Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मागील 3 दिवसांपासून धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस!

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या या सातही धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सध्या होत आहे. मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी उपलब्ध पाणीसाठा विचारात मग सर्व नियोजन केले जाते. 1 ऑक्टोबर रोजी सातही तलावांत 14,47,363 दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची आवश्यक आहे.

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मागील 3 दिवसांपासून धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस!
Image Credit source: dnaindia.com
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 8:40 AM

मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbai) एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस सुरू आहे. यामुळे यंदा मुंबईकरांची पाणीटंचाईमधून (Water scarcity) सुटका होणार. 29 जूनला धरणात 1.47,006 दशलक्ष लिटर पाणी जमा होते. 3 जुलै रोजी सकाळी हा पाणीसाठा 1,70,520 दशलक्ष लिटरवर गेल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. जूनमध्ये जोरदार पाऊस (Rain) झाला नसलातरीही यंदा जुलै महिन्यात जोरदार पाऊस होतो आहे. हवामान विभागाने 4 ते 7 जूनला मान्सून राज्यात दाखल होईल असे सांगितले होते. मात्र चांगला पाऊस राज्यात व्हायला यावर्षी जुलै महिना उजाडला आहे.

धरणातील पाणीसाठीने तळ गाठला

यंदा चांगला पाऊस होण्यास जुलै महिना उजाडला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठीने तळ गाठला होता. महापालिकेने मुंबईत 27 जून पासून 10 टक्के पाणीकपात करण्यात सुरूवात केली होती. मात्र, आता धरण क्षेत्रात चांगला पाऊस होतो आहे. मुंबईला दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. वैतरणा 6196900 दशलक्ष लिटर, मोदक 45,818 दशलक्ष लिटर, तानसा 10193 दशलक्ष लिटर, भातसा – 78189 दशलक्ष लिटर, विहार- 4677 दशलक्ष लिटर, तुलसी – 2006 दशलक्ष लिटर पाणी सध्या धरणांमध्ये शिल्लक आहे.

हे सुद्धा वाचा

27 तारखेपासून मुंबईत पाणीकपात

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या या सातही धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सध्या होत आहे. मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी उपलब्ध पाणीसाठा विचारात मग सर्व नियोजन केले जाते. 1 ऑक्टोबर रोजी सातही तलावांत 14,47,363 दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची आवश्यक आहे. यंदा जून महिन्यामध्ये म्हणावा तसा पाऊस मुंबईमध्ये झाला नसल्याने महापालिकेने पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 27 तारखेपासून पाणीकपात मुंबई शहरामध्ये सुरू झालीयं.

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणीची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणीची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.