शिवाजी पार्कवर इटलीचे दिवे, हा योगायोग की ‘इटली’चं लांगुलचालन?, मनसेचा खोचक सवाल

दादर शिवाजी पार्कात मुख्यमंत्री निधीतून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे दिवे हे इटलीमधून आयात करण्यात आले आहेत. हा योगायोग आहे की इटलीचं लांगुलचालन आहे? असा खोचक सवाल मनसेने सेनेला विचारला आहे.

शिवाजी पार्कवर इटलीचे दिवे, हा योगायोग की 'इटली'चं लांगुलचालन?, मनसेचा खोचक सवाल
मनसे नेते संदीप देशपांडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई : दादर शिवाजी पार्कात मुख्यमंत्री निधीतून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे दिवे हे इटलीमधून आयात करण्यात आले आहेत. हा योगायोग आहे की इटलीचं लांगुलचालन आहे? असा खोचक सवाल मनसेने सेनेला विचारला आहे.

शिवाजी पार्कवर इटलीचे दिवे

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करत सेनेवर निशाणा साधला आहे. शिवाजी पार्कवरील दिवे हे इटलीवरुन आयात गेले गेले आहेत. सेनेचं इटली प्रेम यातून दिसून येत आहे. भारतात सुद्धा चांगल्या पद्धतीचे दिवे तयार होत असतात, मग इथल्या दिव्यांचा काय प्रोब्लेम आहे? नेहमी परदेशी कंपनीकडून साहित्य का मागवली जातात?, असे सवाल संदीप देशपांडे यांनी सेनेला विचारला आहे.

संदीप देशपांडेंचा निशाणा

संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन सेनेवर निशाणा साधलाय. ते म्हणाले, “शिवतीर्थावर मुख्यमंत्री निधीतून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे दिवे हे इटलीमधून आयात करण्यात आले आहेत. हा योगायोग आहे की इटली च लांगुलचालन?”

शिवाजी पार्कवरील प्रकल्प नेमका काय आहे?

 • मुख्यमंत्री महोदयांच्या आमदार निधीतून सुमारे १ कोटी २५ लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प साकारला आहे. यामध्ये ५ वर्षांचा परिरक्षण खर्चदेखील समाविष्ट आहे.
  • ही रोषणाई कायमस्वरुपी आहे. तसेच स्वयंचलित व विविधरंगी म्हणजे रंग बदलत्या स्वरुपाची आहे.
  • प्रामुख्याने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा सर्व बाजुंनी विद्युत रोषणाईने उजळावा म्हणून विविध रंग बदलणारे एलईडी प्रोजेक्टर दिवे लावण्यात आले आहेत.
  • पुतळ्याच्या पदपीठावर (pedestal) विविध रंग बदलणारे एलईडी वॉल वॉशर दिवे लावले आहेत.
  • पुतळ्याच्या पदपीठावरील खोबणीत एलईडी स्ट्रीप लावली आहे.
  • पुतळ्याच्या चारही बाजुस जळती मशाल भासेल, अशारितीने दिवे बसविण्यात आले आहेत.
  • पुतळ्याच्या आजुबाजूस असलेल्या उद्यानात एलईडी स्पाईक दिवे लावले आहेत.
  • पुतळ्याच्या पदपीठावर रेषीय भूमिगत दिवे लावण्यात येणार आहेत.
  • पुतळ्याच्या आजुबाजूच्या पदपथाची शोभा वाढवण्यासाठी ४२ बहुरंगी एलईडी ग्लोब दिवे बसविले आहेत.
  • बेंगाल क्लब परिसरातील धबधबा तसेच झाडांवर रंग बदलणारे एलईडी विद्युत दिवे लावले आहेत.
  • मैदानाच्या पदपथास लागून सुशोभित असे २५ बोलार्डस (छोटेखानी खांब) लावले आहेत.
  • मैदान परिसरातील ७ प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक भित्तीचित्रं, दीपस्तंभ आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे पुतळा या सर्व ठिकाणी एलईडी विद्युत दिवे लावण्यात आले आहेत.
  • छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरात गोबो लाईट्स प्रोजेक्शन लावण्यात येणार आहेत.
  • मैदानाच्या दोन्ही बाजूस असलेले सी. रामचंद्र चौक व वसंत देसाई चौक यांचे सौंदर्यीकरण व रोषणाईचे काम प्रगतिपथावर आहे.
  • ही सर्व विद्युत रोषणाई करण्यासाठी दिव्यांसह इतर सर्व साहित्य हे इटली येथून नेरी या आंतरराष्ट्रीय कंपनीकडून मागविले आहेत. या सर्व साहित्याला आंतरराष्ट्रीय मानांकन आहे.
  • सर्व विद्युत दिवे आणि साहित्य यांस एकूण ५ वर्षांची हमी आहे. प्रकल्प खर्चामध्ये प्रत्येक वर्षाची अर्थात वार्षिक परिरक्षण किंमत देखील समाविष्ट आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील कबड्डी असोसिएशन येथे स्थित १०० वर्षांचा वास्तूवारसा असलेल्या पुरातन प्याऊचा देखील जीर्णोद्धार करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर येणारे खेळाडू तसेच परिसरात येणाऱया नागरिकांना पाणी पिण्याची सुविधा म्हणून ही प्याऊ उपयोगात येणार आहे. प्याऊमधून २४ तास शुद्ध व स्वच्छ पाणी मिळेल. प्याऊच्या जीर्णोद्धासह या सुविधेसाठी एकूण २० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.

हे ही वाचा :

दसरा मेळाव्याचं बाळासाहेब ठाकरेंचं भाषण म्हणजे पर्वणी, आता सगळंच अळणी : संदीप देशपांडे

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI