महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर कोणताही जाहीर कार्यक्रम घेण्यास मनाई, राज्यशासनाची नवी नियमावली जाहीर!

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर कोणताही जाहीर कार्यक्रम घेण्यास मनाई, राज्यशासनाची नवी नियमावली जाहीर!
दादर येथील चैत्यभूमीवर 6 डिसेंबर रोजी कोणताही कार्यक्रम, सभा, संमेलनास मनाई करण्यात आली आहे.

मुंबईः डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्माण (Mahaparinirvan Din) दिनानिमित्त येत्या 6 डिसेंबर रोजी मुंबईतल्या चैत्यभूमीवर कोणताही जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यास राज्य शासनाने मज्जाव केला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर (Corona) सरकारने हा निर्णय घेतला आहे. सभा, संमेलने, मोर्चा काढण्यासदेखील राज्य शासनाने मनाई केली आहे. या वर्षीचा महापरिनिर्माण दिन अनुयायांनी अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

शिवाजी पार्क, चैत्यभूमीवर स्टॉल लागणार नाहीत

राज्य सरकारने 6 डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, दादर येथील चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात कोणतेही स्टॉल लावण्यात येणार नाहीत, असे जाहीर केले आहे. अनुयायांनी घरूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावे, असेही आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

दोन डोस न घेतलेल्या मान्यवरांनाही मनाई

राज्य शासनाने जारी केलेल्या सूचनांमध्ये महत्त्वाची माहिती म्हणजे, चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी येणाऱ्या मान्यवरांनीही कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. लस प्रमाणपत्र नसेल तर अशा मान्यवरांना या परिसरात प्रवेश करण्यास मनाई केली जाईल. ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पॉार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.

यंदाचा 66 वा महापरिनिर्वाण दिन

मुंबईतील चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्राम स्थळ होते. तेथेच त्यांची समाधीदेखील आहे. 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी असून देशभरात हा महापरिनिर्माण दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचा हा 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे. या दिवशी डॉ. आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी देशाच्या काना-कोपऱ्यातून लाखो समर्थक चैत्यभूमीवर येत असतात. त्यासाठी विशेष रेल्वे आणि बसचीही सोय केली जाते. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो. यंदा मात्र चैत्यभूमीवर किंवा शिवाजी पार्कवर या दिवशी कोणताही कार्यक्रम होणार नाही, असे शासनाने जाहीर केले आहे. अनुयायांनी घरी राहूनच श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इतर बातम्या-

खुर्चीला हात-पाय बांधून नातवानेच गळा चिरला, नागपुरातील महिला डॉक्टरच्या हत्येचं गूढ उकललं

School Reopens: औरंगाबाद शहरात पहिली ते पाचवीच्या शाळा 10 डिसेंबरपासून सुरू होणार, महापालिकेचा निर्णय


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI