Mumbai Rain: Mumbai Rain: मोडकनंतर मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळशी तलावही भरून वाहू लागला; 7 तलावांमध्ये 78.63 टक्के जलसाठा उपलब्ध

मुंबईः मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation)क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका दररोज 385 कोटी लीटर (3850 दशलक्ष लीटर) एवढा पिण्याच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा (Water Supply)नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा ज्या 7 तलावांमधून केला जातो, त्यापैकी तुळशी तलाव (Tulsi Lake) हा आज सायंकाळी 5:45 वाजता ओसंडून वाहू लागला आहे. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका […]

Mumbai Rain: Mumbai Rain: मोडकनंतर मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळशी तलावही भरून वाहू लागला; 7 तलावांमध्ये 78.63 टक्के जलसाठा उपलब्ध
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 8:56 PM

मुंबईः मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation)क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका दररोज 385 कोटी लीटर (3850 दशलक्ष लीटर) एवढा पिण्याच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा (Water Supply)नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा ज्या 7 तलावांमधून केला जातो, त्यापैकी तुळशी तलाव (Tulsi Lake) हा आज सायंकाळी 5:45 वाजता ओसंडून वाहू लागला आहे. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी यंदाच्या पावसाळ्यात भरुन वाहू लागलेला तुळशी हा तिसरा तलाव ठरला आहे.

भरुन वाहू लागलेला हा पहिलाच तलाव

विशेष म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या 2 तलावांपैकी यंदाच्या पावसाळ्यात भरुन वाहू लागलेला हा पहिलाच तलाव ठरला आहे. या तलावाची कमाल पाणी साठवण ही 804.60 कोटी लीटर (8046 दशलक्ष लीटर) इतकी असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

या आधीही भरुन वाहू लागला होता

804 कोटी लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव गेल्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये देखील 16 जुलै रोजीच भरुन वाहू लागला होता. तर 2020 मध्ये 27 जुलै; 2019 मध्ये 12 जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच 2018 मध्‍ये 9 जुलै रोजी; 2017 मध्‍ये 14 ऑगस्‍ट रोजी आणि 2016 मध्‍ये 19 जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता.

 एवढा पाणीसाठा जमा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे 1,44,736.3 कोटी लीटर (14,47,363 दशलक्ष लीटर) इतकी असून आज पहाटे 6 वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये 1,13,809.70 कोटी लीटर (11,38,097 दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच 78.63 टक्‍के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबईतील तलावांची साठवण क्षमता

याबाबत तलावनिहाय आकडेवारी विचारात घ्यावयाची झाल्यास अप्पर वैतरणा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 66.81 टक्के अर्थात 15169.90 कोटी लीटर (1,51,699 दशलक्ष लीटर), मोडक-सागर तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता ही 12892.50 कोटी लीटर (1,28,925 दशलक्ष लीटर) इतकी असून आज हा तलाव 100 टक्के भरलेला आहे. तर तानसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 99.18 टक्के अर्थात 14,388.70 कोटी लीटर (1,43,887 दशलक्ष लीटर), ‘हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’मध्ये (मध्य वैतरणा) पाणी साठवण क्षमतेच्या 81.55 टक्के अर्थात 15,781.80 कोटी लीटर (1,57,818 दशलक्ष लीटर), भातसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 73.84 टक्के अर्थात 52,949.40 कोटी लीटर (5,29,494 दशलक्ष लीटर), विहार तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 66.12 टक्के अर्थात 1831.30 कोटी लीटर (18,313 दशलक्ष लीटर) आणि तुळशी तलावांमध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 100 टक्के अर्थात 804.6 कोटी लीटर (8046 दशलक्ष लीटर) एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.

Non Stop LIVE Update
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.