मुंबईजवळ मासिकाच्या संपादकाची हत्या

मुंबईजवळ मासिकाच्या संपादकाची हत्या

मुंबई : ‘इंडिया अनबाउंड ग्लोबल’ या साप्ताहिक वृत्तपत्र आणि मासिकाचे संपादक नित्यानंद पांडे यांचा मृतदेह भिवंडी परिसरात आढळून आला आहे. त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नित्यानंद पांडे हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते, त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला.

भिवंडीतील खारबाव खार्डी गावातील एका पुलाखाली पांडे यांचा मृतदेह पोलिसांना सापडला. त्यांच्या डोक्यावर मारहाणीच्या खुणा आहेत. त्यामुळे सध्या त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णाल्यातून मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच पांडे यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

‘इंडिया अनबाउंड ग्लोबल’चे मुख्य कार्यालय अंधेरी येथे आहे. मात्र, त्याचे संपादकीय काम मीरारोड येथील कार्यालयात होतं. नित्यानंद पांडे हे 15 मार्चला सकाळी ते नेहमीप्रमाणे कार्यालयात गेले. मात्र, सायंकाळी घरी परतलेच नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.

Published On - 5:24 pm, Sun, 17 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI