ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांना दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार

ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांना हा पुरस्कार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरबीर सिंह, नरेंद्र वाबळे, हारीस शेख व पुष्पा यांच्या समितीने अनंत बागाईतकर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांना दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार
ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांना दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 8:02 AM

मुंबईः पत्रकार दिनू रणदिवे (Journalist Dinu Randive) स्मृती पारितोषिक समितीतर्फे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वृत्तपत्र क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकाराला दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षीचा पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पारितोषिक ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर (Journalist Anant Bagaitkar) यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे 16 जून 2020 निधन झाले. त्यांच्या अनेक प्रकारचे कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वृत्तपत्र क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकाराला हा पुरस्कार दिला जातो. या आधीचा हा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रताब आसबे (Pratap Asabe) यांना 2021-22 मध्ये जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आता अनंत बागाईतकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून दिनू रणदिवे यांच्या स्मृतीदिनी गुरुवारी 16 जून रोजी मुंबईत प्रदान केला जाणार आहे.

ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांना हा पुरस्कार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरबीर सिंह, नरेंद्र वाबळे, हारीस शेख व पुष्पा यांच्या समितीने अनंत बागाईतकर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

‘सिंहासन’ चित्रपटातील दिगू टिपणीस म्हणजेच दिनू रणदिवे

महाराष्ट्रातील नावाजलेल्या आणि धडाडीच्या महत्वाच्या पत्रकारांमधील एक नाव म्हणजे पत्रकार दिनू रणदिवे. 1925 मध्ये जन्मलेल्या दिनू रणदिवे यांनी 1956 पासून पत्रकारितेला सुरुवात केली होती. आपल्या पत्रकारितेत त्यांनी दलित, उपेक्षित, वंचित यांच्या प्रश्नांना त्यांनी कायमच स्थान दिले होते. जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते कायमच प्रयत्न करत राहिले. सिंहासन’ चित्रपटातील दिगू टिपणीस नावाचे जे पात्र आहे तो दिनू रणदिवे आणि जगन फडणीस यांमधून तयार झाले होते.

गोवा मुक्तिसंग्रामात सक्रिय

समाजवादी पक्षाने 1955 मध्ये गोवा मुक्तिसंग्राम पुकारल्यानंतर त्यांनी दिनू रणदिवे यांनी त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला होता. त्याबरोबरच त्यांनी महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सहभाग होता. महाराष्ट्र चळवळीच्या लढ्यात आचार्य अत्रे यांच्यासोबत दिनू रणदिवे यांनी तुरुंगवास भोगला होता. 1956 महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र समितीने संयुक्त महाराष्ट्र पत्रिका नावाचे अनियतकालिक सुरु केले. त्या अनियकालिकेच्या माध्यमातूनच दिनू रणदिवे यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर ते दीर्घकाळ महाराष्ट्र टाईम्समध्ये कार्यरत होते, व 1985 मध्ये ते महाराष्ट्र टाईम्समधून निवृत्त झाले. त्यांना त्यांच्या पत्रकारितेतील कार्याबद्दल मुंबई प्रेस क्लबच्या जीवन गौरव पुरस्काराने गौरव केला होता.

राजकारण्यांशी घनिष्ठ संबंध पण विरोधातही परखड लेखन

सिंहासन’ चित्रपटातील दिगू टिपणीस नावाचे जे पात्र आहे तो दिनू रणदिवे आणि जगन फडणीस यांमधून तयार झाले होते. रणदिवे यांचे यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब खेर, बॅ. वानखेडे, वसंतदादा पाटील, जॉर्ज फर्नांडिस, बाळासाहेब ठाकरे, शरद जोशी अशा असंख्य राजकारण्यांबरोबर त्यांचे उत्तम संबंध होते. पण, प्रसंगी त्यांच्या विरोधातही रणदिवे त्यांनी लिखान केले होते. त्यामुळे पत्रकार व राजकारणी यांच्यात दिनू नावाने ओळखल्या जाणाऱ्या रणदिवे यांच्याविषयी सर्वांनाच भीतीयुक्त आदर होता.

अनंत बागाईतकर यांची पत्रकारिता

अनंत बागाईतकर हे गेल्या 40 वर्षांपासून सक्रिय पत्रकारितेत आहेत. पत्रकारितेची पदवी संपादन करून पुण्यातील ‘दैनिक केसरी’ वृत्तपत्रातून डिसेंबर 1979 मध्ये त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. 1986 मध्ये ‘दैनिक केसरी’चे दिल्ली विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांनी कार्याला सुरुवात केली. 1989-1994 या काळात त्यांनी ‘जन्मभूमी’ या गुजराती वृत्तपत्र समूहासाठीही दिल्ली विशेष प्रतिनिधी म्हणून कार्य केले. 1994 पासून त्यांनी दैनिक सकाळच्या दिल्ली ब्युरो कार्यालयात विशेष प्रतिनिधी म्हणून कार्याला सुरुवात केली.‘माध्यमे आणि राजसत्ता’ ही त्यांची पुस्तिका प्रकाशित आहे.

Non Stop LIVE Update
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.