वरळी -शिवडी उड्डाण पुलाच्या कामासाठी जगन्नाथ भातणकर मार्ग बंद; ‘या’ मार्गे वळवण्यात येणार वाहतूक

वरळी -शिवडी इलेव्हेटर कनेक्टर उड्डाण पुलाचे (Worli-Shivdi flyover) काम लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर परळहून प्रभादेवीच्या स्वामी समर्थ मठाच्या दिशेने येणारा जगन्नाथ भातणकर मार्ग सोमवारी मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

वरळी -शिवडी उड्डाण पुलाच्या कामासाठी जगन्नाथ भातणकर मार्ग बंद; 'या' मार्गे वळवण्यात येणार वाहतूक
Worli-Sewri-elevated-road
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 10:12 AM

मुंबई :  वरळी -शिवडी इलेव्हेटर कनेक्टर उड्डाण पुलाचे (Worli-Shivdi flyover) काम लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर परळहून प्रभादेवीच्या स्वामी समर्थ मठाच्या दिशेने येणारा जगन्नाथ भातणकर मार्ग सोमवारी मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण (mmrda)च्या माध्यमातून वरळी -शिवडी इलेव्हेटर कनेक्टर उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी अंदाजे दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो अशी माहिती एमएमआरडीएच्या वतीने देण्यात आली आहे. हा मार्ग बंद करण्यात आल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून, एलफिन्स्टकडूनन (Elphinstone) प्रभादेवी, वरळीकडे येणारी वाहतूक दीपक टॉकीजवरून पुन्हा वरळी आणि प्रभादेवीच्या दिशेने वळविण्यात आली आहे. पुलाच्या कामासाठी एलफिन्सनवरून प्रभादेवीला येणारा मार्ग बंद करण्यात आला असून, नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन एमएमआरडीएच्या वतीने करण्यात आले आहे.

रुग्णवाहिकेसाठी विशेष मार्गिका

जगन्नाथ भातणकर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असला तरी आणीबाणीच्या काळात रुग्णवाहिकेसाठी एक विशेष मार्गिका ठेवण्यात येणार आहे. रुग्णवाहिके व्यतिरिक्त हा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. लवकरच वरळी -शिवडी इलेव्हेटर कनेक्टर उड्डाण पुलाचे काम सुरू होत आहे. काम सुरू असताना काही दुर्घटना होऊ नये याची खबरदारी म्हणून जगन्नाथ भातणकर मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. मात्र अत्यावश्यक सेवा लक्षात घेता रुग्णवाहिकेसाठी येथून एक विशेष मार्गिका तयार करण्यात आल्याची माहिती मुंबई महानगर विकास प्राधिकरणच्या वतीने देण्यात आली आहे.

सात खांबावर उभारणार पूल

वरळी -शिवडी इलेव्हेटर कनेक्टर उड्डाण पूलाच्या उभारणीसाठी लवकरच सुरुवात होणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी अंदाजे दीड वर्षांचा कालावधी प्रस्तावीत आहे. या पुलासाठी सात खांबांची निर्मिती करण्यात येणार असून, सात खांबावर हा संपूर्ण पूल उभारण्यात येणार असल्याचे एमएमआरडीने म्हटले आहे. तसेच या भागातून होणारी वाहतूक पहाता पुलाच्या मजबुतीवर अधिक लक्ष देण्यात येणार असल्याचे देखील एमएमआरडीने म्हटले आहे.

संबंधित बातम्या

दिशाला ज्या काळ्या मर्सिडीजने पार्टीतून घरी आणलं, ती वाझेची? नितेश राणेंची चार सनसनाटी ट्वीट्स

मिसळीवर ताव मारल्यानंतर रोहित पवारांच्या पुरणपोळ्यांवरुन फडणवीसांना, तर बिलावरुन भाजप नेत्यांना जोरदार टोला!

मुंबईत इलेक्ट्रिक व्‍हेईकल कक्षाची स्‍थापना, वाचा प्रदूषणमुक्त मुंबईचा नवा प्लॅन

Non Stop LIVE Update
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.