Mumbai Mega block : मध्य आणि हार्बर लाईनवर मेगाब्लॉक; उपनगरीय रेल्वेही 10 मिनिटांनी उशिराने; जाणून घ्या वेळापत्रकातील बदल

Mumbai Local Mega block News : मध्य आणि हार्बर लाईन मार्गावर आज मेगा ब्लॉग

Mumbai Mega block : मध्य आणि हार्बर लाईनवर मेगाब्लॉक; उपनगरीय रेल्वेही 10 मिनिटांनी उशिराने; जाणून घ्या वेळापत्रकातील बदल
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 6:33 AM

मुंबईः मध्य रेल्वेकडून (Central Railway) 23 आणि 24 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक (Mumbai Local Mega block News) घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली होती. या मेगा ब्लॉकचा फटका अनेक मुंबईकरांना बसणार आहे. मध्य रेल्वेच्या या मेगा ब्लॉकमुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. त्याचा फटकाही मुंबईकरांना बसणार आहे. भायखळा-माटुंगा अप आणि डाउन जलद मार्गावर (मध्यरात्री ते सकाळ) अप जलद मार्गावर 23 रोजीच्या रात्री 11.30 पासून मेगाब्लॉग घेण्यात येतोय. 24 रोजीच्या पहाटे 4.05 पर्यंत तर 24 रोजी मध्यरात्री 12.40 ते पहाटे 5.40 पर्यंत स्लो आणि फास्ट या मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे.

उपनगरीय रेल्वेही 10 मिनिटांनी धावणार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 24 रोजी सकाळी 5.20 वाजता सुटणारी डाउन जलद मार्गावरील सेवा भायखळा आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात आली असून ही गाडी 10 मिनिटे उशिराने पोहचणार आहे. ठाणे येथून 23 रोजी रात्री 10.58 आणि रात्री 11.15 वाजता सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत, त्यांच्या संबंधित निर्धारित थांब्यांनुसार या गाड्या थांबणार असून निर्धारित वेळेपेक्षा याही गाड्या 10 मिनिटांनी उशीरा पोहचणार आहेत.

एक्स्प्रेस गाड्याही वळवल्या

लांब पल्ल्याच्या गाडी क्रमांक12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार असून दादर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 येथे थांबणार असून 10 ते 15 मिनिटांनी ही गाडी सुटणार आहे. रेल्वे क्रमांक 11058 अमृतसर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 11020 कोणार्क एक्सप्रेस आणि 12810 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. या गाडीला दादर, प्लॅटफॉर्म क्रमांक 3 येथे थांबणार असून ही गाडीही मेगा ब्लॉकमुळे दहा ते पंधरा मिनिटांनी उशिराने पोहचणार आहे.

हार्बर लाईन सकाळपासून ब्लॉक

पनवेल- वाशी या दोन्ही हार्बर मार्गावरही सकाळी 11.5 ते सायंकाळी 4.05 पर्यंत (बेलापूर- खारकोपर बीएसयू मार्गा व्यतिरिक्त) मेगाब्लॉक असणार आहे. पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द असेल.

ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द

पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून 10.01 पासून दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलकरिता सुटणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आली आहे.

नेरुळ-खारकोपर दरम्यानच्या रेल्वे वेळापत्रकानुसार

ब्लॉक कालावधीत बेलापूर-खारकोपर आणि नेरुळ – खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. तर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी सेक्शनमध्ये विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. मेगाब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.