Maharashtra Budget Session 2021: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलवर 27 रुपये कर, नऊ राज्यांत इंधन स्वस्त, फडणवीसांनी गणित मांडलं

देशातल्या सर्वाधिक पेट्रोलचे भाव असणारा राज्यांपैकी महाराष्ट्र एक आहे, असा दावा फडणवीसांनी केला. (Devendra Fadnavis Petrol Diesel Tax )

Maharashtra Budget Session 2021: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलवर 27 रुपये कर, नऊ राज्यांत इंधन स्वस्त, फडणवीसांनी गणित मांडलं
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते महाराष्ट्र
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 12:19 PM

मुंबई : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा म्हणजे निव्वळ फार्स आहे. राज्य सरकारने स्वतः पेट्रोल-डिझेलवर 27 रुपये कर लावला आहे. महाराष्ट्र हे सर्वाधिक पेट्रोल दर असलेल्या राज्यांपैकी एक आहे, असं म्हणत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पेट्रोल-डिझेलवरील कराचं गणित मांडून दाखवलं. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) पार्श्वभूमीवर फडणवीस बोलत होते. (Devendra Fadnavis on Petrol Diesel Tax in Maharashtra Budget Session)

“सायकल मोर्चा म्हणजे निव्वळ फार्स”

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा म्हणजे निव्वळ फार्स आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर हे गुजरातसह नऊ राज्यांच्या तुलनेत दहा रुपयांनी अधिक आहेत. काही ठिकाणी पेट्रोल पाच-सात रुपयांनी स्वस्त आहे. देशातल्या सर्वाधिक पेट्रोलचे भाव असणारा राज्यांपैकी महाराष्ट्र एक आहे, असा दावा फडणवीसांनी केला.

“राज्य सरकारकडून 27 रुपये कर पेट्रोल-डिझेलवर”

महाराष्ट्रामध्ये स्वतः पेट्रोल आणि डिझेलवर 27 रुपये कर लावलेला आहे. केंद्र सरकारचा एकूण कर 33 रुपये आहे. त्यामध्ये चार रुपये हे कृषी सेस, तर चार रुपये डीलर कमिशन आहे. उर्वरित पैशांपैकी 42 टक्के पैसे केंद्र सरकार राज्यांना परत करतं. राज्य सरकारने मात्र 27 रुपये कर पेट्रोल-डिझेलवर लावलेला आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

मला असं वाटतं की नाना पटोले यांचं आंदोलन हे राज्य सरकारविरोधात असावं. 27 रुपयांचा टॅक्स कमीत कमी करावा किंवा इतर राज्यांप्रमाणे किमान दहा रुपयांनी पेट्रोल डिझेल स्वस्त करावं, यासाठी त्यांचं आंदोलन असावं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

“श्रेय घेण्यासाठी नाना पटोलेंची हुशारी”

दुसरी शंका अशी आहे, की नाना पटोले फार हुशार आहेत. आता तुमच्या माध्यमात चर्चा चालली होती, की या बजेटमध्ये अजितदादा काहीतरी दोन-तीन रुपयांनी पेट्रोल डिझेलचे कर कमी करणार आहेत. अशा प्रकारचा सायकल मोर्चा काढून त्यांनी ते श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता आहे, असंही फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis on Petrol Diesel Tax in Maharashtra Budget Session)

नाना पटोलेंच्या नेतृत्वात सायकल मोर्चा

इंधन दरवाढीवर काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं. काँग्रेस मंत्री आणि आमदार सायकलने विधानभवनात आले. “सामान्यांच्या तोंडातील घास हिसकवण्याचा प्रयत्न केला जातोय. मोदी सरकार रोज पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढवले जात आहेत. केंद्र सरकार लुटारुप्रमाणं वागतेय.” अशी टीका काँग्रेसने केली.

काँग्रेसची अवस्था केविलवाणी – फडणवीस

काँग्रेसला विरोधीपक्षांची जागा घेता येणार नाही. देशात काँग्रेसची अवस्था केविलवाणी आहे, अशा अवस्थेत ते मीडिया इवेंट करत आहेत. वीज बिलाचा मुद्दा महत्वाचा आहे. वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम राज्यात यापूर्वी कधी झाली नाही. अतिवृष्टीची मदत झाली नाही. कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर राज्य सरकारला घेरणार आहोत, असं फडणवीसांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांनी सांगावं, क्लिप्स खऱ्या की खोट्या, ठाकरेंच्या नैतिकतेवर देवेंद्र फडणवीसांकडून प्रश्नचिन्ह

 तुमची नैतिकता जनता ठरवेल, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

(Devendra Fadnavis on Petrol Diesel Tax in Maharashtra Budget Session)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.