मुंबईकरांनो पाणी जपून वापरा ! पंम्पिंग स्टेशनच्या कामामुळे 10 टक्के पाणीकपात, कोणत्या भागांना फटका बसणार ?

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पांजरापूर संकुलातील मुंबई 3 अ उदंचन केंद्रामध्ये (pumping station) 900 मिलीमीटर व्यासाची झडप (Sluice Valve) बसविण्याच्या कामकाजासाठी गुरुवार दिनांक 26 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8 वाजेपासून शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत असे एकूण 24 तासांकरीता सदर उदंचन केंद्र बंद राहणार आहे.

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा ! पंम्पिंग स्टेशनच्या कामामुळे 10 टक्के पाणीकपात, कोणत्या भागांना फटका बसणार ?
PUNE-WATER
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 7:28 PM

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पांजरापूर संकुलातील मुंबई 3 अ उदंचन केंद्रामध्ये (pumping station) 900 मिलीमीटर व्यासाची झडप (Sluice Valve) बसविण्याच्या कामकाजासाठी गुरुवार दिनांक 26 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8 वाजेपासून शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत असे एकूण 24 तासांकरीता सदर उदंचन केंद्र बंद राहणार आहे. या कारणाने या कालावधित पश्चिम उपनगरे, शहर भागातील एफ/दक्षिण व एफ/उत्तर वगळून सर्व विभाग तर पूर्व उपनगरातील एल व एन विभागात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. (due to repair work Mumbai Municipal Corporation will cut 10 percent water)

पांजरापूर नवीन उदंचन संच बसविण्यात येणार 

मुंबई शहर, पश्चिम उपनगरे व पूर्व उपनगरातील काही विभागांचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर येथील मुंबई 3 अ उदंचन केंद्रामध्ये 80 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा एक नवीन उदंचन संच बसविण्यात येणार आहे. हा उदंचन संच बसविण्यापूर्वी 900 मिलीमिटर व्यासाची एक नवीन झडप बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पांजरापूर येथील मुंबई 3 अ उदंचन केंद्र हे गुरुवार दिनांक 26 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8 वाजेपासून शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत असे एकूण 24 तासांकरीता बंद ठेवण्यात येणार आहे.

24 तासांसाठी 10 टक्के पाणीकपात

परिणामी भांडुप संकुलास होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये सुमारे 10 टक्के पाणीकपात होईल.या कारणाने, उपरोक्त कालावधित भांडुप संकुलद्वारे होणाऱ्या पश्चिम उपनगरे तसेच शहर भागातील एफ/दक्षिण व एफ/उत्तर वगळून सर्व विभाग तर पूर्व उपनगरातील एल व एन विभागात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

पाण्याचा आवश्यक तितका साठा करुन ठेवावा

दरम्यान, या कालावधीतील पाणीकपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक तितका साठा करुन ठेवावा. तसेच, पाणीकपातीच्या काळात काटकसरीने पाणी वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

इतर बातम्या :

Maharashtra IPS Transfer : राज्याच्या पोलीस दलात मोठे फेरबदल, कुणाची कुठे बदली?

मुंबईच्या महापौरपदासाठी काँग्रेसची मदार अभिनेते, सेलिब्रेटींवर? स्ट्रॅटेजी कमिटीचा अहवाल, तीन नावं चर्चेत

Ganesh Chaturthi 2021 : यंदाचा गणेशोत्सवही साधेपणानं, चार फुटांची मूर्ती आणता येणार, पाहा संपूर्ण नियमावली

(due to repair work Mumbai Municipal Corporation will cut 10 percent water)

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.