Mumbai Local : हार्बर लाईनवर लोकल सेवा विस्कळीत; पनवेल रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी

हार्बर लाईनवर (Harbor Line) लोकल सेवा विस्कळीत झाल्याने पनवेल रेल्वे स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी उसळली आहे. मंगळवारी सीएसएमटी स्थानकात लोकल बफरला धडकली होती, त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं होतं. मात्र त्याची झळ आज देखील प्रवाशांना बसत आहे.

Mumbai Local : हार्बर लाईनवर लोकल सेवा विस्कळीत; पनवेल रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी
प्रातिनिधिक छायाचित्र
अजय देशपांडे

|

Jul 27, 2022 | 12:05 PM

मुंबई: हार्बर लाईनवर लोकल (Local) सेवा विस्कळीत झाल्याने पनवेल (Panvel) रेल्वे स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी उसळली आहे. मंगळवारी  सीएसएमटी स्थानकात लोकल बफरला धडकली होती, त्यामुळे  रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं होतं. मात्र त्याची झळ आज देखील प्रवाशांना (Passenger) बसत आहे. आजही लोकल अर्धा ते एक तास उशीराने धावत असल्याचे प्रवाशांनी म्हटले आहे. लोकलच्या फेऱ्यांना विलंब होत असल्याने प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले आहे, तसेच ऑफीसला जायला विलंब होत असल्याने चाकरमान्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे गोवंडीमध्ये तांत्रिक कारणामुळे लोकलचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे अनेक लोकल गाड्या या रुळावरच उभ्या असून, रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. हार्बर लाईनचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली आहे.

रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

मंगळवारी सीएसएमटी स्थानकात लोकल बफरला धडकली होती, या अपघातामुळे लोकलचं संपूर्ण वेळापत्रकच कोलमडलं, मात्र त्याची झळ आज देखील प्रवाशांना बसत असल्याचे दिसून येत आहे. हार्बर मार्गावर लोकल सेवा ठप्प झाली आहे. लोकल अर्ध्या ते एक तास विलंबाने धावत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. दुसरीकडे गोवंडीमध्ये देखील काही तांत्रिक कारणांमुळे लोकलचा खोळंबा झाला आहे. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांनी संतपा व्यक्त केलाय. लोकलच्या फेऱ्या ठरलेल्या वेळेत न होता विलंब होत असल्याने अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.  एकूण संपूर्ण लोकलचे वेळापत्रक कोलमडल्याचे चित्र आहे.

हे सुद्धा वाचा

चाकरमान्यांचे हाल

नवी मुंबई, पनवेलवरून अनेक चाकरमाने हे नोकरीच्या निमित्ताने मुंबईमध्ये येत असतात. मात्र लोकलचे वेळापत्रक कोलमडल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कामावर जाण्यासाठी विलंब झाला. यामुळे नोकरदार वर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान तीन दिवसांपूर्वीच मालगाडीची कपलिंग तुटल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. आता पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें