शांघायमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील तरुणांची पूर्वतयारी, स्पर्धेत 22000 जणांचा सहभाग

शांघाय (चीन) येथे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची राज्यातील उमेदवारांना संधी उपलब्ध झाली आहे. या स्पर्धेमध्ये निवडीसाठी जिल्हा, विभाग तसेच राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येत आहेत.

शांघायमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील तरुणांची पूर्वतयारी, स्पर्धेत 22000 जणांचा सहभाग
नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई : शांघाय (चीन) येथे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची राज्यातील उमेदवारांना संधी उपलब्ध झाली आहे. या स्पर्धेमध्ये निवडीसाठी जिल्हा, विभाग तसेच राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येत आहेत, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली. दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतिसाद देत राज्यातील तब्बल 22 हजार 90 युवक-युवतींनी यात सहभाग घेतला असल्याची माहितीही मंत्री नवाब मलिक यांनी दिली. (Maharashtra youth prepare for international skills competition in Shanghai, 22000 participants praparing)

विविध 47 क्षेत्रातील कौशल्यावर आधारीत ही स्पर्धा होत असून सर्वाधिक 2 हजार 118 अर्ज इलेक्ट्रीकल इन्स्टॉलेशनसाठी आले असून ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीसाठी 1 हजार 231, सीएनसी मिलिंगसाठी 263, सीएनसी टर्निंगसाठी 479, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 1 हजार 86, फॅशन टेक्नॉलॉजीसाठी 450, हेल्थ आणि सोशल केअरसाठी 542, आयटी नेटवर्क केबलसाठी 317, मेकॅनिकल इंजिनिअरींगसाठी 377, प्लंबिंग आणि ॲम्प हिटींगसाठी 295, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंगसाठी 384 तर वेल्डींगसाठी 1 हजार 11 युवकांनी कौशल्य सादरीकरणासाठी नोंदणी केली आहे. याशिवाय थ्रीडी डीजीटल गेम आर्ट, ऑटोबॉडी रिपेअर, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, बेकरी, ब्युटी थेरपी, ब्रुकलेयींग, कॅबिनेट मेकींग, कारपेंटींग, कारपेन्ट्री, क्लाऊड कॉम्पुटींग, सीएनसी मिलींग,कॉन्क्रिट कन्स्ट्रक्शन वर्क, कुकींग, सायबर सिक्युरीटी, फ्लॉरिस्ट्री,ग्राफीक डिझाईन टेक्नोलॉजी, हेअर ड्रेसिंग, इंडस्ट्रीयल कंट्रोल, ज्वेलरी, जॉईनरी, लँडस्केप गार्डनिंग, मेकॅट्रॉनिक्स, प्लंबिंग, प्रिंट मिडिया टेक्नॉलॉजी, प्रोटोटाईप मॉडेलिंग, रेस्टॉरंट सर्व्हीस, वॉटर टेक्नॉलॉजी, वेब टेक्नॉलॉजी आदी सेक्टरमधील आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी युवक-युवतींनी नोंदणी केली आहे, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

विविध जिल्ह्यातून स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. यामध्ये अहमदनगर (863), अकोला (383), अमरावती (1 हजार 334), औरंगाबाद (661), बीड (188), भंडारा (328), बुलढाणा (803), चंद्रपूर (1 हजार 47), धुळे (483), गडचिरोली (276), गोंदीया (853), हिंगोली (67), जळगाव (1 हजार 63), जालना (192), कोल्हापूर (392), लातूर (351), मुंबई (1 हजार 529), मुंबई उपनगर (54), नागपूर (1 हजार 58), नांदेड (221), नंदुरबार (297), नाशिक (1 हजार 286), उस्मानाबाद (284), पालघर (99), परभणी (105), पुणे (1 हजार 273), रायगड (298), रत्नागिरी (133), सांगली (420), सातारा (649), सोलापूर (770), सिंधुदूर्ग (103), ठाणे (1 हजार 484), वर्धा (1 हजार 131), वाशिम (164), यवतमाळ (1 हजार 448) याप्रमाणे युवक-युवतींनी सहभाग घेतला आहे,असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

जागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन दर दोन वर्षांनी करण्यात येते. 2022 मध्ये शांघाय (चीन) येथे ही स्पर्धा आयोजित होणार असून त्याच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने 47 क्षेत्रांशी संबंधित कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या धर्तीवर जिल्हा, विभाग, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यातून निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. यातील पहिल्या टप्प्याची सुरुवात जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेच्या स्वरूपात 17 व 18 ऑगस्ट 2021 रोजी संपन्न झाली. या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच तांत्रिक विद्यालयांच्या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यानंतरच्या टप्प्यात विभागीय स्पर्धा 23 व 24 ऑगस्ट 2021 रोजी होणार आहे. विभागीय विजेते उमेदवार 3, 4 व 4 सप्टेंबर 2021 रोजी मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. राज्यस्तरावरील विजेते उमेदवार डिसेंबर 2021 मध्ये बंगळुरु येथे होणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागासाठी पात्र ठरतील. देशपातळीवर निवड झालेल्या उमेदवारांना जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संधी मिळेल. प्रत्येक टप्प्यावरून पात्र होणाऱ्या उमेदवारांना शासनामार्फत मोफत प्रशिक्षण व रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत, असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

यापूर्वी जागतिक स्तरावरील 45 व्या जागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन कझान (रशिया) येथे करण्यात आले होते. यामध्ये भारतातून एकूण 48 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, त्यात महाराष्ट्रातून 7 आणि फ्युचर स्किलसाठी 1 स्पर्धक अशा एकूण 8 स्पर्धकांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत भारतीय संघाने एक सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य आणि 15 उत्कृष्ट सादरीकरणाची पदके अशा एकूण 11 पदकांवर आपले नाव कोरून 63 देशांमधून 13 व्या स्थानी येण्याचा बहुमान पटकावला होता. तसेच महाराष्ट्राने 1 कांस्य आणि 3 उत्कृष्ट सादरीकरणाची अशी एकूण 4 पदके मिळविली होती. पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेतही राज्यातील अधिकाधिक युवक-युवतींना उत्कृष्ट संधी मिळावी यासाठी विविध स्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

इतर बातम्या

शुद्धीकरणसाठी ब्राह्मण लागतो, आम्हाला मागायला हवा होता. आमच्याकडे खूप आहेत; राणेंचा शिवसेनाला खोचक टोला

राज्यपाल म्हणाले, 12 सदस्यांच्या नियुक्तीसाठी सरकारचा आग्रह नाही; अजितदादा म्हणतात, मुख्यमंत्री आणि मी त्यांना पुन्हा भेटणार

पवार म्हणाले, जेवायचं निमंत्रण दिलं, पण हातपाय बांधले; राणे म्हणतात, परिपक्व राजकारणी आहात, हात सोडवून घ्या

(Maharashtra youth prepare for international skills competition in Shanghai, 22000 participants praparing)

Published On - 4:04 pm, Fri, 20 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI