच्या रुग्णसंख्येवर पालिका प्रशासन नजर ठेवणार आहे. यानंतरच लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारला कळवले जाईल, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली होती.

नव्या वर्षात कोरोनाची स्थिती बघून लोकलबाबत निर्णय घेऊः राजेश टोपे

येत्या नव्या वर्षात कोरोनाची स्थिती बघून लोकलबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिलीय. अनलॉकच्या काही टप्प्यांमध्ये आतापर्यंत अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि महिलांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्यात आलीय. नव्या वर्षात कोरोना रुग्णांची संख्या काय आहे ते आम्ही बघणार आहोत. जर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली नाही तर लोकल ट्रेनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्कीच सकारात्मक विचार करतील. आम्हाला ठाऊक आहे की, लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन आहे. सध्या सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पण याबाबत लवकरच निर्णय घेऊ”, अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली होती.

….तर आम्ही आताही लोकल सुरु करू, मुंबईच्या पालकमंत्र्यांचं मोठं विधान : अस्लम शेख

केंद्राने परवानगी दिली तर आम्ही आताही लोकल सुरू करू. आम्ही केंद्राला यासंदर्भात पत्र दिले आहे, असं विधान मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलं होतं.

संबंधित बातम्या

Mumbai Local Train Update : नव्या वर्षात मुंबई लोकल धावणार का? आरोग्य मंत्री म्हणतात…

मुंबईत लोकल ट्रेनचा नवा फॉर्म्युला; सर्वांना प्रवास करण्यासाठीचं नियोजन लवकरच जाहीर

Decision To Start The Local Next Month; Says Vijay Vadettiwar