Mumbai Ganpati Festival : मूर्तीच्या उंचीची मर्यादा हटवल्यानंतर गणपतीच्या पीओपी मूर्तीलाही परवानगी! बीएमसीचा मोठा निर्णय

BMC on Ganpati Idol : मुंबईतल्या गणेशोत्सव समन्वय समितीच्या मागणीला अखेर यश आलंय.

Mumbai Ganpati Festival : मूर्तीच्या उंचीची मर्यादा हटवल्यानंतर गणपतीच्या पीओपी मूर्तीलाही परवानगी! बीएमसीचा मोठा निर्णय
गणपती बाप्पाच्या मूर्तीबाबत मोठा निर्णयImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 8:16 AM

मुंबई : गणपतीच्या (Ganpati Idol) मूर्तीची उंचीवरील बंधन हटवल्यानंतर आता पीओपी मूर्तीलाही परवानगी देण्यात आल्याची मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारे गणेशभक्त खूश झालेत. मुंबईतल्या (Mumbai News) गणेशोत्सव समन्वय समितीच्या मागणीला अखेर यश आलंय. मुंबई पालिकेनं (BMC) यंदा पीओपीच्या मूर्तीला परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये या वर्षी गणेशोत्सवात पीओचीच्या मूर्तीचं देखील पूजन होईल. मुंबई महापालिकेनं याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय गेतला आहे. दरम्यान, गणेशोत्सव मंडळाना उंचीचं बंधन नसलं, तरी घरगुती पीओपी मूर्ती दोन फुटांचीच असावी, असंही पालिकेनं स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे पुढच्या वर्षापासून पीओपी मूर्तीवर पूर्ण बंदी राहणार असल्याचंदेखील बीएमसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे किमान यंदा गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तीला परवानगी देण्यात आल्यानं, गणेशमूर्तीकारांसह गणेशभक्तांनाही मोठा दिलासा मिळालाय.

संभ्रमामुळे दिलासा…

पीओपीच्या मूर्तीमुळे प्रदूषण होतं, असं सांगितलं जातं. त्यामुळे शक्यतो पीओपीच्या मूर्ती वापरु नयेत, इकोफ्रेन्डली किंवा पर्यावरपूरक मूर्तीचा वापर जास्तीत जास्त करावा, असं आवाहन दरवर्षीच पालिकेकडून केलं जातंय. मात्र आता केंद्रीय प्रदूष नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्तांत संभ्रम आही.

जारी केलेल्या एसओपीबाबत काही मुद्दे गोंधळात टाकणारे असल्याचं सांगितलं जात होतं. अशातत गणेशोत्सव समन्वय समितीनं पालिकेकडे पीओपीच्या मूर्ती बवनण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केलेली होती. अखेर मागणी आता मान्य करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

पाहा स्पेशल रिपोर्ट : भाजपचा मास्टरस्ट्रोक

आधी उंची, आता मूर्ती

महापालिकेनं याबाबतचं परिपत्रकही जारी केलंय. गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे आता गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये पीओपीच्या मूर्ती बनवण्याच्या कामाला पुन्हा एकदा वेग आलाय. दरम्यान, दोन दिवस आधीच मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही दिलासादायक असा निर्णय घेण्यात आलेला होता. गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या उंचीवर कोणतीही मर्याद नसेल, असं स्पष्ट करण्यात आलं होतं. शिवसेना आणि गणेशोत्सव समन्वय समितीसोबतच्या झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी सकारात्मक चर्चा केल्याची माहिती शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी याबाबतची दिली होती.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.