Mumbai Local Train: आता मुंबईकरांना एसी लोकलमधून गारेगार प्रवास शक्य, तिकीट दर कमी होणार; काय असेल भाडे?

लोकलमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. आता मुंबईकरांना एसीच्या लोकलमधूनही प्रवास करणं शक्य होणार आहे. रेल्वे बोर्डाने एसी लोकलचा प्रवास स्वस्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

Mumbai Local Train: आता मुंबईकरांना एसी लोकलमधून गारेगार प्रवास शक्य, तिकीट दर कमी होणार; काय असेल भाडे?
एसी लोकलचा प्रवास स्वस्त
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 4:57 PM

मुंबई: लोकलमधून (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी (mumbaikar) खूशखबर आहे. आता मुंबईकरांना एसीच्या लोकलमधूनही प्रवास करणं शक्य होणार आहे. रेल्वे बोर्डाने एसी लोकलचा प्रवास स्वस्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. एसी लोकलच्या (ac local) सिंगल जर्नीचं भाडं कमी करावं. तसेच मेट्रो ट्रेनच्या तिकीट दरावर एसी लोकलचं भाडं ठरवण्यात यावं, असा प्रस्तावच रेल्वे बोर्डाने दिला आहे. बोर्डाचा हा प्रस्ताव स्वीकारल्यास मुंबईकरांना लवकरच स्वस्तात एसी लोकलमधून प्रवास करता येणार आहे. त्यामुळे लोकलवरील गर्दी कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या एसी लोकलला म्हणावा तेवढा प्रतिसाद नाही. त्यामुळे एसी लोकलच्या फेऱ्याही कमी ठेवण्यात आल्या आहेत. कमी फेऱ्या असूनही या लोकलमधून अत्यंत अल्प प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे या एसी लोकल रेल्वेसाठी पांढरा हत्ती ठरताना दिसत आहेत. त्यामुळेच एसी लोकलचं उत्पन्न वाढवण्यासाठीच रेल्वे बोर्डाने एसी लोकलचं तिकीट भाडं कमी करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला दिला असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

रेल्वे बोर्डाने जो प्रस्ताव दिला आहे. तो मंजूर झाल्यास मुंबईकरांना स्वस्तात प्रवास करता येणार आहे. एसी सिंगल जर्नीसाठी प्रवाशांना 10 रुपयांपासून 80 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजे हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तिकीट दरात मोठी कपात होणार आहे. सध्या प्रवाशांना तिकीटापोटी 65 रुपयांपासून ते 220 रुपये मोजावे लागत आहेत. मात्र, या प्रस्तावात सीजन तिकीटाचे दर कमी करण्यावर काहीच वाच्यता करण्यात आलेली नाही.

रेल्वे कार्पोरेशन टेंडर काढणार

तिकीट दर कमी झाल्याने गर्दीच्या वेळी आणि गर्दी नसतानाही प्रवासी संख्येत वाढ होईल. त्यामुळे लोकांना प्रवास करणं सुलभ होईल. त्यामुळे लवकरच सर्व 238 एसी ट्रेनसाठी टेंडर काढलं जाणार आहे. प्रवाशांना त्यामुळे चांगली आणि उत्तम सुविधा मिळणार असल्याचं रेल्वे बोर्डाने म्हटलं आहे.

प्रस्तावित भाडे किती?

5 किमीसाठी सध्या 65 रुपये द्यावे लागतात, आता 10 रुपये द्यावे लागतील 10 किमीसाठी सध्या 65 रुपये द्यावे लागतात, आता 20 रुपये द्यावे लागतील 15 किमीसाठी सध्या 90 रुपये द्यावे लागतात, आता 30 रुपये द्यावे लागतील 20 किमीसाठी सध्या 135 रुपये द्यावे लागतात, आता 40 रुपये द्यावे लागतील 25 किमीसाठी सध्या 135 रुपये द्यावे लागतात, आता 50 रुपए द्यावे लागतील 30 किमीसाठी सध्या 175 रुपये द्यावे लागतात, आता 60 रुपये द्यावे लागतील 35 किमीसाठी सध्या 180 रुपये द्यावे लागतात, आता 70 रुपये द्यावे लागतील 40 किमीसाठी सध्या 190 रुपये द्यावे लागतात, आता 80 रुपये द्यावे लागतील 55 किमीसाठी सध्या 205 रुपये द्यावे लागतात, आता 80 रुपये द्यावे लागतील 60 किमीसाठी सध्या 220 रुपये द्यावे लागतात, आता 80 रुपये द्यावे लागतील

संबंधित बातम्या:

हिमालयातल्या अज्ञात साधूच्या इशाऱ्यावर कोट्यवधींचा शेअर बाजार? माजी सीईओ चित्रा रामकृष्णांवर छापे, म्हणतात, ती एक अदृश्य शक्ती!

हिंदुस्थानी भाऊला जामीन मंजूर; विद्यार्थी आंदोलनप्रकरणी झाली होती अटक

Maharashtra News Live Update : औरंगाबाद शहरातील शिवजयंतीच्या वादावर अखेर पडला पडदा

Non Stop LIVE Update
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.