LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

[svt-event title=”कुलभूषण जाधव प्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात महत्त्वाची सुनावणी ” date=”17/07/2019,9:37AM” class=”svt-cd-green” ] नवी दिल्ली : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायलयात महत्त्वपूर्ण निकाल, पाकिस्तानने हेरगिरी प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायलयात आज सुनावणी, नेदरलंडच्या हेग येथील पीस पॅलेसमध्ये दुपारी 3 वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 च्या सुमारास सुनावणी, भारताकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे बाजू मांडतील [/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेचा विमा कंपन्यांवर धडक मोर्चा ” date=”17/07/2019,9:32AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : पीक विम्याच्या मुद्यावरुन शिवसेना आक्रमक, शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना आज विमा कंपन्याच्या कार्यालावर धडकणार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात हा ‘इशारा मोर्चा’ निघणार [/svt-event]

[svt-event title=”विठ्ठलवाडी स्थानकाजवळ ओव्हरहेडची वायर तुटली” date=”17/07/2019,9:27AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : विठ्ठलवाडी स्थानकाजवळ ओव्हरहेडची वायर तुटली, एन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अप-डाऊन दोन्ही मार्गावरील रेल्वे सेवेला फटका, चाकरमाण्यांचे हाल [/svt-event]

[svt-event title=”देशाच्या अनेक भागात यंदाही भीषण दुष्काळाचे संकट, हवामान विभागाच्या आकडेवारीनं चिंता वाढवली” date=”17/07/2019,7:53AM” class=”svt-cd-green” ] सततच्या पावसाचा खंड पडल्याने निम्मा देश समाधानकारक पावसाच्या प्रतिक्षेत, देशातील 250 पेक्षा जास्त जिल्ह्यात सरासरीच्या कमी पाऊस पडल्यानं भीषण परिस्थिती, तर देशातील 71 जिल्ह्यात अत्यंत कमी पावसाची नोंद, या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 60 ते 99 टक्क्यांपर्यंत कमी पाऊस, देशात माॅन्सून दाखल होऊन महिना लोटला तरिही निम्मा देश पावसाच्या प्रतिक्षेत, पावसाअभावी देशातील खरिप पेरणीवर मोठा परिणाम [/svt-event]

[svt-event title=”डोंगरी इमारत दुर्घटना” date=”17/07/2019,7:46AM” class=”svt-cd-green” ] डोंगरी इमारत दुर्घटना : मृतांचा आकडा 12 वर, 9 जण जखमी, जखमींवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरु, सर्च ऑपरेशऩ रात्रभर सुरु [/svt-event]

[svt-event title=”नागपूर शहरात आज पाणीपुरवठा बंद” date=”17/07/2019,7:45AM” class=”svt-cd-green” ] पाणीपुरवठा बंद असल्याने शहरातील 3 लाख 50 हजार नळ कोरडे, शहरातील 400 टँकरच्या जवळपास 1500 फेऱ्याही बंद, नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदा शहरात पाणीपुरवठा बंद, पावसाने दडी मारल्याने नागपूर शहरात पाण्याचे संकट, तोतलाडोह धरणही कोरडे, नवेगाव खैरीमध्ये नाममात्र पाणी शिल्लक [/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI