मनसेनी बाहेर काढला शेलारांचा तो फोटो, अशिशुद्दीन म्हणत डिवचलं, व्होट जिहादवर बोलताना देशपांडे म्हणाले…
Sandeep Deshpande: मनसे नेते संदीप देशापांडे यांनी सोशल मीडियावर एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तसेच या फोटोच्या माध्यमातून त्यांनी 'व्होट जिहाद' चांगले प्रत्युत्तर दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मतदार यादी घोटाळा, दुबार मतदारांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. महाविकास आघाडी, मनसेच्या नेत्यांनी राज्यातील अनेक मतदारसंघांतील मतदार याद्या समोर आणत अनेक ठिकाणी दुबार मतदार आहेत. तसेच काही ठिकामी मतदारांची नावे, पत्ता चुकीचा आहे असा दावा केला आहे. सोबतच जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ आणि व्यवस्थित केल्या जात नाहीत, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेऊ नये, अशी मागणी केली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनीही महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मतदारसंघात अनेक दुबार मुस्लीम मतदार आहेत, असा दावा केलाय. याच दाव्याचा पुरस्कार करून अमित साटम यांनीही एक ट्विट करून पाच मतदारसंघांतील कथित दुबार मुस्लीम मतांची आकडेवारी जाहीर केली आहे. तसेच व्होटजिहादचा आरोप केला आहे. साटम यांच्या याच दाव्याला आता मनसेने सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. मनसेचे नेते सदीप देशपांडे यांनी शेलार यांचा एक फोटो पोस्ट करून साटम तसेच आशिष शेलार यांना लक्ष्य केलंय.
आता मनसेने या ‘व्होट जिहाद’च्या दाव्याला चपराक दिली आहे. संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटरवर आशिष शेलार यांचा इफ्तार पार्टीतील फोटो पोस्ट केला आणि लिहिले, “खास अशिशुद्दीन यांच्यासाठी… अमित साटम यांच्या मतदारसंघातील बोगस घोटाळा!” यासोबत साटम यांच्या मतदारसंघातील बोगस मतदारांची यादीही जोडली.
खास अशिशुद्दीन यांच्या साठी अमित साठम यांच्या मतदार संघातील बोगस घोटाळा pic.twitter.com/oUpytL1vqe
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 4, 2025
मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनीही भाजपवर निशाणा साधला. त्यांनी ट्वीट केले, “भाजप नेते आशिष शेलार यांना निवडणूक आयोगाने अधिकृत प्रवक्ते म्हणून घोषित करावे!” ते पुढे म्हणाले, “मतदार यादीवर प्रश्न उपस्थित केला की भाजप नेत्यांना राग येतो. निवडणूक आयोगाची बाजू मांडण्यासाठी ते पत्रकार परिषदा घेतात. यावरून दिसतंय की भाजपचा खरा जीव मतदार यादीत आहे. म्हणूनच ही मागणी करतोय.”
सांगा, ही मतचोरी आहे की व्होटजिहाद?
महाराष्ट्रातील हे 5 मतदारसंघ पहा… – धुळ्यात निवडणूक जिंकले 3831 मतांनी, मुस्लिम दुबार मते आहेत, 45,797 – बीडमध्ये निवडणूक जिंकले 6553 मतांनी, मुस्लिम दुबार मते आहेत, 67,679 – अमरावतीत निवडणूक जिंकले 19,731 मतांनी, मुस्लिम दुबार मते 28,245 -… pic.twitter.com/XpyQokf3Pw
— Ameet Satam (@AmeetSatam) November 4, 2025
‘व्होट जिहाद’ की मतचोरी? भाजपचा विरोधकांना सवाल
आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या ‘सत्याचा मोर्चा’वर टीका करताना कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मतदारसंघांचा उल्लेख केला होता. ते म्हणाले होते, “राज ठाकरेंना फक्त मराठी आणि हिंदू दुबार मतदार दिसतात का? विरोधी पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघातील दुबार मतदार दिसले नाहीत का?”
