भारतीय चलन दाखवा, परदेशी नागरिकाची हातचलाखी, बंडल लंपास

भारतीय चलनाच्या नोटा पाहण्याच्या बहाण्याने 24 हजार 500 रूपयांच्या नोटा लंपास करणाऱ्या इराणी नागरिकाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली

भारतीय चलन दाखवा, परदेशी नागरिकाची हातचलाखी, बंडल लंपास
Follow us
| Updated on: Nov 22, 2019 | 8:01 AM

पुणे : भारतीय चलनाच्या नोटा पाहण्याच्या बहाण्याने 24 हजार 500 रूपयांच्या नोटा लंपास करणाऱ्या इराणी नागरिकाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली (Foreigner Citizen Stole Indian Currency). पुण्याच्या येरवडा भागातील एका औषधांच्या दुकानातून दोन दिवसांपूर्वी नोटा चोरल्या होत्या. सीसीटीव्हीद्वारे या चोरट्याचा माग काढत कॅम्पातील ढोले पाटील रोडवरील एका हॉटेलमधून त्याला पत्नीसह ताब्यात घेण्यात आले (Foreigner Citizen Stole Indian Currency).

महंमद शमसाबाद अबोलफझल असे या चोरट्याचे नाव आहे. तो इराण मधील तेहरान इथला नागरिक आहे. त्याच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महंमद शमसाबाद आणि त्याची पत्नी रेशमा अहमदी फिरोज हे दोघे सोमवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास फिर्यादीच्या मेडिकल शॉपमध्ये औषधे खरेदी करण्याच्या बहाण्याने आले (Foreigner Citizen Stole Indian Currency).

मी तुर्कस्तानचा नागरिक असून मला भारतीय चलनातील नोटा पहायच्या आहेत, अशी विनंती त्याने केली. त्यानुसार, फिर्यादीने त्याला 50 हजार रूपयांच्या नोटांचे बंडल काढून दाखवले. आरोपीने नोटा चाळत असताना त्यातील 24 हजार 500 रूपयांच्या नोटा हातचाखालीने काढून घेतल्या आणि पत्नीसह तेथून पोबारा केला. हा प्रकार घडल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. दुकानातील सीसीटीव्ही मध्ये हे दोघे कैद झाले होते. त्यावरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या दोघांशी मिळते-जुळते दोघेजण कॅम्प परिसरातील हॉटेलमध्ये राहात आहेत, अशी माहिती पथकातील कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार, बुधवारी (20 नोव्हेंबर) रात्री पोलिसांनी हॉटेलमध्ये सापळा रचला. जेवणासाठी महमंद आपली पत्नी आणि मुलासह बाहेर पडताच पोलिसांनी ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये दुकानातून चोरलेली रक्कम जप्त करण्यात आली. महंमद आपल्या पत्नी आणि मुलासह जून 2019 मध्ये इराण येथून टुरिस्ट व्हिजावर भारतात राहतो आहे.

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.