हात कापावा लागलेल्या दोन महिन्यांच्या प्रिन्सचा मृत्यू

महापालिकेच्या केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हात गमवावा लागलेल्या दोन महिन्याच्या प्रिन्स राजभर या चिमुरड्याचा अखेर आज मृत्यू झाला.

हात कापावा लागलेल्या दोन महिन्यांच्या प्रिन्सचा मृत्यू

मुंबई : महापालिकेच्या केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हात गमवावा लागलेल्या दोन महिन्याच्या प्रिन्स राजभर या चिमुरड्याचा अखेर आज मृत्यू झाला (KEM Hospital Baby Prince Dies). केईएम रुग्णालयात आज (22 नोव्हेंबर) पहाटे तीन वाजता त्या बाळाची मृत्यूशी झुंज संपली (KEM Hospital Baby Prince Dies).

गेल्या 7 नोव्हेंबरला ईसीजी मशीनमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे गादी जळून झालेल्या अपघातात प्रिन्सचा कान आणि एक हात होरपळला होता. त्यामुळे कान आणि हात कापण्याची वेळ आली होती. याबाबतची माहिती केम हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे (KEM Hospital Baby Prince Dies).

तीन महिन्याच्या प्रिन्सला 10 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. यातील पाच लाख रुपये त्याच्या नावावर मुदत ठेवीवर ठेवले जाणार होते, तर पाच लाख रुपये त्याच्या पालकांना उदरनिर्वाहासाठी दिले जाणार होते.

उत्तर प्रदेशहून आलेल्या प्रिन्स नावाच्या दोन महिन्याच्या बाळाला केईएम रुग्णालयात हृदयावर उपचार करण्यासाठी भरती करण्यात आलं होतं. उपचार सुरु असताना ईसीजी मशिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन गादीने पेट घेतला. यामध्ये प्रिन्सचा हात, कान, डोकं आणि छातीचा भाग जळाला. हाताला गँगरिन झाल्यामुळे बाळाचा हात कापण्याची वेळ आली आणि आज त्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI