मराठी मुलांसाठी मनसेचा पुढाकार, रेल्वे भरतीचा फॉर्म भरण्यासाठी तज्ञाचं मार्गदर्शन

मराठी मुलांसाठी मनसेचा पुढाकार, रेल्वे भरतीचा फॉर्म भरण्यासाठी तज्ञाचं मार्गदर्शन

मुंबई : रेल्वेमध्ये सध्या बारावी पास आणि ग्रॅज्युएट मुलांसाठी सुवर्ण संधी आहे. हजारो पदांसाठी होत असलेल्या भरतीचा फॉर्म सध्या ऑनलाईन भरता येईल. पण मुलांना यामध्ये अडचणी येऊ नये यासाठी मनसेने पुढाकार घेतला आहे. मनसे नेते अभिजित पानसे यांनी एका तज्ञाची मुलाखत घेतली आहे. यामध्ये रेल्वे भरतीच्या जागा, फॉर्म भरण्याची प्रोसेस, विभागनिहाय जागा, कोणतं पद निवडावं याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 2008 ला रेल्वे भरतीत मराठी मुलांवर अन्याय झाल्यानंतर मनसेने आंदोलन केलं होतं. यावेळीही मनसे मराठी मुलांच्या मदतीसाठी परीक्षेच्या अगोदरच मैदानात उतरली आहे. विशेष म्हणजे सर्वात जास्त जागा मुंबई आणि सिकंदराबाद विभागासाठी आहेत. त्यामुळे कटऑफच्या दृष्टीने मराठी मुलांना फायदा होणार आहे.

पाहा व्हिडीओ


Published On - 11:47 pm, Mon, 18 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI