पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल, 32 वर्षीय पीएसआयचं निधन, कोरोना अहवालाची प्रतिक्षा

पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षक नितेश सूर्यभान देशमुख यांचे आज पहाटे 1.52 वाजताच्या सुमारास निधन झाले.

पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल, 32 वर्षीय पीएसआयचं निधन, कोरोना अहवालाची प्रतिक्षा

मुंबई : पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल झालेले (Mumbai PSI Nitesh Deshmukh Died) पोलीस उपनिरीक्षक नितेश सूर्यभान देशमुख यांचे आज पहाटे 1.52 वाजताच्या सुमारास निधन झाले. ते 32 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दीड वर्षांची मुलगी, भावंडे असा परिवार आहे. नितेश देशमुख यांचं अचानक निधन झाल्यामुळे कोरोना चाचणीचा अहवाल येईपर्यंत त्यांचा मृतदेह शताब्दी रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आला आहे (Mumbai PSI Nitesh Deshmukh Died).

मृत्यूपूर्वी त्यांची कोव्हिड-19 चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावरच नितेश देशमुख यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

पोलीस उपनिरीक्षक नितेश देशमुख यांचं निधन

लातूर जिल्ह्यातील बाबूळगावचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक नितेश देशमुख हे मुंबईतील बांगुर नगर पोलीस ठाण्यात कर्तव्याला होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने नितेश देशमुख यांनी पत्नी आणि दीड वर्षीय मुलीला मूळगावी सोडलं होतं. दरम्यान, कोरोना संकट काळात कर्तव्य बजावत असताना नितेश देशमुख यांना अचानक पोटदुखीचा त्रास सुरु झाला. त्यामुळे 12 जुलै रोजी ते कांदिवली परिसरातील खाजगी नम: रुग्णालयात दाखल झाले.

उपचार सुरु असताना बुधवारी मध्यरात्री त्यांची प्रकृती अचानक खालवली आणि पहाटे 1.52 वाजता नितेश देशमुख यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. नितेश देशमुख यांच्या मृत्यूची बातमी समजताच बांगुर पोलीस ठाण्यातील सहकाऱ्यांसह त्यांच्या बॅचमधील मित्रमंडळी हादरले. अतिशय गुणवान व्यक्तीमत्व असलेले नितेश देशमुख यांचे अचानक जाणे सर्वांसाठी धक्कादायक ठरलं आहे.

मृत्यूपूर्वी नितेश देशमुख यांची कोव्हिड-19 ची तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल अद्याप आला नाही. त्यामुळे नितेश देशमुख यांचा मृतदेह सध्या शताब्दी रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आला आहे.

Mumbai PSI Nitesh Deshmukh Died

संबंधित बातम्या :

कोरोनामुक्त झालेल्या पोलीस, डॉक्टरांकडून प्लाझ्मा दान, कोरोना योद्धांचे सामाजिक भान

Published On - 10:26 pm, Thu, 16 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI