पालिकेनं घर पाडल्यानंतर मी रडले होते, मी हरामखोर नव्हे तर देशभक्त; कंगनाचा शिवसेनेवर हल्लाबोल

ठाकर सरकारवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कंगनाने शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले. | Kangana Ranaut

पालिकेनं घर पाडल्यानंतर मी रडले होते, मी हरामखोर नव्हे तर देशभक्त; कंगनाचा शिवसेनेवर हल्लाबोल
संजय राऊत आणि कंगना रानौत
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 8:37 AM

मुंबई: गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर विरोधक ठाकरे सरकारवर तुटून पडले आहेत. यामध्ये आता अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) हिनेदेखील उडी घेतली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कंगनाने शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले. मी खरी देशभक्त आहे, हरामखोर नव्हे, असे सांगत कंगनाने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर पलटवार केला. (Kangana Ranaut slams Shivsena after Parambir singh letter bomb)

कंगनाने ट्विट करून या सगळ्या प्रकरणावर भाष्य केले आहे. येत्या काही दिवसांत ठाकरे सरकार पूर्णपणे उघडे पडेल. माझे आरोप खरे ठरले. त्यामुळे माझ्या धमन्यांमध्ये राजपुतांचे रक्त असून माझा प्रामाणिकपणा आणि मातृभूमीविषयीची निष्ठा सिद्ध झाली आहे. मी देशभक्त आहे हरामखोर नव्हे, असे कंगनाने म्हटले.

महाराष्ट्र सरकार भ्रष्ट आणि सडलेली राजवट असल्याचा आरोप केला तेव्हा अनेकजण माझ्यावर तुटून पडले. मला शिव्या, धमक्या आणि टीकेला सामोरे जावे लागले. तेव्हा मी प्रतिकारही केला. मात्र, जेव्हा मुंबई शहरावरील माझ्या निष्ठेविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले, पालिकेने अनधिकृतपणे माझे घर उद्ध्वस्त केले, तेव्हा मी रडले होते, असे कंगनाने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आयुक्तांच्या लेटरबॉम्बनंतर ठाकरे सरकार अडचणीत; संजय राऊतांचं सूचक ट्विट

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir singh) यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर ठाकरे सरकार मोठ्या अडचणीत सापडले आहे. परमबीर सिंह यांचे हे पत्र प्रसारमाध्यमांच्या हाती लागल्यानंतर एकच गदारोळ झाला. त्यामुळे ठाकरे सरकार कधी नव्हे इतक्या मोठ्या संकटात सापडले आहे. या पार्श्वभूमीवर आता महाविकासआघाडीचे शिल्पकार आणि शिवसेनेचे संकटमोचक असलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सूचक संदेश ट्विट केला आहे. (Shivsena leader Sanjay Raut tweet after Parambir singh letter bomb)

संजय राऊत यांनी रविवारी आपल्या जावेद अख्तर यांचा एक शेर ट्विट केला. राजकीय वर्तुळात या ट्विटची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. संजय राऊत यांना या माध्यमातून नेमका काय संदेश द्यायचा आहे, यावरुन तर्कवितर्क लढवले जात आहेत.

2019मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात रंगलेल्या सत्तानाट्यावेळीही संजय राऊत अशाचप्रकारे दररोज सूचक शेरोशायरी करताना दिसले होते. त्यामुळे आताही ठाकरे सरकार काही अनपेक्षित चाल खेळणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

संबंधित बातम्या:

आयुक्तांच्या लेटरबॉम्बनंतर ठाकरे सरकार अडचणीत; संजय राऊतांचं सूचक ट्विट

Parambir Singh Letter : परमबीर सिंग यांच्या ‘लेटर बॉम्ब’ची राज्य सरकारकडून शहानिशा होणार!

Parambir Singh Letter : परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे, अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार- अनिल देशमुख

(Kangana Ranaut slams Shivsena after Parambir singh letter bomb)

Non Stop LIVE Update
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.