राज्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला, औषधांचा तुटवडा, पुढचे 10 दिवस अत्यंत महत्त्वाचे: टोपे

त्यांच्यावर उपचार करण्यासाठी दोन लाख एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन्सची गरज आहे. | mucormycosis injections

राज्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला, औषधांचा तुटवडा, पुढचे 10 दिवस अत्यंत महत्त्वाचे: टोपे
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 8:16 AM

मुंबई: कोरोनापेक्षा जीवघेणा आजार असलेल्या म्युकरमायकोसिसच्या (mucormycosis) रुग्णांची संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या इंजेक्शन्सचा सध्या प्रचंड तुटवडा जाणवत आहे. 31 मे नंतर आपल्याला या इंजेक्शन्सचा मोठा साठा मिळणार आहे. त्यामुळे पुढील 10 दिवस हे राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. (health minister rajesh tope on mucormycosis infection in Maharashtra)

ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्युकरमायकोसिसच्या वाढत्या धोक्याविषयी गंभीर इशारा दिला. आजघडीला राज्यात म्युकरमायकोसिसचे 850 रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी दोन लाख एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन्सची गरज आहे. सरकार त्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र, ही इंजेक्शन्स 31 मे नंतरच उपलब्ध होऊ शकतील. परिणामी पुढील 10 दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांना मोठा दिलासा, उपचाराचा सर्व खर्च म. फुले जनआरोग्य योजनेतून होणार

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर या आजारात लागणाऱ्या सर्व औषधांचा खर्चही या योजनेतून दिला जाणार असल्याचंही टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत दीड लाख रुपयांपर्यंतची वैद्यकीय मदत केली जात होती. मात्र, म्युकरमायकोसिसमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागत आहे. त्यामुळे या योजनेत काहीसा बदल करुन म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपचारासाठी लागणारा सर्व खर्च या योजनेतून केला जाणार असल्याचं टोपे यांनी जाहीर केले. त्यामुळे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

‘सर्व रेशनकार्ड धारकांना लाभ मिळेल’

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाबाबत घोषणा करतानाच टोपे यांनी अजून एक महत्वाची माहिती दिली आहे. म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णाच्या कुटुंबाकडे कुठल्याही रंगाचे अर्थात पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड असेल त्या सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मदत दिली जाईल, असंही टोपे यांनी स्पष्ट केलंय.

संबंधित बातम्या :

Covid 19: रुग्णाला एकाचवेळी कोरोना आणि म्युकरमायकोसिसची लागण होऊ शकते का?

कोरोनामुक्त मधुमेहींना म्युकोरमायकोसिसचा धोका, लक्षणं कोणती? आजार टाळण्याचे उपाय काय?

Mucormycosis : म्युकरमायकोसिसची भीती वाटतेय? मग ICMR ने सुचवलेल्या ‘या’ गोष्टी कराच…

(health minister rajesh tope on mucormycosis infection in Maharashtra)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.