मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक, प्रवास करत असाल तर या वेळा लक्षात ठेवा!

मध्य रेल्वेवर रविवार 3 ऑक्टोबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे- दिवा अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते सायंकाळी 4 पर्यंत, हार्बर मार्गावर पनवेल- वाशी अप आणि डाउनवर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत ब्लॉक असणार आहे.

मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक, प्रवास करत असाल तर या वेळा लक्षात ठेवा!
Mumbai Local
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 8:26 AM

मुंबई : मध्य रेल्वेवर रविवार 3 ऑक्टोबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे- दिवा अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते सायंकाळी 4 पर्यंत, हार्बर मार्गावर पनवेल- वाशी अप आणि डाउनवर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत ब्लॉक असणार आहे.

मुलुंड येथून सकाळी 10.43 ते दुपारी 3.46 पर्यंत सुटणारी डाउन मार्गावरील धिमी/अर्धजलद सेवा मुलुंड आणि दिवा स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात येऊन ठाणे, दिवा स्थानकांवर थांबतील आणि वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

कल्याण येथून सकाळी 10.36 ते दुपारी 3.41 पर्यंत सुटणाऱ्या अप धिमी/अर्धजलद सेवा दिवा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविल्या जाऊन दिवा आणि ठाणे स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11.00 ते संध्याकाळी 5.00 दरम्यान सुटणाऱ्या/येणाऱ्या सर्व अप आणि डाउन धीम्या सेवांचे वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशीराने आगमन होतील/सुटतील.

पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावरील ब्लॉक

पनवेल येथून सकाळी 10.49 ते सायंकाळी 4.01 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी 10.03 ते दुपारी 3.16 या वेळेत पनवेल/बेलापूरसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी 9.01 ते दुपारी 3.53 पर्यंत ठाणेकरीता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 या वेळेत पनवेलच्या दिशेने जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

नेरूळ येथून सकाळी 10.15 ते दुपारी 2.45 या वेळेत खारकोपरला जाणारी डाउन मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.45 ते दुपारी 3.15 या वेळेत नेरूळसाठी खारकोपर सुटणारी अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधी दरम्यान बेलापूर आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय ट्रेन सेवा वेळापत्रकानुसार चालतील. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी विभागात विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधी दरम्यान ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.

संबंधित बातम्या :

शाळा, मंदिरे, चित्रपटगृहे सुरु करण्यास परवानगी, सर्वांसाठी लोकल कधी सुरु होणार? प्रवासी संघटनांचा सवाल

मुंबई लोकलमध्ये घातपातासाठी ‘आऊटसोर्सिंग’, ATS च्या तपासात दहशतवादी कटाची धक्कादायक माहिती

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.