Devendra Fadnavis:नॉट रिचेबलने सुरू झालेल्या प्रवासाचा शेवट गोड होणार; मुंबईपासून सुरू झालेला प्रवास आज थांबणार; संजय राऊतांनीही दिल्या शुभेच्छा

एकनााथ शिंदे यांनी महाविकास आघाडीबरोबरचे युती तोडा आणि भाजपसोबत हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आपण पुन्हा सत्तास्थापन करा असा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतरही त्या प्रस्तावाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणाताही प्रतिसाद न देता समोर येऊन चर्चा करण्याचे आवाहन बंडखोर आमदारांना करण्यात आली.

Devendra Fadnavis:नॉट रिचेबलने सुरू झालेल्या प्रवासाचा शेवट गोड होणार; मुंबईपासून सुरू झालेला प्रवास आज थांबणार; संजय राऊतांनीही दिल्या शुभेच्छा
देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांचा सत्तास्थापनाचा दावा
महादेव कांबळे

|

Jun 30, 2022 | 4:31 PM

मुंबईः विधान परिषदेच्या निकालानंतर सुरू झालेल्या बंडखोरी नाट्याचा शेवटच्या अंकाचा आज पडदा पडणार आहे. मुंबई-सूरत-गुवाहाटी-गोवा आणि पुन्हा मुंबई असा सुरू झालेला शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा (Shivsena Rebel MLA) प्रवास एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीने होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर पहिल्या प्रथम नॉट रिचेबल झाले (Not Reachebal) ते शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde). त्यानंतर सुरमध्ये असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मात्र शिंदे गटात बंडखोर आमदारांचे इनकमिंग सुरुच राहिले. सुरूतहून नंतत गुवाहाटाली बंडखोर आमदारांचा ताफा हरविल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला.

याकाळात एकनााथ शिंदे यांनी महाविकास आघाडीबरोबरचे युती तोडा आणि भाजपसोबत हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आपण पुन्हा सत्तास्थापन करा असा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतरही त्या प्रस्तावाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणाताही प्रतिसाद न देता समोर येऊन चर्चा करण्याचे आवाहन बंडखोर आमदारांना करण्यात आली.

भाजपच्या गोठात उधान

या बंडखोरी नाट्यात आता भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात येत असले तरी त्यामध्ये भाजपने मात्र बडंखोरी नाट्यात आपला सहभाग असल्याचे जाहीररित्या कुठेच सांगितले नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर मात्र भाजपच्या गोठात उधान आले आणि पेढे भरून सत्तास्थापना होणार असल्याने तो आनंद साजराही करण्यात आला.

बंडखोरी नाट्य शेवटाकडे

त्यानंतर मात्र राजभवनाच्या दिशेने खऱा प्रवास फडणवीस आणि शिंदे यांचा सुरू झाला. एकनाथ शिंदे गुरूवारी सकाळी गोव्याहून मुंबईत आल्यानंतर मात्र हे चित्र स्पष्ट होत, आता बंडखोरी नाट्य शेवटाकडे चालला आहे हे चित्र स्पष्ट झाले.

प्रवासाचा शेवट गोड

एकनाथ शिंदे यांचे मुंबई आगमन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक आणि एकनाथ शिंदे यांचे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत झाले. त्यानंतर मात्र बंडखोर आमदार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनाकडे प्रस्थान झाले, आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे नॉट रिचेबलने सुरू झालेल्या या प्रवासाचा शेवट गोड होणार हे स्पष्ट झाले.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें