मुंबई जिल्हा उपनगर हाऊसिंग फेडरेशन शिवसेनेच्या ताब्यात, अध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर

घोसाळकर हे सध्या गृहनिर्माण संस्था विभागातून मुंबै बँकेचे प्रतिनिधित्व करत आहेत. यामुळे उपनगरातील हाऊसिंग फेडरेशनवर आता शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

मुंबई जिल्हा उपनगर हाऊसिंग फेडरेशन शिवसेनेच्या ताब्यात, अध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर
मुंबई जिल्हा उपनगर हाऊसिंग फेडरेशन शिवसेनेच्या ताब्यात

मुंबई : मुंबईतील पूर्व तसेच पश्चिम उपनगरांतील गृहनिर्माण संस्थाच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत असलेल्या मुंबई जिल्हा उपनगर को-ऑप. हाऊसिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि मुंबै बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. घोसाळकर हे सध्या गृहनिर्माण संस्था विभागातून मुंबै बँकेचे प्रतिनिधित्व करत आहेत. यामुळे उपनगरातील हाऊसिंग फेडरेशनवर आता शिवसेनेचा भगवा फडकला आहे. संस्थेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली.

कार्यकारिणीत सचिवपदी महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनचे रमेश प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभू हे डीम्ड कन्व्हेयन्स कायद्यासाठी शासन स्तरावर वारंवार पाठपुरावा करत आहेत. तर उपाध्यक्षपदी एडव्होकेट समीर शिर्के, कृष्णा बांबरकर खजिनदार तर संचालकपदी डॉ.सुरेंद्र मोरे, मनोहर काजरोळकर, एडव्होकेट सुनील राणे, चंद्रकांत दुखंडे, शशिकांत मोरे, डॉ. मिहीर शहा, नंदकुमार वरणकर, दर्शना गोलतकर, प्रमोद शिंदे व विभूती पंड्या यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई उपनगर जिल्हा हाऊसिंग टाईम्स हे मासिक सुरू करणार

दरम्यान धोकादायक तसेच पुनर्वसन रखडलेल्या गृहनिर्माण संस्थाच्या सभासदांना न्याय देण्यासाठी सर्वतोपरी कार्यरत राहण्याचे वचन अभिषेक घोसाळकर यांनी यावेळी दिले. तसेच उपनगरातील गृहनिर्माण संस्था सभासदांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहणार असल्याची ग्वाही यावेळी घोसाळकर यांनी दिली. गृहनिर्माण संस्थांचे डीम्ड कन्व्हेयन्स, उपविधीमधील दुरुस्ती आदी बाबतीत सभासदांना न्याय मिळवून देणार असल्याचे घोसाळकर यांनी यावेळी सांगितले. गृहनिर्माण संस्थाचा कारभार अधिक पारदर्शक करून संस्थाच्या प्राप्त तक्रारींवर निबंधक कार्यालयाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लवकरच मुंबई उपनगर जिल्हा हाऊसिंग टाईम्स हे मासिक सुरू करून सभासदांना गृहनिर्माण विषयी सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले. (Mumbai District Suburban Housing Federation under the control of Shiv Sena, Abhishek Ghosalkar as President)

इतर बातम्या

‘सरकारकडून स्पष्ट भूमिका येत नाही तोवर ‘लालपरी’चं चाक फिरणार नाही’, परब-पवारांच्या बैठकीनंतरही पडळकर ठाम

वानखेडेंच्या मागे हात धुवून लागलेल्या नवाब मलिक यांच्या दुबई दौऱ्याचं कारण काय?

Published On - 4:30 pm, Mon, 22 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI