आधी पैशांची अडचण, नंतर कोरोनाची लागण, सर्व अडचणींना ठेचत वसईच्या तरुणाची माउंट एव्हरेस्ट सर

एका 25 वर्षीय अभियंत्याने वसईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कोरोनावर मात करून या युवकाने जगातील सर्वात उंच आलेल्या माउंट एव्हरेस्ट शिखराची यशस्वी चढाई केली आहे (Mount Everest climbed by Vasai youth))

आधी पैशांची अडचण, नंतर कोरोनाची लागण, सर्व अडचणींना ठेचत वसईच्या तरुणाची माउंट एव्हरेस्ट सर
वसईच्या शिरपेचात मानाता तुरा, कोरोनावर मात करत तरुणाची माउंट एव्हरेस्ट सर
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 3:03 PM

पालघर (वसई) : एका 25 वर्षीय अभियंत्याने वसईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कोरोनावर मात करून या युवकाने जगातील सर्वात उंच आलेल्या माउंट एव्हरेस्ट शिखराची यशस्वी चढाई केली आहे. हर्षवर्धन जोशी असे या युवकाचे नाव असून तो वसई तालुक्यातील पहिला युवक आहे. यशस्वी माउंट एव्हरेस्ट शिखराची चढाई करून, वसईत परतल्यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे (Mount Everest climbed by Vasai youth).

15 व्या वर्षापासून हर्षवर्धनला डोंगर चढाईची आवड

हर्षवर्धन जोशी हा वसईच्या दिवाणमान परिसरात एका मध्यम वर्गीय कुटुंबात राहणारा असून अभियांत्रिकीचे शक्षण घेत आहे. वयाच्या 15 व्या वर्षापासून हर्षवर्धनला डोंगर चढाईची आवड निर्माण झाली. वसईतील एक डॉक्टरांचा समूह हर्षवर्धनला पहिल्यांदा वसईच्या तुंगारेश्वर डोंगरावर चढाईसाठी घेवून गेले होते. येथून हर्षवर्धनच्या जीवनाला कलाटणी मिळाली. यानंतर हर्षवर्धनने शाळा-महाविद्यालयाच्या सुट्ट्यांमध्ये हिमालय, उत्तराखंड, काश्मीर या ठिकाणी अनेक डोंगरावर चढाई केली (Mount Everest climbed by Vasai youth).

एव्हरेस्ट सर करण्यासाठी विविध कोर्स केले

हर्षवर्धन याने एकेदिवस एव्हरेस्ट सर करण्याचा निश्चय केला. आणि याकडे त्याने आपली घोडदौड सुरु केली. यासाठी त्याने माउंटेनिंगचा कोर्स केला. त्याचबरोबर फिटनेस, मेडिकल याचे असे आवश्यक असलेले इतर 9 कोर्स त्याने पूर्ण केले. यावेळी त्याला अनेक मित्रांनी आणि आधी पर्वत सर केलेल्या गिर्यारोहकांनी मार्गदर्शन केलं.

एव्हरेस्ट सर करण्यासाठी 30 ते 40 लाखांचा खर्च

हर्षवर्धनने माउंट एव्हरेस्ट सर विचार केला तेव्हा त्याला त्यासाठी 30 ते 40 लाखाहून अधिक खर्च येईल, अशी माहिती मिळाली. इतका खर्च परवडणार नसल्याने नाउमेद होऊन हर्षवर्धनने आपली पाऊले पुन्हा एमबीएकडे वळवली. पण त्याची जिद्द त्याला झोपू देत नव्हती. यावेळी त्याच्या मित्रांनी आणि हितचिंतकांनी त्याला साथ दिली आणि हर्षवर्धन पुन्हा जोमाने कामाला लागला.

हर्षवर्धनला अनेकांकडून आर्थिक मदत

विविध सामाजिक संस्था, देशी-परदेशी दानशूर नागरिक यांची त्याला मदत झाली. तसेच त्याने यासाठी काही बँकेचे कर्ज घेतले. त्याचबरोबर हर्षवर्धनने संघर्ष नावाचं संकेतस्थळ तयार केलं आणि नागरिकांना मदतीचं आवाहन केले. त्याच्या संकेतस्थळावरून त्याला 115 जणांनी आर्थिक सहकार्य केले. त्यात प्रोजेक्ट चिराग या संस्थेने हर्षवर्धनला ब्रांड आंबेसीटर बनविले. याने हर्षवर्धनला अधिक बळकटी मिळाली.

कोरोनावर मात करुन माउंट एव्हरेस्ट सर

हर्षवर्धनने 2020 मध्ये सर्व परवानग्या मिळवल्या. पण कोरोना महामारीने जगभर थैमान घातल्याने हर्षवर्धनला परवानगी नाकारली होती. कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर मे 2021 मध्ये पुन्हा संधी चालून आली. लसीकरण करून हर्षवर्धन तिथे पोहचला पण 8 मे रोजी हर्षवर्धनला करोनाने ग्रासले होते. तरीही त्याला कोणतीही लक्षणे नव्हती. अखेर त्याला 10 दिवस अलगीकरणात राहावे लागणार होते. नंतर करोना चाचणी नकारात्मक आल्याने त्याने 20 मे रोजी चढाईला सुरवात केली. त्यानंतर अवघ्या तीन दिवसात त्याने माउंट एव्हरेस्ट सर करत शिखाराच्या माथ्यावर भारताचा झेंडा रोवला. त्यानंतर हर्षवर्धन 30 मे रोजी परत आला.

आता एमबीएचं शिक्षण पूर्ण करणार

हर्षवर्धन हा माउंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला वसईकर आहे. त्याने नुकतंच अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आहे. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत हर्षवर्धन आल्यानंतर त्याचा सत्कार करून त्याला प्रोत्साहन दिले आहे. तो आपलं एमबीएचं शिक्षण पूर्ण करणार आहे. तसेच भविष्यात अशाच पद्धतीने युवकांना प्रशिक्षण देण्याचा मानस आहे.

हेही वाचा : ‘ते’ दुखणं कायमचं दूर करु, मुख्यमंत्र्यांसमोर अजित पवारांचा पंतप्रधान मोदींना शब्द

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.