केंद्राच्या ‘त्या’ प्रस्तावामुळं गरीब, मध्यमवर्गीयांसाठी वीज वापर ही चैनीची वस्तू ठरेल : नितीन राऊत

ग्राहकांना महागड्या दरात वीज खरेदी करण्यास भाग पाडतील," अशी भीतीही डॉ. राऊत यांनी व्यक्त केली आहे. (Nitin Raut on privatise power distribution companies)

केंद्राच्या 'त्या' प्रस्तावामुळं गरीब, मध्यमवर्गीयांसाठी वीज वापर ही चैनीची वस्तू ठरेल : नितीन राऊत
नितीन राऊत
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 4:11 PM

मुंबई : “वीज वितरण क्षेत्रात एकाधिकारशाही मोडून काढण्याच्या गोंडस नावाखाली खासगी क्षेत्रांत वीज क्षेत्र घुसवण्याच्या प्रस्ताव आहे. मात्र यामुळे सामान्य जनता आणि गोरगरिबांसाठी वीज ही चैनीची बाब ठरेल,” अशी भीती ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर बोलताना त्यांनी याबाबतची प्रतिक्रिया दिली. (Nitin Raut Comment on privatise power distribution companies announce in Budget)

“वीज निर्मिती करणाऱ्या खासगी कंपन्या विजेची मागणी जास्त असेल त्या काळात सुनियोजित पद्धतीने वीज निर्मितीचे उत्पादन घटवून विजेची कृत्रिम टंचाई निर्माण करतात. त्यानंतर ऊर्जा क्षेत्रात गेमिंग ऑफ जनरेशन असंही म्हणतात. मागणी इतका पुरवठा नसल्याचे कारण पुढे करुन मग वीजेचा दर वाढवला जातो, असा जागतिक पातळीवरील अनुभव आहे. भारतात असे झाले तर वीज ही अत्यावश्यक गरजेची गोष्ट आहे. ती महागल्याने गरिबांसाठी मध्यमवर्गीय लोकांसाठी चैनीची बाब बनून त्यांच्या आवाक्याबाहेर जाईल,” अशी प्रतिक्रिया नितीन राऊत यांनी दिली.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा प्रस्ताव काय?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राज्य शासनाच्या मालकीच्या वितरण कंपन्या कार्यरत असतानाही वीज वितरण क्षेत्रात खासगी कंपन्यांनाही प्रवेश देण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात जाहीर केला आहे. पण यामुळे वीज वितरण क्षेत्रात मुठभर बड्या लोकांची मक्तेदारी निर्माण होते. या कंपन्या सर्वसामान्यांची लूट करतात. अशामुळे ब्रिटन आणि इतर पाश्चात्य देशांत घरगुती वीज ही महागडी वस्तू बनली आहेत, असे नितीन राऊतांनी सांगितले. (Nitin Raut Comment on privatise power distribution companies announce in Budget)

“उर्जा क्षेत्रातील वीज (कंटेंट) आणि विजेचे वहन (कॅरेज) हे दोन घटक वेगवेगळे करण्याचा केंद्राचा डाव आहे. असे झाल्यास शेतकरी आणि अल्प उत्पन्न गटातील वीज ग्राहकांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. तसेच यामुळे वीज पुरवठा करण्याचे परवाने अनेकांना उपलब्ध होतील. ‘गेमिंग ऑफ जनरेशन’ च्या खेळीद्वारे ग्राहकांना महागड्या दरात वीज खरेदी करण्यास भाग पाडतील,” अशी भीतीही डॉ. राऊत यांनी व्यक्त केली आहे.

“जगातील काही देशात वीज ही चैनीची वस्तू” 

“ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्पेन, फिलिपीन्स आणि अमेरिकेतील काही राज्यांमध्ये जेथे वीज वितरणाचे खाजगीकरण झाले आहे. खाजगी वीज वितरण परवाना धारकांनी एकाधिकारशाही निर्माण करून ग्राहकांची बेफाम लूट चालवलेली आहे. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या क्रयशक्तिपेक्षा वीज खूपच महाग झाली आहे. त्यामुळे तेथे वीज ही चैनीची वस्तू झाल्याचे डॉ राऊत यांनी सांगितले.”

“भाजप सरकारने वीज बिलात सुधारणा करून किरकोळ वीज व्यवसायाचे नियमन रद्द करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. पण असं झालं तर शेतकरी, घरगुती ग्राहक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वस्त वीज उपलब्ध करून देण्याची यंत्रणाच नष्ट होईल, असे निरीक्षण ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी नोंदविले.”

“बड्या उद्योगजकांची एकाधिकारशाही निर्माण होईल” 

“ग्राहकांना खुल्या बाजारपेठेतील विजेचे दर आणि उपलब्ध पर्याय याविषयी माहिती नसते. त्यामुळे ग्राहक हे खाजगी पुरवठादारांनी दिलेल्या दरांवर अवलंबून राहतील. त्याच वेळी त्यांचे वीज नियामकाद्वारे संरक्षण होणार नसल्याने बड्या उद्योगजकांची वीज वितरण क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण होईल. ते चढ्या दराने वीज विकून ग्राहकांची लूट करतील.”

“भविष्यात क्रॉस सबसिडी काढून टाकले जातील आणि टाकल्यावर शेतकरी आणि लघु उद्योगांना महागडी वीज खरेदी करावी लागेल. यामुळे त्यांचा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या कमकुवत होईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.” (Nitin Raut Comment on privatise power distribution companies announce in Budget)

संबंधित बातम्या : 

उद्धव ठाकरे-मुनगंटीवारांच्या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

देशभर शेतकऱ्यांची आंदोलने, पण अर्थसंकल्पात एक पॅकेज नाही; शिवसेना नेत्याची टीका

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.