मुंबईः गेल्या काही दिवसांपासून लोकल सेवा हळूहळू पूर्ववत होण्याच्या मार्गावर आहे. रेल्वे मंत्रालयाचे कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या लोकलनं प्रवास करण्याची मुभा आहे. लवकरच रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याचे संकेतही मिळत आहेत. परंतु ऐन कार्यालयीन वेळीच कर्जतच्या दिशेची वाहतूक अंबरनाथ-कर्जतदरम्यान बंद करण्यात आल्यानं लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पुरती अडचण झालीय. (Karjat-Bound Traffic Closed Between Ambernath-Karjat; Central Railway disrupted)
अंबरनाथ आणि बदलापूरच्या दरम्यान रात्री खडी टाकणारी मशीन रुळावरून घसरली
अंबरनाथ आणि बदलापूरच्या दरम्यान रात्री खडी टाकणारी मशीन रुळावरून घसरलीय, त्यामुळेच मध्य रेल्वे विस्कळीत झालीय. कर्जत खोपोलीतील वस्तीकरिता असलेल्या ट्रेन सध्या मुंबईच्या दिशेने सोडण्यात येत आहेत. वस्तीकरिता असलेल्या ट्रेन निघून गेल्यानंतर वाहतूक पूर्ववत होत नाहीत, तोपर्यंत सर्व वाहतूक ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंबरनाथ-बदलापूरदरम्यान टीआरटी ट्रॅक मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती मिळालीय. तांत्रिक बिघाडामुळे स्लीपर ब्लॉक पडल्याने दोन मजूर जखमी झाले असून, एकाचा मृत्यू झालाय. पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडलीय. मध्य रेल्वेवरच्या धिम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीय. मुंबई ते अंबरनाथ बदलापूर ते कर्जत वाहतूक सुरू आहे. मशिन दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती कल्याण जीआरपीने दिलीय. लांब पल्ल्याच्या गाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.
पश्चिम रेल्वे पूर्ण क्षमतेने म्हणजे 1,367 फेऱ्या चालवणार
येत्या 29 जानेवारीपासून पश्चिम रेल्वेची लोकल सेवा पूर्ण क्षमतेने रुळावर धावणार आहे. सध्या पश्चिम रेल्वेकडून दिवसाला 1201 फेऱ्या चालवल्या जात आहेत. त्यामध्ये आता 166 फेऱ्यांची भर पडून पश्चिम रेल्वे पूर्ण क्षमतेने म्हणजे 1,367 फेऱ्या चालवणार आहे.
सकाळी सात वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजल्यानंतर रेल्वेने प्रवास करण्याची मिळू शकते मुभा
कमी गर्दीच्या वेळेत सरसकट सर्व प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यानुसार सामान्य लोकांना सकाळी सात वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजल्यानंतर रेल्वेने प्रवास करण्याची मुभा मिळू शकते. या काळात रेल्वे सेवेवरचा ताण कमी असतो. त्यामुळे कोरोना पसरण्याचा धोका तुलनेत कमी आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून या प्रस्तावाची चाचपणी सुरू असून, लवकरच मुंबईतील लोकल ट्रेनचे नवे वेळापत्रक जाहीर होऊ शकते.
TRT Track machine failed between Ambernath- Badlapur during maintenance block from 2.05 to 5.10am today. Restoration work is going on. The Down traffic between from Ambernath to Badlapur has been suspended.
Trains are running b/w CSMT- Ambernath and Karjat-Badlapur section.— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) January 27, 2021
नऊ महिन्यांपासून लोकलला रेड सिग्नल
गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेली मुंबईकरांची लाईफलाईन 15 डिसेंबर आणि त्यानंतर 1 जानेवारीपासून सुरु होईल, अशी चर्चा होती. मात्र अद्याप याबाबत कोणतीही हालचाल होताना दिसत नाहीत. कोरोनाचा धोका पाहता डिसेंबर अखेरपर्यंत कोरोनाच्या रुग्णसंख्येवर पालिका प्रशासन नजर ठेवणार आहे. यानंतरच लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारला कळवले जाईल, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली होती.
सध्याची परिस्थिती पाहता मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा नियंत्रणात आहे. मृत्यूचेही प्रमाण कमी झाले आहे. तसेच मुंबईतील जवळपास सर्व दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे आता लोकल ट्रेनला यामधून वगळण्यात काही अर्थ नाही, असा मतप्रवाह मुंबईकरांमध्ये आहे.
संबंधित बातम्या
मुंबईत लोकल ट्रेनचा नवा फॉर्म्युला; सर्वांना प्रवास करण्यासाठीचं नियोजन लवकरच जाहीर
Karjat-Bound Traffic Closed Between Ambernath-Karjat; Central Railway disrupted