आधी सुप्रिया सुळे आणि आता प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे नेते राज्यपालांच्या भेटीला का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज (10 मे) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

आधी सुप्रिया सुळे आणि आता प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे नेते राज्यपालांच्या भेटीला का?
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 9:22 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज (10 मे) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. ही भेट सुमारे एक तास चालली. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आलंय. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील राज्यपालांच्या भेटीसाठी गेल्या होत्या. त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलंय (NCP MP Praful Patel meet Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari).

राज्यपालांच्या या भेटीबद्दल स्वतः प्रफुल्ल पटेल यांच्याकडून अद्याप कोणतंही ट्विट करण्यात आलेलं नाही, मात्र राज्यपाल कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या भेटीची माहिती देण्यात आली. तसेच जवळपास 1 तास चर्चा झाल्याचंही नमूद करण्यात आलं.

संबंधित व्हिडीओ :

सुप्रिया सुळेंकडूनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीने तर्कवितर्कांना उधाण आलंय. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र भगतसिंग कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केलीय.

जबाबदारीचं पालन न करणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही: शरद पवार

महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाही आणि घटनेने असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे, असे मत शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केलं होतं. (Sharad Pawar take a dig at Bhagat Singh koshyari)

बारामती येथे 14 मार्च रोजी पत्रकारांनी शरद पवार यांना राज्यपाल नियुक्त सदस्यांबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. राज्यपालांकडे जी जबाबदारी असते आणि घटनेने राज्यसरकारला व मंत्रिमंडळाला जे अधिकार आहेत त्या अधिकारानुसार शिफारशी झालेल्या गोष्टींची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी राज्यपालांची असते असेही शरद पवार म्हणाले होते.

हेही वाचा :

जबाबदारीचं पालन न करणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही: शरद पवार

मुख्यमंत्र्यांचं मौन चिंताजनक, राज्यपालांनीच त्यांना बोलतं करावं; फडणवीसांचा चिमटा

BJP Delegation Meet Governor | भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला, राज्यातील घटनांचा अहवाल कोश्यारींकडे सादर

व्हिडीओ पाहा :

NCP MP Praful Patel meet Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.