Maharashtra News Live Update : आमदारांच्या अपात्रतेबाबत 20 जुलैला सुनावणी, फैसला काय येणार?

| Updated on: Jul 19, 2022 | 7:00 AM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : आमदारांच्या अपात्रतेबाबत 20 जुलैला सुनावणी, फैसला काय येणार?
मोठी बातमी

आज रविवार दिनांक 17 जुलेै 2022  आज देखील राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांची नव्या सरकारवर टीका सुरूच आहे. तसेच शिवसेनेतून जे आमदार बाहेर पडून शिंदे गटात सहभागी झाल्या त्यांच्यावर आता पक्षाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. अनेकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण घडामोडी आज देखील घडू शकतात. तसेच राज्यभरात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आज आपण या सर्व घडामोडींची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Jul 2022 09:35 PM (IST)

    चंद्रपूर:-जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला

    मूल येथील 54 वर्षीय इसमाचा मृत्यू

    मागील 15 दिवसापासून शासकीय वैद्यकीय रुग्णालयात होता दाखल,

    सध्या जिल्ह्यात सक्रिय रुग्ण संख्या 78 वर, जिल्ह्यात आजवर 1452 रुग्णांचा मृत्यू,

    जिल्हा आरोग्ययंत्रणा सज्ज

  • 17 Jul 2022 09:34 PM (IST)

    नाना पटोले यांची प्रतिक्रिया

    यशवंत सिन्हा यांना आम्ही मतदान करणार आहोत. खालच्या सभागृहात राष्ट्रवादीचा सदस्य आहे. वरच्या सभागृहात शिवसेनेकडे उप सभापतीपद आहे. त्यामुळं आम्ही विरोधी पक्षनेते पद मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहोत.

    मागच्या अडीच वर्षांत ज्या घटना घडत आहेत त्या चुकीच्या आहेत. त्यामध्ये राज्यपाल यांची देखील भूमिका संशयपद आहे. कोर्टाच कारण सांगून त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक राखून ठेवली आणि भाजप सरकार आल्यानंतर लगेचच निवडणूक घेतली. आमची मागणी राहणार आहे सरन्यायाधीश यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी आमची मागणी असणार आहे.

  • 17 Jul 2022 09:33 PM (IST)

    नागपुरात आज वाढली कोरोना रुग्णांनाची संख्या

    गेल्या 24 तासात 262 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    118 जणांनी केली कोरोना वर मात

    ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 1221

    मृत्यू शून्य मात्र प्रशासनाची वाढली चिंता

  • 17 Jul 2022 07:46 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

    एवढ्या लांबून दूरवरून कार्यकर्ते इकडे आल्यानंतर राज्यात एक नवं वातावरण पाहतोय. संभाजीनगर वरून आलेल्या लोकांसोबत रात्री तीन वाजेपर्यंत मेळावा चालला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी संजय शिरसाठ, सत्तार साहेब यांच्यासोबत कार्यकर्ते आले होते. रोज वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक येतात आशीर्वाद द्यायला शुभेच्छा द्यायला.

    आम्ही बाळासाहेबांचे आणि दिघे साहेबांची भूमिका घेतली याचा अर्थ दुसऱ्या समाजाचा अनादर करायचा द्वेष करायचा असं होत नाही. सर्व धर्मीयांना सर्व समाजांना विश्वासात घेऊन या राज्याचा कारभार पाहतोय. अनेक मुस्लिम समाज बांधव, भगिनी माझ्यासमोर बसलेले तुम्ही पहात आहात.  रोज येऊन माझ्याकडे भेटतात, मला येऊन शुभेच्छा देतात, त्यांच्या मनामध्ये कोणतीही भीती नाही त्यांच्या मनामध्ये कोणताही द्वेष नाही. त्यांच्या मनामध्ये कुठलाही आकस नाहीये त्यांना वाटतं. हा एकनाथ शिंदे आमचाच माणूस आहे, आमच्या परिवारातला माणूस आहे आमच्या कुटुंबातला माणूस आहे. आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेस सगळे लोक होते. कुणालाच काही माहीत नव्हतं कुठे चाललोय माहीत नव्हतं मी म्हणालो पुढे व्हा.

    कुणी काहीही विचारलं नाही कुठे चाललोय हे माहित नाही, परत यायचं कधी हे माहीत नाही. पण एक मात्र नक्की की गेले अडीच वर्ष जो अनुभव या लोकांना आला होता हा अनुभव ऐकून घ्यायला मी एकटाच मोकळा होतो. माझ्याकडे येऊन सगळे व्यक्त व्हायचे, त्यांच्या मतदारसंघात आलेल्या अडचणी सांगायचे. महाविकास आघाडीमध्ये जी काय परिस्थिती होती, ते सांगायचे आपल्याला ज्या लोकांनी निवडून दिलं आहे त्या लोकांना पुढच्या निवडणुकीमध्ये काय म्हणून सामोरे जायचं. कोणती भूमिका घ्यायची, बाळासाहेबांची तर रोखठोक भूमिका होती. बाळासाहेबांनी सांगितलं होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी शत्रू आहे.

  • 17 Jul 2022 07:01 PM (IST)

    गडचिरोली - भामरागड तालुक्यात भीषण पूर परिस्थिती निर्माण

    तीन तास भामरागड गावाला पुराच्या वेढा

    भामरागड बाजारपेठ पुराच्या पाण्यात

    आलापल्ली भामरागड छत्तीसगड राष्ट्रीय महामार्ग बंद

    पुरामुऴे तालुक्यातील अनेक मार्ग बंद झाले

    इंद्रावती नदीला दुस-यांदा पुर भामरागड वासियांचे जनजीवन विस्कऴीत

  • 17 Jul 2022 07:01 PM (IST)

    चंद्रपूर:-राजुरा तालुक्यातील गोवरी कोळसा खाण वसाहतीत राहणाऱ्या युवकाचे शव मिळाले

    काल दुपारी गोवरी नाला येथे पोहण्यासाठी गेला होता प्रीतम आवारी हा युवक,

    नाल्याशेजारी त्याची दुचाकी व चप्पल होती आढळली,

    शोध पथकाने त्याला शोधण्याचा केला होता प्रयत्न मात्र पुराचे पाणी अधिक असल्याने आले होते अपयश,

    अखेर आज पूर ओसरल्यावर बाहेर आले शव,

  • 17 Jul 2022 06:59 PM (IST)

    सातारा शिवसेना जिल्हाअध्यक्षपदी पाटण मतदार संघातील युवा नेते हर्षद कदम यांची नियुक्ती

    हर्षद कदम हे पक्षांतर्गत शिंदे गटाचे शिवसेना आमदार शंभुराज देसाई यांचे विरोधक

    पृर्वीचे जिल्हा अध्यक्ष जयवंत शेलार यांना जिल्हा संघटक पदी बढती देऊन हर्षद कदम यांची सातारा जिल्हा शिवसेना जिल्हाध्यक्षपदी निवड

    कदम यांची निवड करुन उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटातील शिवसेना आमदार शंभुराज देसाई यांना शह देण्याचा प्रत्येन राजकीय वर्तुळात चर्चा

    पाटण वगळता इतर ठिकणच्या पदाधिकारी यांच्यात कोणताही बदल नाही

  • 17 Jul 2022 06:30 PM (IST)

    बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

    महाराष्ट्रातल्या आमदारांच्या अपात्रतेबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

    महाराष्ट्राच्या राजकारणाचा निर्णय 20 जुलै रोजी सुप्रीम कोर्ट देणार

    सरन्यायाधीश सी व्ही रमन्ना यांच्या खंडपीठांसमोर होणार सुनावणी

  • 17 Jul 2022 06:30 PM (IST)

    जळगाव तालुक्यात शिवसेनेला भगदाड

    60 पदाधिकाऱ्यांनी सोपविले जिल्हाप्रमुखांकडे राजीनामे

    शिंदे गटात झाले सहभाग

    तालुकाप्रमुखांसह, जि.प., पं.स.सदस्यांचाही समावेश

    राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांचे पडसाद आता जिल्ह्यात व तालुक्यात देखील उमटू लागले आहेत.

    जळगाव तालुक्यातील शिवसेनेच्या 60 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना सदस्यपदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याकडे सोपविला आहे.

    यामध्ये तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण यांच्यासह जि.प.चे माजी सदस्य पवन सोनवणे यांचाही समावेश आहे.

    तालुका कार्यकारणीतील जवळ-जवळ सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे सोपविले

    तालुक्यातील अनेक गावांच्या सरपंचांनी देखील यावेळी माजी मंत्री गुलाबराव पाटील यांना समर्थन दिले आहे.

  • 17 Jul 2022 06:29 PM (IST)

    गोव्यात मोठ्या राजकीय घडामोडी

    माजी मुख्यमंत्री, माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांची पक्षाच्या कायम स्वरूपी निमंत्रक पदावरून हकालपट्टी

    पक्षविरोधी कारवाया केल्याचा कामत यांच्यावर ठपका

    काँग्रेस आमदारांना भाजपमध्ये नेण्यासाठी दबाव आणल्याचा ठपका

    दिगंबर कामत यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी करणारे पत्र प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी विधानसभा सभापती यांना यापूर्वीच दिले आहे.

    पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत पक्षाने आमदार मायकल लोबो यांची गेल्या रविवारी विरोधी पक्ष नेतेपदावरून हकालपट्टी केली होती

    गेल्या रविवारी कॉग्रेस अंतर्गत कलह उफाळून आला होता. मात्र पक्षांतरासाठी आवश्यक आमदार संख्या समीकरण न जुळल्याने बंड फसलं होते.

    राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष फुटीच्या भीतीने सावध काँग्रेसने आपले 5 आमदार शनिवारी चेन्नईला हलवले आहेत.

  • 17 Jul 2022 05:40 PM (IST)

    नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया

    विदर्भातील शेतकऱ्यांना संत्राच्या कलमा मिळत नव्हत्या तेव्ह मी नाराज होतो...

    मी घोष साहेब सांगितल्या नंतर अनेक नर्सरी उघडण्यात आल्या....

    डॉ घोष यांना बोलत अमरावती वर्धा, नागपूर मध्ये संत्राच संत्रा आहे. त्यामुळे आणखी नर्सरी वाढवा....

    भविष्यात आपल्याला पाच हजार कोटी रुपयाचा संत्रा निर्यात करायच्या आहे.

    काही अडचणी सरकारच्या आहेत, काही तुमच्या पण आहेत... त्या दूर करायच्या आहेत.

    मी पण एक निर्यातदार आहे...संत्राची कॉलेटी ही आपली समस्या आहे.

    100 टक्के कॉलेटी कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे....

  • 17 Jul 2022 05:19 PM (IST)

    ICSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर

    ICSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने ICSE 10वीचा निकाल जाहीर केला आहे. निकाल पाहण्यासाठी, वेबसाइटला भेट द्या- cisce.org.

  • 17 Jul 2022 04:46 PM (IST)

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार Live

    आमच्या सहकाऱ्यांसोबत माझी चर्चा झाली आणि देशाच्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी आमच्याकडून एकमताने मार्गरेट अल्वा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनेक वर्ष राज्यसभेच्या खासदार होत्या, तसेच त्या अनेक वर्ष राज्यपाल ही होत्या, त्यांना राजकारणाचा मोठा अनुभव आहे, तसेच त्यांना संसदीय कामकाजाची ही अत्यंत उत्तम माहिती आहे.

    या उमेदवाराला सपोर्ट करणाऱ्या पक्ष्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत, काँग्रेस डी एम के, समाजवादी पार्टी, एनसीपी, आरजेडी, शिवसेना, टीआरएस, आरएसपी, व्हीसीके, तसेच अनेक पक्षांचं समर्थन आहे. आम्ही ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्या पत्रकार परिषदेत व्यस्त होत्या, त्यामुळे त्याच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही. आम्ही अरविंद केजरीवाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयाकडून संदेश आला की ते त्यांचे समर्थन लवकरच जाहीर करतील, मंगळवारी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करू...

  • 17 Jul 2022 04:07 PM (IST)

    डोंबिवलीत मुख्यमंत्र्याच्या पोस्टरला दुधाचा अभिषेक

    एक रिक्षाचालक मुख्यमंत्री झाल्याच्या आनंदात व्यक्त करत ढोल ताशांच्या गजरात नाचत गात काढली रॅली

    डोंबिवलीतील एकता रिक्षा संघटना, जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक संस्था, आनंद उत्सव रिक्षा व स्कूल व्हॅन वतीने देसले पाडा चौक ते डोंबिवली रेल्वे स्थानकातील इंदिरा चौकापर्यत काढण्यात आली रॅली

  • 17 Jul 2022 03:04 PM (IST)

    शरद पवारांच्या घरी बैठक

    विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक

    उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत होणार चर्चा

    उद्यापासून संसदेच हिवाळी अधिवेशन

    अधिवेशनाबाबतही या बैठकीत चर्चा होणार

    शिवसेना नेते संजय राऊत थोड्याच वेळात शरद पवारांच्या घरी दाखल होणार

  • 17 Jul 2022 03:03 PM (IST)

    मुख्यमंत्री व्हीसीद्वारे बैठकीत जोडले जाणार

    केंद्र सरकार सोबत 3.30 वाजता सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत होणारी व्हीसीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबई महानगरपालकेतील आयुक्त दालनातून सहभागी होणार आहेत. काही कामानिमित्त ते नवी मुंबईला गेलेले असल्याने तिथूनच त्यांनी व्हीसीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. माध्यमांशी संवाद होण्याची शक्यता कमी आहे. कारण पुढे किशोर आप्पा पाटील यांच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी त्यांना यशवंतराव चव्हाण सभागृह येथे पोहोचायचे आहे.

  • 17 Jul 2022 03:02 PM (IST)

    अधिवेशनात 32 विधेयके मांडली जाण्याची शक्यता

    संसदेच्या या अधिवेशनात विविध विभागांकडून 32 विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे, आम्ही चर्चेशिवाय विधेयक मंजूर करणार नाही, संसदेच्या पावसाळी अधिवेशनावर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांची प्रतिक्रिया

    काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान आजच्या बैठकीला उपस्थित नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता, मी त्यांना सांगू इच्छितो की 2014 पूर्वी पंतप्रधान कधीही सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित नव्हते.

    मनमोहन सिंग सर्वपक्षीय बैठकीला किती वेळा उपस्थित होते? - केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी

  • 17 Jul 2022 03:00 PM (IST)

    शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांची घेतली भेट

    आईच्या निधनानंतर मुंबईत जाऊन केलं सांत्वन

    काल विजय शिवतारे यांची शिवसेनेतून करण्यात आलीये हकालपट्टी

  • 17 Jul 2022 02:56 PM (IST)

    श्रीलंकेतील परिस्थितीबाबत राजधानी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक

    श्रीलंकेतील परिस्थितीबाबत राजधानी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक

    येत्या मंगळवारी केंद्र सरकारने बोलावली बैठक

    बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन माहिती सादर करणार

    सर्व पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन

  • 17 Jul 2022 02:44 PM (IST)

    हतनुर धरणाचे 36 दरवाजे उघडले

    हतनुर धरणाचे 36 दरवाजे उघडले

    पावसामुळे पाणीपातळीत वाढ

    हतनुर धरणावर पर्यटकांची गर्दी

    नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  • 17 Jul 2022 02:27 PM (IST)

    अखेर भावना गवळींचा गट शिंदे गटात सामील

    अखेर भावना गवळींचा गट शिंदे गटात सामील

    भावना गवळी समर्थक नगरसेवक पिंटू बांगर यांच्याकडून घोषणा

    यवतमाळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला खिंडार

    शिंदे गटाचे निरीक्षक राजेंद्र फाटक यांच्या उपस्थितीत प्रवेश

  • 17 Jul 2022 02:01 PM (IST)

    डोंबिवलिच्या देवीचा पाडा परिसरात सिलिंडरचा स्फोट

    डोंबिवलीच्या देवीचा पाडा परिसरात सिलिंडरचा स्फोट

    स्फोटामध्ये 65 वर्षीय  वृद्ध जखमी

    मुंबईच्या खाजगी रुग्णालयात जखमीवर उपचार सुरू

    घरात गॅस लिकेज असताना पूजेसाठी लायटर पेठवल्याने झाला स्फोट

    हनुमंत मोरे असे जखमी वृद्धाचे नाव

  • 17 Jul 2022 01:42 PM (IST)

    लोणावळा शहरात वाहतूक कोंडी

    लोणावळा शहरात वाहतूक कोंडी

    पर्यटन बंदी असताना देखील अनेक पर्यटक लोणावळ्यात दाखल

    वाहनांची गर्दी वाढल्याने वाहतूक कोंडी

    दोन किलोमिटरपर्यंत वाहनांच्या रांगा

    कुमार चौक ते नारायणी धामपर्यंत वाहतूक कोंडी

  • 17 Jul 2022 01:08 PM (IST)

    आज ठरणार विरोधी पक्षाचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? तीन वाजता महत्त्वपूर्ण बैठक

    सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात चर्चा

    उपराष्ट्रपतीपदाच्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या मुद्द्यावर चर्चा

    काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात फोनवर चर्चा

    आज दुपारी 3 वाजता होणार विरोधी पक्षांची बैठक

    बैठकीपूर्वी दोन्ही नेत्यांची चर्चा

  • 17 Jul 2022 12:40 PM (IST)

    काँग्रेस, राष्ट्रवादी भाजपाला पर्याय होऊ शकत नाहीत - प्रकाश आंबेडकर

    वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

    काँग्रेस, राष्ट्रवादी भाजपाला पर्याय होऊ शकत नाहीत

    2024 च्या निवडणुकीत आघाडी करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दुय्यम स्थान द्या

    तरच भाजपाचा पराभव शक्य , प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

    द्रोपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा

  • 17 Jul 2022 12:08 PM (IST)

    भामरागडमध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात

    भामरागड तालुक्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात

    मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर

    नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  • 17 Jul 2022 11:32 AM (IST)

    दिपाली सय्यद यांची पत्रकार परिषद

    दिपाली सय्यद यांची पत्रकार परिषद

    दोन दिवसांत ठाकरे, शिंदे भेटणार  - सय्यद

    शिवसेनेत दोन गट नको अशी माझी भावना

    शिवसैनिकांना आपलं मत मांडण्याचा अधिकार

    शिंदे, ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावे अशी शिवसैनिकांची भावना - सय्यद

  • 17 Jul 2022 11:25 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातही शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अमरावती जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. याबाबत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. या नियुक्त्या खालीप्रमाणे करण्यात आल्या आहेत.

    सहसंपर्कप्रमुख - गजानन वाकोडे (विधानसभा- अमरावती, बडनेरा, दर्यापूर), दिनेश बूब- (विधानसभा- तिवसा, अचलपूर, मेळघाट), बाळासाहेब भागवत (विधानसभा धामणगाव रेल्वे मोर्शी)

    जिल्हा समन्वयक - नाना नागमोते- (विधानसभा- अमरावती, बडनेरा, दर्यापूर), ज्ञानेश्वर धाने पाटील- (विधानसभा तिवसा, अचलपूर, मेळघाट), किशोर माहुरे (विधानसभा - तिवसा, अचलपूर, मेळघाट)

    जिल्हाप्रमुख - सुनील खराटे- (विधानसभा अमरावती, बडनेरा, दर्यापूर), राजेश वानखडे (विधानसभा - तिवसा, अचलपूर, मेळघाट), मनोज कडू- (विधानसभा- धामणगाव रेल्वे, मोर्शी)

    महानगरप्रमुख - पराग गुडदे अमरावती

  • 17 Jul 2022 11:08 AM (IST)

    पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ; राधानगरी धरण 71.37 टक्के भरलं

    राधानगरी धरणाची पाणीपातळी 71.37 टक्क्यांवर

    एक जूनपासून ते आजापर्यंत पाणलोट क्षेत्रात 1922 मिमी पावसाची नोंद

    राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग

    नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

  • 17 Jul 2022 10:47 AM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात

    गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात

    आज पहाटेपासून 12 मिलिमीटर पावसाची नोंद

    आठवडाभरानंतर काल पावसाने घेतली होती विश्रांती

    आज पुन्हा पावसाला सुरुवात

  • 17 Jul 2022 10:10 AM (IST)

    पुण्यातील रक्षकनगरमध्ये भीषण आग; 15 घरं जळून खाक

    पुण्यातील रक्षकनगरमध्ये भीषण आग

    आगीत 15 घरं जळून खाक

    लाखो रुपयांचे नुकसान

    संसारोपयोगी वस्तू आगीत जळाल्या

    लवकरात लवकर मदत द्या रहिवाशांची मागणी

    बिराजदार झोपडपट्टीला लागली होती आग

  • 17 Jul 2022 09:49 AM (IST)

    पालघर जिल्ह्यात शिवसेनेकडून नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

    पालघर जिल्ह्यातील आमदार, नगरसेवक, सभापती असे सर्वच जण शिंदे गटात सहभागी झाल्याने आता जिल्ह्यात शिवसेनेकडून नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला सुरुवात झाली आहे. शिवसेना कार्यालयातून नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

  • 17 Jul 2022 09:29 AM (IST)

    यवतमाळमध्ये शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या; संजय राठोड, भावना गवळी यांना धक्का

    यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या

    आमदार संजय राठोड यांच्या मतदारसंघात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

    संजय राठोड, भावना गवळी समर्थकांची पदावरून हकालपट्टी

    संजय राठोड, भावना गवळींना शिवसेनेचा मोठा धक्का

    शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून माहिती

  • 17 Jul 2022 09:01 AM (IST)

    भंडारा जिल्ह्यात आज पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात

    एका दिवसाच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात आज पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात

    संततधार पावसाने धरणे तुडुंब भरली

    आज पुन्हा सकाळपासून जोरदार पावसाची हजेरी

  • 17 Jul 2022 08:15 AM (IST)

    येत्या आठवड्यात मान्सूनचा वेग मंदावरणार; हवामान विभागाचा अंदाज

    येत्या आठवडाभरात मान्सूनचा प्रवाह मंदावणार

    हवामान विभागाचा अंदाज

    हिंदी महासागरावरील तापमानाची परिस्थिती नकारात्मक

    गुजरातच्या किनारपट्टीवर तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र ओमानकडे सरकले

    राज्यातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता

    या आठवड्याच्या पहिल्या तीन दिवसांत कोकण, गोवा,विदर्भात,पावसाची शक्यता

    त्यानंतर पावसाचा जोर कमी होणार

  • 17 Jul 2022 07:46 AM (IST)

    पुणे शहराच्या पाणीकपातीचा निर्णय होणार रद्द; धरणांच्या पाणीपातळीत वाढ

    पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस

    पावसानं पाणीसाठ्यात वाढ

    पुणे शहराच्या पाणीकपातीचा निर्णय लवकरच होणार रद्द

    खडकवासला धरण 100 टक्के भरलं, उर्वरित तीन धरणांतही चांगला पाणीसाठा

    वर्षभराची पाण्याची चिंता मिटली, त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय रद्द होणार

  • 17 Jul 2022 07:26 AM (IST)

    Bhandara : पवनारामध्ये एकाच घरात मिळाले बारा नाग

    भंडारा जिल्ह्यातील पवनारामध्ये एकाच घरात तब्बल बारा नाग आढळून आले आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.  बारा नाग प्रजातीच्या सापांमध्ये एक पाच फूट मादी साप आणि 11 दीड फुटांचे पिल्ल आढळून आले आहेत. हे पिल्ली तीन ते चार दिवसांचे असावे असा अंदाज सर्पमित्रांनी व्यक्त केलाय. या सापांना पकडून सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले आहे.

  • 17 Jul 2022 07:04 AM (IST)

    पहिल्याच पावसात मालेगाव शहरातील रस्त्यांची चाळण

    पहिल्याच पावसात मालेगाव शहरातील विविध भागातील रस्त्यांची चाळण

    वाहतुकीसाठी त्रास होत असल्याने नागरिकांचा संताप

    मालेगावकरांच्या समस्यांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

  • 17 Jul 2022 06:55 AM (IST)

    एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यासाठी पाचोरा तालुक्यातून हजारो कार्यकर्ते मुंबईला रवाना

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत होणाऱ्या मेळाव्यासाठी पाचोरा तालुक्यातून हजारो कार्यकर्ते रवाना

    कार्यकर्त्यांमध्ये पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांची संख्या मोठी

    शिंदे सरकारमध्ये आमदार किशोर पाटलांना मंत्रिपद मिळावं, म्हणून कार्यकर्ते मुंबईत शक्तिप्रदर्शन करणार

    शेकडो वाहनांनी हजारो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

    आमदार किशोर पाटील हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी समर्थकांना अपेक्षा

  • 17 Jul 2022 06:46 AM (IST)

    एकनाथ शिंदे घेणार उद्धव ठाकरेंची भेट; दिपाली सय्यद यांचं मोठं वक्तव्य

    शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडालीये.

Published On - Jul 17,2022 6:34 AM

Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.