ज्यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली ते मुकेश अंबानी टार्गेटवर? किती संपत्तीचे मालक?

मुकेश अंबानींच्या घातपाताचा संशयही पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुकेश अंबानींची एकूण किती संपत्तीचे मालक आहेत, याची माहिती मिळाली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:12 PM, 25 Feb 2021
ज्यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली ते मुकेश अंबानी टार्गेटवर? किती संपत्तीचे मालक?
Mukesh Ambani overall property

मुंबईः देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानींच्या घराच्या जवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानं तपास यंत्रणा खडबडून जागी झालीय. नरिमन पाईंटच्या मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याजवळ सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओमध्ये 20 जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्यात. तर स्कॉर्पिओ गाडीत एक पत्रही सापडलं. त्यामुळे बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालेत. मुकेश अंबानींच्या घातपाताचा संशयही पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुकेश अंबानी एकूण किती संपत्तीचे मालक आहेत, याची माहिती मिळाली आहे. (Mukesh Ambani Target Found With Car Full Of Explosives? How Much Property Do You Own?)

लॉकडाऊननंतर त्यांची संपत्ती दर तासाला 90 कोटींनी वाढली

हुरुन इंडियाच्या यादीनुसार, मुकेश अंबानी सलग 9 व्या वर्षी भारतातल्या श्रीमंतांच्या यादीत अव्वल आहेत. 6,58,400 कोटींच्या संपत्तीसह ते या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. खास गोष्ट म्हणजे मार्चच्या लॉकडाऊननंतर त्यांची संपत्ती दर तासाला 90 कोटींनी वाढली. हुरुनच्या ग्लोबल लिस्टमध्ये पहिल्या 5 मध्ये स्थान मिळवणारे अंबानी पहिले भारतीय आहेत. मुकेश अंबानी यांचे एकूण उत्पन्न 6,58,400 कोटी रुपये आहे. मुकेश अंबानींची वैयक्तिक संपत्ती गेल्या नऊ वर्षात 2,77,700 कोटी रुपयांनी वाढलीय.

मुकेश अंबानी कुटुंब आता एक प्राणिसंग्रहालय बांधणार

भारतासह आशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी कुटुंब आता एक प्राणीसंग्रहालय बांधणार आहे. जगातील सर्वात मोठ्या प्राणिसंग्रहालयांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार प्राणिसंग्रहालय अंबानी कुटुंब गुजरातमध्ये बनवित आहे, जिथे त्यांचा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना आहे. रिलायन्सचे कॉर्पोरेट अफेयर्स डायरेक्टर परिमल नथवाणी यांच्या म्हणण्यानुसार, हे प्राणीसंग्रहालय 2023 मध्ये उघडेल. स्थानिक सरकारला मदत करण्यासाठी बचाव केंद्राचाही यात समावेश आहे.

मुकेश अंबानींची संपत्ती सुमारे 80 अब्ज

अहवालानुसार रिलायन्सच्या प्रतिनिधीने प्रकल्पाची किंमत किंवा इतर तपशील देण्यास नकार दिला आहे. अंबानींची एकूण संपत्ती सुमारे 80 अब्ज डॉलर्स (सुमारे 5794.18 अब्ज रुपये) आहे. मुकेश अंबानी फॅमिली टेक ते ई-कॉमर्स क्षेत्रात व्यवसाय करतात. याशिवाय आयपीएलमध्ये खेळणार्‍या मुंबई इंडियन्स क्रिकेट संघाचादेखील ते मालक आहे. 2014 मध्ये अंबानींनी सॉकर लीग देखील सुरू केली. मालमत्ता जसजशी वाढत गेली तसतसे अंबानी कुटुंबाने सर्व लक्ष सार्वजनिक उपक्रमांकडे वळवले आहेत.

 मुकेश अंबानीचं अँटेलिया हे जगातील सर्वात महागडं घर?

दरम्यान, जिथं स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली ते अंबानींचं अँटेलिया हाऊस कसं आहे? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. तर, देशातील सर्वात महागडं हे घर आहे. दक्षिण मुंबईतील पेडर रोडवर हा बंगला आहे. या बंगल्यात एकूण 27 मजले आहेत. या बंगल्याच्या इंटेरियरवर बरंच काम करण्यात आलं आहे. 4 लाख चौरस फुटांवर असलेली ही इमारत 570 फूट उचं आहे. फोर्ब्सच्या मते, या घराची किंमत जवळजवळ 6 हजार कोटी रुपये आहे. तर डॉलरमध्ये याची किंमत 2 बिलियन डॉलर( जवळजवळ 125 अब्ज) आहे. तसंच ही इमारत उभारण्यास तब्बल 11 हजार कोटी रुपये खर्च आला होता. 8 रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला, तरी ही इमारत हलणारही नाही, असा दावा केला जातो.

मुकेश अंबानींच्या मालकीच्या एकूण कंपन्या

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड
रिलायन्स पेट्रोलियम
रिलायन्स पेट्रोकेमिकल्स
रिलायन्स रिटेल
रिलायन्स लाइफ सायन्सेस
रिलायन्स लॉजिस्टिक
रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड
रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड
नेटवर्क 18

संबंधित बातम्या

मुकेश अंबानींच्या घराजवळ आढळली स्फोटकांनी भरलेली कार; विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी

VIDEO : मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं भरलेली कार, घातपाताच्या उद्देशाचा संशय

Mukesh Ambani Target Found With Car Full Of Explosives? How Much Property Do You Own?