अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात पोलिसात तक्रार

अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात पोलिसात तक्रार


मुंबई : मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्याला शिवीगाळ करुन मारहाण केली, असा आरोप फॅशन डिझायनर जान्हवी मानचंदाने केला आहे. जान्हवी मानचंदा हिने मीरा रोड येथील काशीमीरा पोलिस ठाण्यात अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात तक्रारही दाखल केली आहे.

फॅशन डिझायनरने प्राजक्ता माळीविरोधात मारहाण आणि शिवागाळीची तक्रार काशीमीरा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर, पोलिसांनी प्राजक्ता माळीविरोधात  कलम 232 आणि कलम 504 अन्वये तक्रार दाखल करुन घेतली.

दरम्यान, या प्रकरणात अभिनेत्री प्राजक्ता माळी हिची बाजू अद्याप कळू शकली नाही.

कोण आहे प्राजक्ता माळी?

प्राजक्ता माळी मराठी सिनेमा, मालिका आणि नाटकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जुळून येती रेशीमगाठी, नकटीच्या लग्नाला यायाचं हं यांसारख्या मालिकांमधून प्राजक्ता माळी घराघरात पोहोचली. प्राजक्ताने मराठीतील अनेक सिनेमांमध्येही काम केले आहे. संघर्ष, खो खो, हम्पी, गोळाबेरीज, डॉ. काशीनाथ घाणेकर यांसह अनेक सिनेमात महत्त्वाची भूमिका प्राजक्ताने साकारली आहे. तसेच, निम्मा शिम्मा राक्षस, शिवपुत्र संभाजीराजे, प्लेझंट सरप्राईज अशा नाटकांमधूनही काम केले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI