मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
लोकल ट्रेन

मुंबई : रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज (24 मार्च) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेच्या मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ आणि इतर कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप-डाऊन दोन्ही मार्गावर ब्लॉक असणार आहे. तसेच सीएसएमटी ते पनवेल संध्याकाळी 4 पर्यंत एकही लोकल धावणार नाही. आज सर्व लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावतील. या ब्लॉक दरम्यान मध्य रेल्वेवरील कसारा आणि कल्याण येथील सर्व पादचारी पुलाचे काम करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. ओव्हरहेड वायर आणि सिग्नलसह इतर अन्य कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. कल्याणकडे जाणाऱ्या सर्व लोकल मुलुंड स्थानकावरुन जलद मार्गावर वळवल्या जातील. कल्याणकडे जाणाऱ्या सर्व लोकल सकाळी 10.47 ते 3.50 दरम्यान ठाणे, दिवा आणि डोबिंवली स्थानकावर थांबतील.

कल्याणवरुन सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व लोकल सकाळी 10.37 ते दुपारी 3.06 दरम्यान दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकावर थांबतील. तसेच छत्रपती शिवाजी टर्निमसवरुन कल्याणकडे जाणऱ्या सर्व लोकल सकाळी 10.05 ते 2.54 दरम्यान घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा या स्थानकावर थांबतील.

हार्बर मार्गावर

कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. सीएसएमटीवरुन सकाळी 10.34 ते 3.08 दरम्यान वाशी, बेलापूर आणि पनवेल जाणाऱ्या सर्व लोकल तसेच पनवेलवरुन सीएसएमटीकडे येणाऱ्या सर्व लोकल या रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावर विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI