परवडणारी घरांची नियमावली अधिक सुटसुटीत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेचा महत्त्वाचा निर्णय

एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीत (युनिफाइड डीसीपीआर) आणखी सुधारणा केलीय. यामुळे नियमावली अधिक सुटसुटीत झाली आहे.

परवडणारी घरांची नियमावली अधिक सुटसुटीत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेचा महत्त्वाचा निर्णय
एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 5:08 PM

मुंबई : राज्याचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास व्हावा आणि नियमांमधील संदिग्धता दूर व्हावी, यासाठी नगरविकास मंत्रालयाने काही महिन्यांपूर्वी मुंबई वगळता राज्यभरात लागू केलेल्या एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीत (युनिफाइड डीसीपीआर) आणखी सुधारणा केलीय. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली. यामुळे नियमावली अधिक सुटसुटीत झाली आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला चालना मिळून अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे (Minister Eknath Shinde important decision on unified DCPR in Maharashtra for affordable houses).

युनिफाईड डीसीपीआरमधील सुधारणांना मंजुरी

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी व त्यांच्या टीमने युनिफाइड डीसीपीआर तयार केला होता. राज्यभरात एकसूत्री विकास व्हावा, नियमांमध्ये संदिग्धता राहू नये, परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावीत आणि बांधकाम क्षेत्राला चालना मिळून अर्थव्यवस्थेला गती मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला. यासाठी गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित विविघ घटक व संस्थांशी सविस्तर चर्चा करून, त्यांच्या सूचनांची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीने हा युनिफाइड डीसीपीआर लागू करण्यात आल्या. परंतु, कोरोना महामारीने निर्माण केलेले आव्हान आणि गृहनिर्माण क्षेत्राला आलेली मरगळ लक्षात घेता या नियमावलीत आणखी काही सुधारणा करण्याची मागणी होत होती.

नियमावली अधिक सुटसुटीत, म्हाडा पुनर्विकासाला 3 एफएसआय

या मागण्यांची दखल घेऊन युनिफाइड डीसीपीआरमध्ये काय सुधारणा करता येतील, याचा अभ्यास करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार प्रधान सचिव भूषण गगराणी व त्यांच्या टीमने विविध घटकांशी चर्चा करून 37 (2) मधील तरतुदींमध्ये काही सुधारणा सुचवल्या. त्यांना एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.

कमर्शिअल बिझनेस डिस्ट्रिक्ट्सना 5 पर्यंत एफएसआय, रोजगारनिर्मितीला चालना मिळणार

त्यानुसार, ले आऊटमध्ये 20 हजार चौरस मीटरच्यावर 5 टक्के एमिनिटी स्पेसची तरतूद, म्हाडा पुनर्विकासासाठी अडीच ऐवजी तीन चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय), रोजगाराला चालना मिळावी, यासाठी कमर्शिअल बिझनेस डिस्ट्रिक्ट विकसित करण्यासाठी 5 पर्यंत एफएसआय या सुधारणांना मंजुरी देण्यात आली आहे.

घरांच्या किमती आवाक्यात येणार

गृहनिर्माण क्षेत्र हे अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहे. जवळपास 200 छोटे-मोठे उद्योग गृहनिर्माण क्षेत्रावर अवलंबून आहेत. त्यामुळे गृहनिर्माण क्षेत्राला चालना मिळणे महत्त्वाचे आहे. युनिफाईड डीसीपीआरमधील या सुधारणांमुळे या क्षेत्राला गती मिळेल, म्हाडा पुनर्विकासाला चालना मिळेल आणि हाऊसिंग स्टॉक वाढून घरांच्या किमती आवाक्यात येतील. तसेच कमर्शिअल बिझनेस डिस्ट्रिक्टच्या विकासाला प्रोत्साहन मिळून उद्योगनिर्मिती व रोजगार निर्मितीला गती मिळेल, असा विश्वास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा; एकनाथ शिंदेंचे महापालिकांना निर्देश

एकनाथ शिंदेंविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट, मराठी अभिनेत्याला अटक

ठाण्यातील आपत्कालीन कक्षातील वायरलेस, दूरध्वनी सेवा सुरू आहे का?; एकनाथ शिंदेंनी केली खातरजमा

व्हिडीओ पाहा :

Minister Eknath Shinde important decision on unified DCPR in Maharashtra for affordable houses

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.